माझा ही स्वयं(पाक)प्रयोग

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
15 Sep 2009 - 10:31 pm

सध्या परत बॅचलर लाईफ चालु आहे. त्यामुळे स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न स्वतःलाच सोडवावा लागतोय.
ईतके दिवस खिचडी नी मॅगी वर भागवत होतो, पण ह्या मिपाच्या सुगरणी नी सुगरणे जिवावर उठल्या सारखे एका मागोमाग एक खरनाक रेशीप्या नी फोटु टाकुन आमचा (आदरार्थी एकवचन) जीव खाउन राहीली.
म्हटल गण्या त्या तै लोक काय आपल्याला खाऊ खालनार नाहीत, आपणच आपल्या जिभेचे चोचले पुरवावे.
ऑफिस सुटल्यावर तडक गेलो खाटका कडे. फर्मास १/२ किलो कोवळ बोकडाच मटण घेतलं.
बाकीचे जिन्नस सुदैवाने घरी होतेच. (हा गैरसमज घरी गेल्यावर लगेच दुर झाला.)
घेतल भीमाच नाव नि शिरलो स्वयंपाकगृहात.
एका डिश ने काय होणार??? म्हणुन दोन वेगळे पदार्थ करायच ठरवल.
मटण चांगल २-३ पाण्यात धुवुन घेतल. मटणाचे दोन भाग केले, एक बोनलेस, आणि एक हाडाळ. थोडी हळद लावुन बाजुला ठेवल. आल लसणाची पेस्ट आणायला फ्रि़जमध्ये डोलावलो आणि पहिली विकेट पडली. नो पेस्ट. चरफडत लसुण सोलायला घेतला. (माझ्या लहानपणी, लसुण सोलणे आणि सुक खोबर किसणे ह्या जहाल शिक्षा होत्या माझ्यासाठी. ) नशिबाने आलं होत. लसुण आणि आलं वाटुन घेतल. मग प्रत्येक भागला आल लसणाची ताजी पेस्ट,मीठ,मसाला लावला. (मोज-मापं विचारु नका. आम्ही हे सार अंदाजान केलेल है.) हाडाळ भागात थोड दही घातल. बोनलेस मध्ये एक लिंबु पिळल आणि दोन्ही फ्रि़जमध्ये मुरत ठेवल.

मग बाकिच्या तयारी कडे वळलो.
दोन कांदे उभे आणि एक बारिक चौकोनी चिरुन ठेवले. फ्राइंगपॅन मध्ये थोड तेल घेउन त्यात लवंग, दालचिनी, काळीमिरी आदी खडामसाला टाकुन २ मिनिट परतुन त्यात उभा चिरलेला कांदा गुलाबी होइस्तो परतुन मग एका ताटात काढुन ठेवल. खोबर भाजयला डबा उघडलानी दुसरी विकेट गेली. एकदा वाटल कि कराव खोबर्‍याशिवाय. पण हॅ.. खाईन खोबर्‍याशीच म्हणत पायात वहाणा सारल्या. तरी बर दुकान घरापासुन जव़ळच (गाडीने फक्त २० मिनिटावर ) आहे. तिकडे दुकानात खिसलेल खोबर पाहुन कोण आनंद झाला सांगु. अंमळ हळवा झालो क्षणभर. दुकानातले सोप्स्कार आटोपुन गाडी परत घरा कडे वळली.
एव्हना ८ वाजले होते. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. म्हटल गण्या तु करणार कधी नि हाणणार कधी?
झटपट खोबर भाजुन घेतेल, त्यात थोड लालतिखट घातल भाजताना. नंतर हे खोबर आणि मगासचा खडा मसाला + कांदा मिक्सर मध्ये वाटुन घेतलं.
सुक मटण करण्यासाठी , बोनलेस मटण फ्राइंगपॅन मध्ये थोड तेल घेउन त्यात टाकल. खाली लागुनये म्हणुन थोड पाणी टाकल.
एकिकडे सुक्यामटणावर संस्कार होत होते तोवर रश्याची तयारी चालु केली. कुकरमध्ये तेलावर थोडा खडामसाला परतुन , बारिक चिरलेला कांदा पार गळे पर्यंत परतला. मग त्यात २ टोमॅटो बारिक चिरुन टाकले. हाताला लागतिल ते मसाले (यात मालवणी, संडेस्पेशल, येताना आईने दिलेला घरचा स्पेशल मसाला) टाकले. तेल बाजुने सुटे पर्यंत परतत राहीलो. मग त्यात ते हाडाळ मटण टाकल. मीठ चाखल. नी दिल कुकरच झाकण लावुन. मध्ये मध्ये त्या सुक्या मटणाला पण कलथ्याने उलथत होतो.
चांगल्या ३ दणदणीत शिट्या घेतल्या.
सगळ पार पडता पडता १०:३० वजले होते. पोटात कावळ्यांनी उच्छाद मांडला होता.
एकच कुकर आसल्यने परत भात लावुन कुअकर सुटायची वाट पाहण्याच त्राण उरल न्हवत.
घरी लेबनीस रोट्या(कबुस) होत्याच. त्यावरच ताव मारला.

