मी आपलं माझ्या अंदाजाने आंतरजालावरिल पाकृनुसार बनवलेला कोल्हापुरी तांबडा रस्सा...हा माझा पहीलाच प्रयोग असल्याने तुमच्या काही सुचना असतील तर नक्की कळवा...
साहीत्यः
२ पाउंड चिकन (अंदाजे १ किलो पण बोनलेस चिकन घ्यायचं नाही.)
३ मध्यम कांदे
१/२ वाटी किसलेले सुके खोबरे
२ टेस्पून तीळ
१ टेस्पून खसखस
५-६ मिरे (खालील मसाले नसतील तर गरम मसालाही वापरता येइल पण चवीत फरक मात्र जाणवेल.)
५-६ लवंग
२-३ इंच दालचिनी
१ बडी इलायची
२-३ छोटी वेलची
१-२ तमालपत्र
३-४ लसूण पाकळ्या
२ इंच आलं
४-५ चमचे लाल तिखट (मी +२ चमचे रंगासाठी काश्मिरी लाल तिखट वापरलंय, कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला असेल तर अगदी बेष्ट.)
१ छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
कृती:
१) चिकन साफ करुन हळद आणि मीठ लावून बाजुला ठेवा.
२) १ कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर भाजायला टाका.
३) खोबरे+तीळ+खसखस+मिरे+लवंग+दालचिनी+बडी इलायची+छोटी वेलची+ तमालपत्र+लसूण+आलं हलक्या तांबुस रंगावर भाजुन घ्या. सगळे मसाले आणि कांद्याचे बारिक वाटण करुन घ्या.
४) उरलेले २ कांदे बारिक चिरुन घ्या.
५) एका कढइत तेल तापत ठेवा...तेल तापले की त्यात २-३ मिरे,१-२ लवंगा,१ तमालपत्र आणि कांदा टाकून हलक्या तांबुस रंगावर परतुन घ्या.
६) आता १/२ वाटी गरम पाणी टाका.
७) त्यात चिकन टाका आणि मोठ्या आंचेवर ५-७ मिनीटे परता.
८) आता यात वाटलेला मसाला + तिखट टाकुन घ्या. जर कोल्हापुरी कांदा-लसुण मसाला असेल तर तिखटाचे प्रमाण त्यानुसार बदला.
९) मीठ घालुन मध्यम आंचेवर ४-५ मिनीटे परतवून मंद आंचेवर २०-२५ मिनीटे शिजू द्या.
प्रतिक्रिया
6 Oct 2009 - 5:40 am | लवंगी
झणझणीत दिसतोय.. रंग मस्त आलाय.. करून पाहिन
6 Oct 2009 - 8:02 am | निमीत्त मात्र
वा! काय सुरेख रंग आलाय. नुसता फोटो बघूनच ठसका लागला..
पण ह्याला तांबडा रस्सा म्हणतात का? माझ्यामते तांबड्या रश्श्यात चिकन/मटण नसते. नुसताच रस्सा असतो. जाणकारांनी खुलासा करावा.
6 Oct 2009 - 8:36 am | सहज
भारी आहे. असणारच की त्यात आता विशेष ते काय, बरोबर ना? :-)
लाल रंगामुळे फोटो आकर्षक आला आहे. काश्मिरी लाल तिखटाची किमया.
6 Oct 2009 - 8:42 am | येडा अण्णा
कोल्हापुरी तांबड्या आणी पान्ढर्या रश्श्यात चिकन/मटण नसते. नुसताच रस्सा असतो.
6 Oct 2009 - 9:06 am | दिपक
खत्त्त्त्तरनाक जीवघेणा फोटू......
6 Oct 2009 - 9:28 am | झकासराव
कोल्हापुरी तांबड्या आणी पान्ढर्या रश्श्यात चिकन/मटण नसते. नुसताच रस्सा असतो.>>>>>>>..
हम्म.
असच काहि नसत अगदी नियम असल्यासारख.
मी पाहिलेली पद्धत अशीच आहे.
