सर्पोतेल

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
27 Sep 2009 - 1:02 pm

खर तर मी ही पाककृती मुळीच टाकणार न्हवतो. ताईलोकांडुन धमक्या यायला लागल्यात आणि माझ्या सौंना लवकरात लवकर माझ्या कडे धाडण्याचे बेत आखले जात आहेत.
पण लवंगींतै नी पेठकर काकांच्या इनंतीला मान देउन टंकातची रिस्क घेतोय.
साहित्यः
१/२ किलो पोर्क, १०० ग्रॅम बकर्‍याची कलेजी.
१ मोठा कांदा बारीक चिरुन.
३-४ पाकळ्या लसुण-१/२ इंच आल बारीक चिरुन.

वाटणः
७-८ कश्मिरी सुक्या मिरच्या
३-४ लवंगा.
१ इंच दालचिनी.
७-८ काळीमिर्‍या.
१ चमचा जीर.
३ पाकळ्या लसुण .
१/२ इंच आल
१ चमचा हळद.
१/२ लिंबा एवढ्या चींचेचा कोळ.

१) एका भांड्यात पाणी घेउन त्यात पोर्क मध्यम आचेवर १५ मिनिट शिजत ठेवाव.
२) शिजलेल्या पोर्कचे लहान तुकडे करावे.
३) पोर्कच्याच चरबी वर पोर्क, कलेजी (बारीक बारीक तुकडे करुन्),कांदा,आल-लसुण चांगल परतुन घ्याव.
४) जितका रस्सा हवा त्या प्रमाणात पोर्कचा स्टॉक्/पाणी टाकुन वरील वाटण टाकावे, मस्त एक वाफ काढवी.

टीपः शक्यतो हे आदल्या रात्री करुन दुसर्‍या दिवशी खावं. रस्सा आणि मसाला मुरल्याने लज्जत वाढते.

स्तोत्रः गोवन मित्राची बायको.

वर सांगितल्या प्रमाणे ही पाककृती टाकण्याचा विचार न्हवता त्यामुळे पाककृती बनवतानाचे फटु काढले नहित. एकच फटु आहे.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Sep 2009 - 1:12 pm | विसोबा खेचर

जीव जायच्या आधी काही क्षण,

'गणपा, सुंदर पाकृ आणि फोटू रे..!'

'त्या गोवन मैत्रिणीचं भलं होऊ दे..!'

असं काहीसं तात्या पुटपुटले आणि समाधानानं देवाघरी गेले! :)

गणपा's picture

27 Sep 2009 - 1:25 pm | गणपा

अरे देवा एकाच दिवशी दोन वेळा ब्रम्ह हत्येच पातक माझ्या माथी का?

(प्रयोग शाळेपसुन सन्यास घेण्याच्या तयारीत..... ) गणपा :)

गणपा's picture

27 Sep 2009 - 1:19 pm | गणपा

प्र का टा आ.

नंदन's picture

27 Sep 2009 - 1:21 pm | नंदन
Nile's picture

27 Sep 2009 - 1:40 pm | Nile

लोल! चुकुन चुकलेला अर्थ लागला अन लोट्पोट्लो! =))

-पेपरोनी न आवडलेला.

स्वाती२'s picture

27 Sep 2009 - 7:31 pm | स्वाती२

मस्त पाकृ! नक्की करुन बघिन. ते चरबी ऐवजी तेल वापरून चालेल का?
मला फक्त रिब्ज करता येतात. अर्थात फॉईलमधे गुंडाळून ओव्हनमधे टाकणे एवढेच करायचे असते त्यामुळे जमते. पण तुमच्या पोर्क फेस्ट मुळे इतरही प्रकार करुन बघायचा धीर आलाय.

लवंगी's picture

27 Sep 2009 - 7:36 pm | लवंगी

@)

वेताळ's picture

27 Sep 2009 - 9:29 pm | वेताळ

थांबा की राव कुठे तरी.....किती हाल करताय :T
मस्तच फोटो....
वेताळ

हरकाम्या's picture

27 Sep 2009 - 11:02 pm | हरकाम्या

गणप्या एकदा भेट गड्या . तुला कडकडुन भेटुन तुझे " अभिनंदन " केले पाहिजे. काय फर्मास पाकक्रुती टाकतोस गड्या.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2009 - 12:06 am | प्रभाकर पेठकर

विनंतीला मान देऊन पोर्क सर्पोतेलची पाकृ सफोटो टाकल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

आता मस्कतला जाणार आहे तिथेच करून पाहतो.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

दिपाली पाटिल's picture

28 Sep 2009 - 2:48 am | दिपाली पाटिल

स्तोत्रः गोवन मित्राची बायको.
सर्पोतेल करताना "गोवन मित्राची बायको" हे स्तोत्र म्हणायचं कां? :D
बाकी पाकृ छान..करुन पाहीली पाहीजे..आजपर्यंत कधीच पोर्क न केल्यामुळे मन धजावत नाहीये... :) पण सर्पोतेल फक्त पोर्कचंच बनतं कां?
दिपाली :)

प्राजु's picture

28 Sep 2009 - 5:41 am | प्राजु

सर्पोतेल करताना "गोवन मित्राची बायको" हे स्तोत्र म्हणायचं कां?
=)) =))

पाकृ वाचताना 'स्तोत्र ' वाचून खुदकन् हसू आलं होतं. पण तुझा प्रतिसाद वाचून एकदम.. ठ्ठ्यॉ.. झालं.
असो... पाकृ. छान आहे.
तुमच्या बायकोला तुमच्यापाशी लवकरात लव्कर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

28 Sep 2009 - 3:15 am | टारझन

च्यायला ... आता डुकरं खायला सुरू केलं पाहिजे ... गणप्या .. आड्रस दे रं लका तुझा

(पाकृ पाहून डुकराच्या प्रेमात पडलेला) स्वाईन टारझन

संदीप चित्रे's picture

28 Sep 2009 - 9:13 am | संदीप चित्रे

'पोर्क'ऐवजी बकर्‍याचं मटण वापरता येईल का?

गणपा's picture

28 Sep 2009 - 1:22 pm | गणपा

हो चालेल ना.
पण डुकराची चव वेगळीच. :)

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
यावन रावनकी सभा शंभु बंध्यो बजरंग । लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।।
रबि छबि लखत खयोत बदरंग । राजन् तव तेज निहारके लखत त्यजो अवरंग ।।
-कवी कलश

नंदू's picture

28 Sep 2009 - 7:46 pm | नंदू

डिस्कव्हरी वाहिनीवर Andrew Zimmern यांच्या गोव्यावरिल कार्यक्रमात ही पाककृती पहिल्याचं स्मरतं. त्यात त्यांच्या गोवन यजमानीण बाईंनी liver, the heart , kidney आणी थोडं रक्तपण टाकल्याचं चांगलच आठवतंय (म्हणूनच कदाचित Bizzare Food). ही (रक्ताची चव) या पाककृतीची speciality आहे असं याच कार्यक्रमात कळ्लं.

बाकी फोटो पाहून मझ्यासारख्या शाकाहारी माण्साच्या तोंडात पाणी आलं यातच सगळं आलं. =P~

गणपा's picture

29 Sep 2009 - 9:05 pm | गणपा

सर्व वाचकांचे नी प्रतिसाद टंकण्याचे कष्ट उपसणार्‍यांचे आभार.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)