या मंडळी जेवायला....

सुक मटण.

मटण रस्सा.

प्रतिक्रिया

अंतु बर्वा's picture

15 Sep 2009 - 10:37 pm | अंतु बर्वा

मा कसम!!! येकदम खतरनाक दिसुन र्‍हायलय बावा....

चतुरंग's picture

15 Sep 2009 - 10:38 pm | चतुरंग

अहो आम्ही सामिष भोजनाचे आता आस्वादक नसलो तरी तुमची ही जिगरबाज पाकृ आम्हाला अंमळ हळवी करुन गेली आणि कोणे एके काळी आम्हीही नळ्या तोडलेल्या आहेत ह्याची याद जागी करुन गेली!
बल्लवगिरीबद्दल अभिनंदन! :)
(एकच शंका - एवढी भूक लागली तरीही भरल्या ताटाचा फोटू काढू शकलास म्हणजे नवलच म्हणायचे! :?)

(निरामिष)चतुरंग

गणपा's picture

16 Sep 2009 - 2:05 am | गणपा

रंगाशेठ रिकाम्या ताटाचा फोटु टाकला तर संपादक आयडी ब्लॉक करतात अस ऐकलय ;) म्हणुन भुलेल्या पोटी आधी फटु काढला..

चतुरंग's picture

16 Sep 2009 - 2:21 am | चतुरंग

काय हा संपादकांचा धाक?
अहो उगीचच मला हुकुमशहा असल्यासारखे वाटले! ;)

चतुरंगीनेजाद

लवंगी's picture

15 Sep 2009 - 10:45 pm | लवंगी

लहानपणीच्या लसूण सोलण्याच्या आठवणींनी अमळ हळवी झाले..
आता भारतात परतताना वाट वाकडी करून तुझ्याकडे यावच लागणार बघ!

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Sep 2009 - 10:49 pm | बिपिन कार्यकर्ते

निरामिष वगैरे जाऊ दे... पण गणप्याच्या संगतीत असताना काय काय गमावलं याची चुटपूट लागून राहिली आहे.

कधी बोलला नाहीस रे!!!! बघून घेईन.

बिपिन कार्यकर्ते

लवंगी's picture

15 Sep 2009 - 11:00 pm | लवंगी

:)

गणपा's picture

16 Sep 2009 - 2:17 am | गणपा

भौ येकी इकडे विमान वाकड करुन. त्यानिमिताने आपले पाय आमच्या घरला लागतिल.

श्रावण मोडक's picture

15 Sep 2009 - 10:55 pm | श्रावण मोडक

केवळ छळवाद!!
ओ संपादक, हे फोटो आक्षेपार्ह आहेत. भावना भडकवतात. त्यांना इथे कसे काय ठेवता हो? उडवा ते पटापट, नाही तर दंगल व्हायची. ;)

बेसनलाडू's picture

15 Sep 2009 - 11:06 pm | बेसनलाडू

(पीडित)बेसनलाडू

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Sep 2009 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते

