नव्या मनुची नवी माणसे, नवहृदयाची नवभाषा
नवे रंग हे नवीच आशा, नवक्षितिजे अन नव्या दिशा
नवजीवनाच्या रांगोळीत हे, भरून टाकशी रंग नवे
सुखदु:खाच्या ठिपक्यांमधली, जागा भरूनी काढू सवे
शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना
नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा
गाऊ आपण गीत नवे, तो राग नवा, हा ताल नवा
नव्या बंदीशी, नवीन भाषा, अपुला गावा ख्याल नवा
अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या
नव-वाटेचे नवीन फाटे, ध्येय नवी अन दिशा नव्या
वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे
किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे
हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे
नवपर्वाच्या सुरवातीला याहून शुभ ते काय घडे?
प्रतिक्रिया
8 Sep 2009 - 2:04 am | धनंजय
अगदी झोकदार आणि आशादायक कविता.
मस्त!
8 Sep 2009 - 9:48 am | अवलिया
हेच बोल्तो
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Sep 2009 - 12:07 pm | बिपिन कार्यकर्ते
+२
बिपिन कार्यकर्ते
8 Sep 2009 - 10:47 am | Nile
वा! छान आहे कविता, आवडली. :)
8 Sep 2009 - 2:39 am | प्राजु
के व ळ अ प्र ति म!!!
शरद नको अन ग्रीष्म नको हो, वसंत तो झालाच जुना
नव्या ऋतुची नवी पालवी, त्यावर अपुल्या पाऊलखूणा
खासच!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Sep 2009 - 12:35 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
8 Sep 2009 - 2:49 am | पाषाणभेद
नकोत राष्ट्रवादी, नको काँग्रेस, नकोच भाजपा, कघिच नको बहूजन जुन्या वळणाची;
जुने पक्ष सोडूनी हे सर्व, साथ धरूया आता महाराष्ट्र नवनिर्माणाची
कवितेतले 'नव' हे शब्द जरा काही माझ्यासारखा अवांतर विचार न करता वाचा. कविता अगदी नविन आशय असलेली दिसेल.
माझी वर्णी जर शालेय पाठ्यपुस्तक मंडळावर लागली तर ही कविता नक्की अभ्यासक्रमात लावेन.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
8 Sep 2009 - 9:22 am | फ्रॅक्चर बंड्या
फारच छान
8 Sep 2009 - 9:55 am | राघव
क्लास! मस्त लिहिलेस ऋषीकेशा.. खूप आशादायक.
असेच लिहित रहा रे! :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
8 Sep 2009 - 10:44 am | दत्ता काळे
फार आवडली.
8 Sep 2009 - 10:44 am | मदनबाण
छान... :)
मदनबाण.....
लडाख सीमेवर चीनची घुसखोरी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=596...
8 Sep 2009 - 12:04 pm | विमुक्त
भारी एकदम... साधी, सरळ आणि प्रभावि... वाचताना एकदम छान वाटलं...
9 Sep 2009 - 9:04 am | चित्रा
छान जमली आहे कविता.
9 Sep 2009 - 8:51 am | क्रान्ति
अपुले असतील प्रश्न नवे, उत्तरे नवी, अन चुका नव्या
नव-वाटेचे नवीन फाटे, धेय्यं नवी अन दिशा नव्या
वळूनी बघता पाठीमागे, आठवणींचा गोफ दिसे
किती भासले सुंदर तरीही, गोफ नसे ते जाल असे
छान! सुरेख कविता.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
9 Sep 2009 - 10:44 pm | ऋषिकेश
येथे तसेच खरडी-व्यनींतून प्रतिसाद देणार्या सार्यांचे आभार
(आभारी)ऋषिकेश
10 Sep 2009 - 7:51 pm | लिखाळ
वा !!
छान कविता..
गोफ-जाल मस्त :)
धेय्यं ?... ध्येय असा शब्द आहे ना? त्याचे अनेकवचन ध्येय असेच राहत असावे ध्येये/ध्येयं असे होत नसावे असा अंदाज.
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
10 Sep 2009 - 9:07 pm | ऋषिकेश
कवितेत सुचनेप्रमाणे बदल केला आहे.
लिखाळराव, आपले प्रतिक्रीया व सुचवणीबद्दल अनेक आभार
ऋषिकेश
11 Sep 2009 - 12:00 am | प्रशांत उदय मनोहर
छान. आवडली.
आपला,
(काव्यप्रेमी) प्रशांत
---------
विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते :?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
11 Sep 2009 - 12:04 am | प्रशांत उदय मनोहर
"नव्या मनूचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी" हे शब्द असलेली कविता आठवली.
त्यात "जुने फेकुनी नवीन घ्या" हा सूर होता (जुनं फेकण्याचा जास्त होता..)
तुमची कविता जास्त सकारात्मक आहे.
छान. आवडली.
आपला,
(काव्यप्रेमी) प्रशांत
---------
विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते< /span> :?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
11 Sep 2009 - 12:05 am | नंदन
छान (आणि समयोचित ;)) कविता.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Sep 2009 - 1:26 pm | अजिंक्य
छान कविता.
हातामध्ये हात देऊनी, चल टाकू पाऊल पुढे
नवपर्वाच्या सुरवातीला याहून शुभ ते काय घडे?
आवडलं. लगे रहो.
-अजिंक्य.