त्या रश्श्याला चव येण्यासाठी त्यात मटण कि.न्वा चिकन शिजवत ठेवणे गरजेच आहे.
घरी जाणार आहे दिवाळीला तेव्हा डिट्टेल रेसिप्पी आईला विचारुन लिहिन इकडे खास मटण प्रेमीसाठी.
:)
6 Oct 2009 - 9:35 am | श्रावण मोडक
मीही असेच अनुभवले आहे. या रश्शासाठी मटण-चिकन शिजवले जात असणार हे नक्की. आणखी एक नक्की की पानात येताना रस्सा नुसता असतो, त्यात मटण किंवा चिकन नसते. पण त्याशिवाय तो शिजवला असेल तर... छे, हा तर कोल्हापुरी या शब्दाचाच अवमान आहे.
6 Oct 2009 - 9:36 am | दशानन
+१
श्रामो,
मीही असेच अनुभवले आहे. या रश्शासाठी मटण-चिकन शिजवले जात असणार हे नक्की. आणखी एक नक्की की पानात येताना रस्सा नुसता असतो, त्यात मटण किंवा चिकन नसते. पण त्याशिवाय तो शिजवला असेल तर... छे, हा तर कोल्हापुरी या शब्दाचाच अवमान आहे.
****
बाकी दिपाली,
नेह॑मी प्रमाणेच जिवघेणे फोटो....
निषेध X(
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
6 Oct 2009 - 9:39 am | श्रावण मोडक
तो निषेध राहिला होता. रश्श्याच्या आठवणींत राहून गेला. आता करतो. नी षे ध!!!
6 Oct 2009 - 11:06 am | अवलिया
सहमत आहे.
निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X( निषेध X(
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Oct 2009 - 9:48 am | वेताळ
कोल्हापुरी ताबंडा रस्सा करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. सर्रास करुन प्रथम मटण किंवा चिकन घुवुन घेतात. त्याला हळद व मीठ चवीनुसार लावावे.प्रथम एका भांड्यात तेल घेवुन ते तापल्यावर त्यात मीठ,हळद लावलेले चिकन किंवा मटण सोडावे.व्यवस्थित हलवुन घेवुन त्यावर एकादे ताट ठेवुन मटण किंवा चिकन शिजु घ्यावे. त्यात सहसा शिजतना पाणी घालु नये.शिजताना त्याला पाणी सुटत जाते. शेवटी शेवटी त्यात थोडे गरम पाणी घालावे.गरम पाणी त्या भांड्यावर ठेवलेल्या ताटातच तयार करावे व शेवटी हळु हळु ते ओतावे. नंतर ची पाकृ वरील प्रकारे करावी.मटण किंवा चिकन शिजताना जितके पाणी ज्यादा सुटेल तितकी रश्या ला चव मस्त येते.
वेताळ
6 Oct 2009 - 11:55 am | मॅन्ड्रेक
at and post : janadu.
6 Oct 2009 - 12:50 pm | गणपा
कसला खत्री रंग आलाय.
लाजवाब पाककृती.
6 Oct 2009 - 1:03 pm | विजुभाऊ
या इथे रेसीपी वाचा http://www.misalpav.com/node/553
स्वाती ने दिली होती
6 Oct 2009 - 5:15 pm | स्वाती२
कसला सॉलिड रंग आलाय. शोधले पाहिजे हे काश्मिरी तिखट.
6 Oct 2009 - 5:45 pm | सूहास (not verified)
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!मार डाला !!
सू हा स...
6 Oct 2009 - 6:35 pm | किट्टु
फोटो एकदम झक्कास.... =P~
या विकांताला पार्टी आहे.. आता पार्टीच्या मेनुचा प्रश्न मिटला..... #:S
6 Oct 2009 - 7:38 pm | टारझन
आज आत्ता ताबडतोब चिकन चापून येतो !! आलोच थांबा !!