मी पण सहमत !!! :(

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

15 Sep 2009 - 11:14 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : ह्या बिपिनचा बोटचेपेपणा दिवसेंदिवस वाढायला लागलाय! संपादक असून फोटू उडवत नाही म्हणजे काय? मग आम्हालाही नाईलाजाने हो ला हो म्हणावं लागतं! ;))

(हुजर्‍या)चतुरंग

श्रावण मोडक's picture

15 Sep 2009 - 11:18 pm | श्रावण मोडक

(खुद के साथ बातां : ह्या बिपिनचा बोटचेपेपणा दिवसेंदिवस वाढायला लागलाय! संपादक असून फोटू उडवत नाही म्हणजे काय? मग आम्हालाही नाईलाजाने हो ला हो म्हणावं लागतं! Wink)
'घरचा आहेर' की काय? तोही फिकट रंगात. पुन्हा खाली सहीत हुजऱ्या... =))

दशानन's picture

16 Sep 2009 - 8:52 am | दशानन

गचकलो !

*

हे बघा रोज रोज गचकणे जमणार नाही, च्यामायला... हे फोटो बघितलं की जीव चिमणी एवढा होतो... व तोंड एकदम रडवं !

त्यामुळे आजपासून सुगरण गँग च्या कुठल्या ही मेंबरच्या पाककृतीच्या दुव्यावर क्लिक करणार नाही................ ;)

संदीप चित्रे's picture

15 Sep 2009 - 11:13 pm | संदीप चित्रे

अरे काय फोटो टाकलेत.
नुसते फोटो बघूनच भूक लागलीय.

रेवती's picture

15 Sep 2009 - 11:01 pm | रेवती

मी शाकाहारी असूनही आपल्याला दाद देण्याचा मोह आवरला नाही.
हे एवढं सगळं केलत म्हणजे 'बल्लव दि ग्रेट' आहात असे म्हटले पाहिजे.

रेवती

अगगगगगगगगगगगग्गगगगग्गाग

सकाळी ती लवंगी आणी आता तू....का छळ करता रे....
आमच्या सारख्या मेसवर गुजराण करणार्‍यांच्या नवाने चित्राहूती देत जा बाबा...

स्वगतः तुम्ही नुसतं बघत बसा...बनवू नका कही रूमवर... :)

विसोबा खेचर's picture

15 Sep 2009 - 11:35 pm | विसोबा खेचर

गणपा, लेका आजपासून मिपा तुझ्या मालकीचं! जा...!

तात्या.

:)

गणपा's picture

16 Sep 2009 - 3:37 am | गणपा

तात्या आभारी आहे. भा.पो.
असाच स्नेह राहुद्या.

दिपाली पाटिल's picture

16 Sep 2009 - 2:10 am | दिपाली पाटिल

हे नुसतं प्रयोग आहे तर मनापासुन कराल तेव्हा कसं बनवाल...एकदम भारी

दिपाली :)

चित्रा's picture

16 Sep 2009 - 8:09 am | चित्रा

असेच म्हणते. छान आहे उद्योग.

छोटा डॉन's picture

16 Sep 2009 - 6:49 am | छोटा डॉन

नुस्ता फोटो पाहुनच डोक्यावर शॉट निघाला.

तसे आम्ही ह्या सर्वांपासुन दुर असलो तरी हा फोटो मात्र जीव जळवुन गेला, बाकी लिखाण मस्तच.
शुद्ध शाकाहारी असलेल्या माणसांच्या एवढ्या प्रतिक्रिया आल्या हे अपल्या पाकृचे यश आहे, सलाम बॉस !!!!

------
(सकाळीच सकाळी फोटो पाहुन डोक्यावर आपटलेला)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Sep 2009 - 10:31 am | ब्रिटिश टिंग्या

लै भारी फुटू! अंमळ इनो घेतला!

अवांतर : केवळ सुरेख फुटुच नव्हे तर डान्या डोक्यावर आपटलेला आहे हेदेखील सिद्ध केल्याबद्दल मिपाच्या नव्या मालकांचे विशेष अभिनंदन!

