माझा ही स्वयं(पाक)प्रयोग
सध्या परत बॅचलर लाईफ चालु आहे. त्यामुळे स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न स्वतःलाच सोडवावा लागतोय.
ईतके दिवस खिचडी नी मॅगी वर भागवत होतो, पण ह्या मिपाच्या सुगरणी नी सुगरणे जिवावर उठल्या सारखे एका मागोमाग एक खरनाक रेशीप्या नी फोटु टाकुन आमचा (आदरार्थी एकवचन) जीव खाउन राहीली.
म्हटल गण्या त्या तै लोक काय आपल्याला खाऊ खालनार नाहीत, आपणच आपल्या जिभेचे चोचले पुरवावे.
ऑफिस सुटल्यावर तडक गेलो खाटका कडे. फर्मास १/२ किलो कोवळ बोकडाच मटण घेतलं.
बाकीचे जिन्नस सुदैवाने घरी होतेच. (हा गैरसमज घरी गेल्यावर लगेच दुर झाला.)
घेतल भीमाच नाव नि शिरलो स्वयंपाकगृहात.
एका डिश ने काय होणार??? म्हणुन दोन वेगळे पदार्थ करायच ठरवल.
मटण चांगल २-३ पाण्यात धुवुन घेतल. मटणाचे दोन भाग केले, एक बोनलेस, आणि एक हाडाळ. थोडी हळद लावुन बाजुला ठेवल. आल लसणाची पेस्ट आणायला फ्रि़जमध्ये डोलावलो आणि पहिली विकेट पडली. नो पेस्ट. चरफडत लसुण सोलायला घेतला. (माझ्या लहानपणी, लसुण सोलणे आणि सुक खोबर किसणे ह्या जहाल शिक्षा होत्या माझ्यासाठी. ) नशिबाने आलं होत. लसुण आणि आलं वाटुन घेतल. मग प्रत्येक भागला आल लसणाची ताजी पेस्ट,मीठ,मसाला लावला. (मोज-मापं विचारु नका. आम्ही हे सार अंदाजान केलेल है.) हाडाळ भागात थोड दही घातल. बोनलेस मध्ये एक लिंबु पिळल आणि दोन्ही फ्रि़जमध्ये मुरत ठेवल.
मग बाकिच्या तयारी कडे वळलो.
दोन कांदे उभे आणि एक बारिक चौकोनी चिरुन ठेवले. फ्राइंगपॅन मध्ये थोड तेल घेउन त्यात लवंग, दालचिनी, काळीमिरी आदी खडामसाला टाकुन २ मिनिट परतुन त्यात उभा चिरलेला कांदा गुलाबी होइस्तो परतुन मग एका ताटात काढुन ठेवल. खोबर भाजयला डबा उघडलानी दुसरी विकेट गेली. एकदा वाटल कि कराव खोबर्याशिवाय. पण हॅ.. खाईन खोबर्याशीच म्हणत पायात वहाणा सारल्या. तरी बर दुकान घरापासुन जव़ळच (गाडीने फक्त २० मिनिटावर ) आहे. तिकडे दुकानात खिसलेल खोबर पाहुन कोण आनंद झाला सांगु. अंमळ हळवा झालो क्षणभर. दुकानातले सोप्स्कार आटोपुन गाडी परत घरा कडे वळली.
एव्हना ८ वाजले होते. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. म्हटल गण्या तु करणार कधी नि हाणणार कधी?
झटपट खोबर भाजुन घेतेल, त्यात थोड लालतिखट घातल भाजताना. नंतर हे खोबर आणि मगासचा खडा मसाला + कांदा मिक्सर मध्ये वाटुन घेतलं.
सुक मटण करण्यासाठी , बोनलेस मटण फ्राइंगपॅन मध्ये थोड तेल घेउन त्यात टाकल. खाली लागुनये म्हणुन थोड पाणी टाकल.
एकिकडे सुक्यामटणावर संस्कार होत होते तोवर रश्याची तयारी चालु केली. कुकरमध्ये तेलावर थोडा खडामसाला परतुन , बारिक चिरलेला कांदा पार गळे पर्यंत परतला. मग त्यात २ टोमॅटो बारिक चिरुन टाकले. हाताला लागतिल ते मसाले (यात मालवणी, संडेस्पेशल, येताना आईने दिलेला घरचा स्पेशल मसाला) टाकले. तेल बाजुने सुटे पर्यंत परतत राहीलो. मग त्यात ते हाडाळ मटण टाकल. मीठ चाखल. नी दिल कुकरच झाकण लावुन. मध्ये मध्ये त्या सुक्या मटणाला पण कलथ्याने उलथत होतो.
चांगल्या ३ दणदणीत शिट्या घेतल्या.
सगळ पार पडता पडता १०:३० वजले होते. पोटात कावळ्यांनी उच्छाद मांडला होता.
एकच कुकर आसल्यने परत भात लावुन कुअकर सुटायची वाट पाहण्याच त्राण उरल न्हवत.
घरी लेबनीस रोट्या(कबुस) होत्याच. त्यावरच ताव मारला.
या मंडळी जेवायला....
सुक मटण.
मटण रस्सा.

वाचने
21616
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
मा कसम!!!
क्या बात गण्याभौ!
In reply to क्या बात गण्याभौ! by चतुरंग
रंगाशेठ
In reply to रंगाशेठ by गणपा
हा हा हा!
अरे क्या बात है!!
हम्म्म्म!!!
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
अरे तो छुपा रूस्तुम आहे
In reply to हम्म्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
भौ येकी
छळवाद
In reply to छळवाद by श्रावण मोडक
सहमत आहे
In reply to सहमत आहे by बेसनलाडू
+२
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
+ ३ सहमत आहे!
In reply to + ३ सहमत आहे! by चतुरंग
हाहाहाहाहा
In reply to + ३ सहमत आहे! by चतुरंग
+४
In reply to छळवाद by श्रावण मोडक
असंच म्हणतो
मी
अगगगगगगगगगगगग्गगगगग्गाग
गणपा, लेका
In reply to गणपा, लेका by विसोबा खेचर
तात्या
हे नुसतं
In reply to हे नुसतं by दिपाली पाटिल
+१
खल्लास !!!
In reply to खल्लास !!! by छोटा डॉन
:)
In reply to खल्लास !!! by छोटा डॉन
हेल्मेट
खल्लास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गणपाजी अग्ग्ग्ग!
In reply to गणपाजी अग्ग्ग्ग! by सहज
असेच म्हणतो.
खल्लास !!
झक्कास!!!
In reply to झक्कास!!! by समंजस
असेच बोल्तो !!!
सजवलेले
अरे व्वा...!
वा!!!
आभार
(मोज-मापं
झकास
खल्लास.
लै भारी
लै