मी आपलं माझ्या अंदाजाने आंतरजालावरिल पाकृनुसार बनवलेला कोल्हापुरी तांबडा रस्सा...हा माझा पहीलाच प्रयोग असल्याने तुमच्या काही सुचना असतील तर नक्की कळवा...
साहीत्यः
२ पाउंड चिकन (अंदाजे १ किलो पण बोनलेस चिकन घ्यायचं नाही.)
३ मध्यम कांदे
१/२ वाटी किसलेले सुके खोबरे
२ टेस्पून तीळ
१ टेस्पून खसखस
५-६ मिरे (खालील मसाले नसतील तर गरम मसालाही वापरता येइल पण चवीत फरक मात्र जाणवेल.)
५-६ लवंग
२-३ इंच दालचिनी
१ बडी इलायची
२-३ छोटी वेलची
१-२ तमालपत्र
३-४ लसूण पाकळ्या
२ इंच आलं
४-५ चमचे लाल तिखट (मी +२ चमचे रंगासाठी काश्मिरी लाल तिखट वापरलंय, कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला असेल तर अगदी बेष्ट.)
१ छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
कृती:
१) चिकन साफ करुन हळद आणि मीठ लावून बाजुला ठेवा.
२) १ कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर भाजायला टाका.
३) खोबरे+तीळ+खसखस+मिरे+लवंग+दालचिनी+बडी इलायची+छोटी वेलची+ तमालपत्र+लसूण+आलं हलक्या तांबुस रंगावर भाजुन घ्या. सगळे मसाले आणि कांद्याचे बारिक वाटण करुन घ्या.
४) उरलेले २ कांदे बारिक चिरुन घ्या.
५) एका कढइत तेल तापत ठेवा...तेल तापले की त्यात २-३ मिरे,१-२ लवंगा,१ तमालपत्र आणि कांदा टाकून हलक्या तांबुस रंगावर परतुन घ्या.
६) आता १/२ वाटी गरम पाणी टाका.
७) त्यात चिकन टाका आणि मोठ्या आंचेवर ५-७ मिनीटे परता.
८) आता यात वाटलेला मसाला + तिखट टाकुन घ्या. जर कोल्हापुरी कांदा-लसुण मसाला असेल तर तिखटाचे प्रमाण त्यानुसार बदला.
९) मीठ घालुन मध्यम आंचेवर ४-५ मिनीटे परतवून मंद आंचेवर २०-२५ मिनीटे शिजू द्या.
वाचने
17980
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ग दिपाली
वा! काय
मस्त!
कोल्हापुरी तांबड्या आणी पान्ढर्या रश्श्यात चिकन/मटण नसते
व्वा !
कोल्हापुर
य़ेस्स
In reply to कोल्हापुर by झकासराव
+१ श्रामो, म
In reply to य़ेस्स by श्रावण मोडक
अरे हां...
In reply to +१ श्रामो, म by दशानन
सहमत
In reply to अरे हां... by श्रावण मोडक
आमच्या कडे हा प्रकार सहसा करत नाहीत.
बेश्..
जबरा
या इथे
कसला सॉलिड
झ का स !!!!!
झक्कास....
आज आत्ता
+१
In reply to आज आत्ता by टारझन
नाही! मुळ्ळीच्च्च नाही!!
असंच म्हणत नाही
In reply to नाही! मुळ्ळीच्च्च नाही!! by धमाल मुलगा
हं..अजून..!!
आँ !!!
In reply to हं..अजून..!! by चतुरंग
हो रे बाबा खरं आहे आम्ही गो व्हेज वालेच!
In reply to आँ !!! by छोटा डॉन
अरे
हॅल्लो..
In reply to अरे by प्राजु
व्वा !!
लाळ गळायला
कशाला उद्याची बात.....?