बाकी आपण रेसेपी चुक की बरोबर असल्या वांझोट्या चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा , सरळ संपवतो .. :)
7 Oct 2009 - 10:12 am | महेश हतोळकर
बाकी आपण रेसेपी चुक की बरोबर असल्या वांझोट्या चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा , सरळ संपवतो ..
सहमत. रेसेपी चूक की बरोबर यापेक्षा चविष्ट आहे हे महत्वाचे.
सध्या फक्त नजरेनेच आस्वाद घेत आहे.
6 Oct 2009 - 7:44 pm | धमाल मुलगा
मी हा धागा उघडलाच नाही!
मी त्यावरचा तांबड्या रश्श्याचा फोटो पाहिलाच नाही!!
त्या बाऊलमधलं चिकनचं तंगडंही मुळ्ळीच पाहिलं नाही!!!
त्यामुळॅ मी 'वा वा..छान छान' असा प्रतिसाद देणाचा प्रश्नच येत नाही!
:|
6 Oct 2009 - 8:32 pm | संदीप चित्रे
त्यामुळे लिहिण्यासारखं काहीच नाही !!!
:)
6 Oct 2009 - 9:43 pm | चतुरंग
()चतुरंग
7 Oct 2009 - 6:53 am | छोटा डॉन
रंगाशेठ, तुम्ही "गो व्हेज" वाले ना ?
आयला मग तांबड्या रश्श्यचा वाडगा साफ कसा केलात ? ;)
असो, अंमळ मज्जा म्हणुनच घेणे, टिका करण्याचा हेतु नाही.
बाकी दिपालीने दिलेला फोटोच असा आहे की कुणालाही मोह व्हावा, ह्याच्याच धर्तीवर एखाद्या मसालेदार व्हेजेटेरियन रश्श्याची पाकॄ लवकरात लवकर मिपावर यावी असा आदेश डॉनबाबा बंगाली देत आहेत.
जय हो !!!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
7 Oct 2009 - 9:48 am | चतुरंग
पण रश्श्याचा फोटू इतका कडक आहे की म्हटले निदान चित्रातला तरी वाडगा साफ करावा! ;)
(स्यूडो-सामिष)चतुरंग
7 Oct 2009 - 5:08 am | प्राजु
अरे देवा!!
या दिपाली आणि गणपाला मिपावर येण्याला बंदी घालावी अशी मी मागणी करते आहे.. ;)
हॅल्लो.. हॅल्लो... कोणी आहे का माझी मागणी ऐकणारे?
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Oct 2009 - 9:09 am | विंजिनेर
राँग नंबर. इथे कोणी "प्रशासकिय अनुमती" राहात नाही. हे हॉटेल आहे.
"१८००-डायल-नमोगत" ला विचारा नक्की सांगतील ते :)
7 Oct 2009 - 9:45 am | शाहरुख
नाद खुळा रंग आलाय रश्श्याला !!
(शाकाहारी आणि कोल्हापूरी) शाहरुख
7 Oct 2009 - 10:04 am | विशाल कुलकर्णी
लाळ गळायला लागली ना माय !
आसं नको ना करु..... ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
7 Oct 2009 - 7:44 pm | प्रभाकर पेठकर
कोल्हापुरी तांबड्या रश्शाचे चित्र पाहून असे वाटले हाणावा असाच पोटभर. उद्याचे उद्या पाहू ... असो.
पांढरा रस्सा किंवा तांबडा रस्सा, मटण शिजवताना सुटलेल्या पाण्याचा (किंवा शिजताना वापरलेल्या अल्प पाण्याचा) 'बेस' म्हणून वापरून केला जातो. शिजवलेले मटण त्या रश्श्या बरोबर 'सुके मटण' म्हणून दिले जाते. मटणाचे फॅट्स १०० टक्के रश्श्यात असते त्याने तो चविष्ट आणि आले-लसूण्-तिखटाने तांबडा आणि झणझणीत होतो.
पांढर्या रश्श्यात सुकं खोबरं, तिळ, खसखस, पांढरं तिखट (आणि काजू?) असे पांढरे जिन्नस वापरले जातात.
दिपाली, हार्दीक अभिनंदन.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.