गणपा's picture

16 Sep 2009 - 1:10 pm | गणपा

डान्राव यापुढे मिपा मिपा खेळताना पण हेल्मेट घालत चला ;)

नंदन's picture

16 Sep 2009 - 7:10 am | नंदन
सहज's picture

16 Sep 2009 - 7:26 am | सहज

अहो तुमच्याकडे पार्टी ऑर्डर नोंदवायची असेल तर, घरपोच सेवा देता का? अजुन मेन्यु काय काय आहे?


१) काही संगितकार आधी चाल बनवतात मग कवी गाणे लिहतो, तसे गणपादादानी फोटो शोधला मग पाकृ बनवली का?
२) गणपा पेशाने उत्कृष्ट बल्लवाचार्य आहेत का?
३) ठीक आहे उत्तम डीश बनवली पण अशी सजावट देखील?
४) का एका ठिकाणचे बॅचलरहूड सुरु झाले तरी दुसर्‍या ठिकाणी गणपा लोखंडे कार्यरत? तो गणपा नव्हेच! ;-)

लै भारी मॅन(अगदी टू गूड टू बी ट्रु मॅन)!!! आणि हो मिपाचे नविन मालक नात्याने रामराम :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2009 - 7:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै(च) भारी मॅन(अगदी टू गूड टू बी ट्रु मॅन)!!! आणि हो मिपाचे नविन मालक नात्याने रामराम :)

असेच म्हणतो !

-दिलीप बिरुटे

sujay's picture

16 Sep 2009 - 8:23 am | sujay

कातील मटण. सलाम.
आजवर कुठल्याही बॅचलर ने कांद्याची पात, काकडी, कांदा आणी टोमॅटो ने ईतक उत्तम सजवलेला ताट बघीतल नव्हता, तुमच्या ह्या पेशंस करता अजून एकदा सलाम.

(मटणखाऊ बॅचलर) सुजय

समंजस's picture

16 Sep 2009 - 11:05 am | समंजस

झक्कास झाली आहे पाकृ.
मी मटन खात नाही, पण हे फोटो बघून खाण्याची खूप ईच्छा झाली आहे =P~

अनिल हटेला's picture

16 Sep 2009 - 8:31 pm | अनिल हटेला


झक्कास झाली आहे पाकृ.
मी मटन खात नाही, पण हे फोटो बघून खाण्याची खूप ईच्छा झाली आहे

एकदम सहमत ...
येत्या शुक्रवारी ट्राय मारायला पायजे ,काय ? ;-)

(चिकन प्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

स्वाती२'s picture

16 Sep 2009 - 5:29 pm | स्वाती२

सजवलेले ताट पाहून मटण न खाण्याचा निश्चय आता डळमळायला लागलाय.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2009 - 12:38 am | प्रभाकर पेठकर

जीवघेणी छायाचित्र आहेत. (बोकडचा बिचार्‍याचा जीव घेतलाच आहे.)

फक्त स्वतःसाठी स्वयंपाक करून जेवणाचे ताट इतके सुशोभित करून जेवणे हीच खरी रसिकतेची पावती. अभिनंदन.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

satish kulkarni's picture

17 Sep 2009 - 11:34 am | satish kulkarni

सु ..रे..ख....

(शाकाहारी ) सतिश

गणपा's picture

17 Sep 2009 - 1:16 pm | गणपा

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार.
-गणपा.

खादाड's picture

18 Sep 2009 - 4:05 pm | खादाड

(मोज-मापं विचारु नका. आम्ही हे सार अंदाजान केलेल है.)
हे आवड्ल् !!!
फोटो व्वा! चवीचा विचार करुन आहाहा झाल!

आर्य's picture

30 Sep 2009 - 10:04 pm | आर्य

झकास !!!!!!!!!!!!
नुस्ता फोटो बघुन पैसे फिटले राव !
(व्हेज) आर्य

हरकाम्या's picture

1 Oct 2009 - 1:40 am | हरकाम्या

गणप्या रेसिपीचे फोटु बघुन एकदम 'खल्लासच " हे अस तुला कस सुचत रे ?

jaypal's picture

1 Oct 2009 - 7:17 pm | jaypal

सुके मटणाचा तपशिल अपुरा वाटला.

श्रीयुत संतोष जोशी's picture

2 Oct 2009 - 2:59 pm | श्रीयुत संतोष जोशी

१ नं. लै भारी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.