मिपाकरहो,
नमस्कार. स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने बंद ठेवावे लागलेले आपले यज्ञकर्म उपहारगृह आज दिनांक ६ सप्टेंबर २००९ रोजी पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले आहे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपल्या सोयी नुसार लवकरात लवकर यज्ञकर्मास भेट देऊन चमचमीत पदार्थांची लयलूट करावी.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
7 Sep 2009 - 2:37 am | सुहास
अरे वा!
आपले स्वागत असो..! बाप्पा करो नि हा "वराह ज्वर" स्वाईन फ्ल्यूचा विषाणू पृथ्वीतलावरून कायमचा नष्ट होवो ..!!
अवांतरः आपले "यज्ञकर्म" कुठे आहे ते कळेल का? पुण्यात असेल तर नक्की येऊ..
--सुहास
7 Sep 2009 - 8:03 am | प्रभाकर पेठकर
यज्ञकर्म उपहारगृह.
चमचमीत निरामिष आणि चटकदार सामिष पदार्थांची रेलचेल
पत्ता: सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८.
१) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला
'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
२) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.)
३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
7 Sep 2009 - 8:17 am | सुधीर काळे
पेठकरसाहेब,
हॉटेलचे नाव "यज्ञकर्म" असल्याने "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!" या श्लोकाचा आधार/फायदा घेऊन "लवकरात लवकर यज्ञकर्मास भेट देऊन चमचमीत पदार्थांची लयलूट करावी" असे लिहायच्या ऐवजी "लवकरात लवकर यज्ञकर्मास भेट देऊन उदरभरण" करावे असे लिहावे! तुमच्या उपहारगृहावर पाटीसुद्धा अशीच लावायला हरकत नाही. सूचनेचा विचार व्हावा. यज्ञकर्म कुठे आहे? पुण्यात असेल तर नक्की "यज्ञा"त "स्वाहा" करायला येऊ.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
7 Sep 2009 - 8:28 am | प्रभाकर पेठकर
यज्ञकर्मास भेट देऊन उदरभरण" करावे असे लिहावे!
'उदरभरण' हा उदेश न ठेवता 'यज्ञकर्म' भावनेतून जठराग्नीस आहुती द्यावी, तद् योगे चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
वर पत्ता दिलेला आहेच.
धन्यवाद.
7 Sep 2009 - 8:29 am | विसोबा खेचर
वेलकम ब्यॅक! :)
तात्या.
7 Sep 2009 - 8:31 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद तात्या. कधी येताय पुण्यात? १५ तारखेच्या आत जमण्यासारखे आहे का?
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
7 Sep 2009 - 8:54 am | एकलव्य
पंतांची आवाहनवजा सूचना मिपाफलकावर झळकलेली पाहून आनंद झाला. शुभेच्छा!
आमची संधी तर हुकली... आता बघूया पुन्हा कधी जमते ते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुणे आता स्वाईनफ्लुच्या दहशतीमधून बाहेर पडते आहे हे वाचूनही छान वाटले.
7 Sep 2009 - 1:24 pm | JAGOMOHANPYARE
आडनाव देखील 'पेट'कर हवे होते.. :) पुण्याला आलो की येऊ/जेऊ/खाऊ... कुठले क्रियापद वापरावे आता ?
7 Sep 2009 - 1:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी
माझी मावशी डहाणुकरलाच राहते.पुण्यात आल्यावर नक्की येइन.
7 Sep 2009 - 4:42 pm | सुनील
यज्ञकर्म पुन्हा सुरू झाल्याचे वाचून आनंद झाला. खुद्द पुणे शहरात येणे फारसे होत नाही (कालच वाईहून आलो पण शहराला बगल देत!). परंतु, येणे झालेच तर यज्ञकर्माला भेट ठरलेलीच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
7 Sep 2009 - 4:53 pm | विसुनाना
'यज्ञकर्म' हे केवळ 'उप'आहारगृह नाही तर पूर्णाहारगृह आहे.
दोनदा जाऊन खात्री करून घेतली आहे.
चवदार मत्स्याहार, उत्कृष्ट सोलकढी यांबरोबरच पदार्थांचे हात न राखता वाढप आणि माफक - वाजवी दर यांच्यामुळे 'यज्ञकर्म' करणे आणि जठराग्नीला आहुती देणे हे पुणेवारीतले पुण्यकर्मच आहे. :)
सर्वांनीच हे पुण्य जोडावे.
पेठकरांचे समस येत असतातच!
8 Sep 2009 - 2:28 am | चतुरंग
अक्षरशः उरकली. स्वाईनफ्लू आणी इतरही अनपेक्षित गोष्टींनी मनासारखे काही झाले नाही. पण पुढच्यावेळी यज्ञकर्माला भेट द्यायचा योग असेल असे वाटते. आलो की कळवूच.
(खवैय्या)चतुरंग
8 Sep 2009 - 11:14 am | प्रभाकर पेठकर
जरूर भेट द्या. भेट सत्कारणी लावा. निराशा होणार नाही ह्याची खात्री मी देतो.
धन्यवाद.
(पुढील वारी, साधारणपणे, कधी आहे?)
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
9 Sep 2009 - 12:33 am | संदीप चित्रे
माझीही ह्यावेळची पुणे वारी जेमतेम दीड आठवडे असल्याने खूप गोष्टी ठरवूनही जमल्या नाहीत. पुढच्या वेळी तरी जमवायला(च) हवं.
---
'यज्ञकर्म' पुन्हा सुरू झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
9 Sep 2009 - 11:06 am | प्रभाकर पेठकर
नुसती 'पुढच्या वेळी' नाही, 'पुढच्या वेळे पासुन नेहमी', दर पुणेवारीत यज्ञकर्मास भेट द्यावी ही आग्रहाची विनंती.
धन्यवाद.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
8 Sep 2009 - 11:19 am | सूर्य
लवकरच यज्ञकर्मास भेट देण्याचा प्लान बनवतो.
- शशांक
8 Sep 2009 - 11:22 am | दिपक
लवकरच यज्ञकर्मास भेट देण्याचा प्लान बनवतो.
+१
प्लान बनवलायाच हवा. :)
(खादाड) दिपक
8 Sep 2009 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर
जरूर या. मित्रपरिवारांस घेऊन या.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
8 Sep 2009 - 3:46 pm | विश्वजीत
हे माझ्या घरापासून चालत दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. दुर्दैवाने मी आता शाकाहारी असल्याने मत्स्याहार वर्ज्य! सोलकढीवरच तहान भागवेन म्हणतो. बाकी शाकाहारी मेनूसुद्धा भक्कम असेलच.
9 Sep 2009 - 12:25 am | प्रभाकर पेठकर
बाकी शाकाहारी मेनूसुद्धा भक्कम असेलच.
बरोब्बर ओळखलेत. शाकाहारी भोजनासाठीही यज्ञकर्माशिवाय पर्याय नाही.
10 Jul 2014 - 10:24 pm | नांदेडीअन
जवळपास 5 वर्षं झाली या धाग्याला.
अजूनही सुरू आहे का यज्ञकर्म ?
10 Jul 2014 - 10:59 pm | बहुगुणी
माझ्या माहितीप्रमाणे, दुर्दैवाने, नाही.
मस्कत मधील व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी (किंवा अन्य काही कारणाने) पेठकर साहेबांनी 'यज्ञकर्म' बंद केल्याचं मिपावर वाचल्याचं आठवतंय. दरवेळी त्या चौकातून जातांना नजर थबकतेच आशेने, पण या उपहारगृहात भोजनाची वेळ काही साधता आली नाहीच याची खंत वाटते....पुन्हा सुरू करतील अशी आशा आहे.
11 Jul 2014 - 1:08 am | प्रभाकर पेठकर
नांदेडिअन आणि बहुगुणी,
दुर्दैवाने हे खरं आहे की यज्ञकर्म मला बंद करावं लागलं. तत्कालीन H1N1 साथीत बहुसंख्य लोकांनी उपहारगृहात खाणे बंद केले होते. तेंव्हा तो डोलारा सांभाळणे मला अशक्य झाले. शिवाय, मस्कतात व्यवसायाला नव्याने बहर आला होता आणि भारतात राहिलो तर आखाती प्रदेशातील माझे उत्पन्नही करप्राप्त होत होते. ह्या सर्व घटनांचा परिपाक म्हणून यज्ञकर्म बंद करून पुन्हा मस्कतवासी होणे मी स्विकारले.
असो. तुमची गैरसोय झाल्याबद्दल क्षमस्व.
11 Jul 2014 - 11:25 am | नांदेडीअन
हा काय, जस्ट शोधाशोध करून आलो यज्ञकर्मची.
ताठे मित्रमंडळ गणपतीजवळ खूप शोधले, पण सापडलेच नाही.
आत्ता घरी येऊन वाचला तुमचा प्रतिसाद.
11 Jul 2014 - 11:58 am | प्रभाकर पेठकर
माझ्या माहितीनुसार त्या जागेत आता आयडियाचे केंद्र उघडले आहे.