नुक्ता चीं हैं गमे दिल
उनको सुनाये ना बने...
ह्या गझलची जादू अशी की तीने अनेक गायक, संगीतकारांना वेड लावले.
हि मिर्झा गालीबची गझल, अनेक संगीतकारांनी चालीत बांधली.
अनेक गायकांनी ती गायली.
ह्या गझलच्या अनेक छटांचे संकलन करण्याचा मानस आहे.
ह्या पैकी सुरय्या, नुरजहाँ, रफी साहेब व सैगल साहेबांच्या आवाजातील गझल यु ट्युब वर उपलब्ध आहेत.
हि गाणी येथे ऐकता येतील.
आणखी गायक, संगितकारांच्या छटा हव्या आहेत.
कृपया मिपाकरांना माहीत असल्यास दुवे द्यावेत.
प्रतिक्रिया
30 Aug 2009 - 4:37 pm | विसोबा खेचर
फार सुंदर गाणं आहे हे!
तात्या.
31 Aug 2009 - 10:57 pm | संजय अभ्यंकर
मिपावरिल जाणकार मंडळी कोठे आहेत?
प्रमोदजी या गाण्यावर प्रकाश टाकू शकतील!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
1 Sep 2009 - 8:44 am | सुधीर काळे
नुक्ताचीं म्हणजे शब्दाचा कीस काढणारा, tending to find and call attention to faults, an excessively demanding and faultfinding tutor, having a disposition to find fault unreasonably or to raise petty objections; Intended to capture or entrap
त्यावर कतील शिफाई यांचा एक छान शेर आहे:
वही तो ज्यादा नुक्ताचीं है मेरा
जो मुस्कुराके हमेशा गले लगाये मुझे!
(जी माझ्यावर प्रेम करते तीच माझ्या चुका सर्वात जास्त काढते, माझी सगळ्यात मोठी टीकाकार आहे.)
ही गज़ल नंतर रात्री ऐकेन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
1 Sep 2009 - 2:56 pm | दिगम्भा
नुक्ता म्हणजे उर्दू अक्षरांखाली दिला जाणारा बिंदू पण व्यापक दृष्टीने एखादा दोष असा अर्थ असावा.
चीनी म्हणजे बघणे आणि चीं म्हणजे बघणारा.
यावरून नुक्ताचीं म्हणजे (कोणत्याही गोष्टीमधील केवळ) दोष पहाणारा किंवा शोधणारा. बाकी सगळे सुंदर असले तरी हा पहा यावर एक काळा डाग आहे असे म्हणणारा.
आपल्याकडे याला समानार्थी शब्द छिद्रान्वेषी, म्हणजे भोक शोधणारा, हा आहे. सुंदर वस्त्र पाहूनसुद्धा त्याला भोक कुठे आहे हेच जो बघतो/शोधतो असा.
मग "गमे दिल"नुक्ताची कसे, तर सर्व काही सुख आहे असे त्याला समजावू पाहिले तरी त्यात प्रेमाची उणीव आहे असे सांगते व ऐकत नाही म्हणून.
(पुढचे शे'रही चांगलेच आहेत.)
सैगलच्या गाण्यात मला एक अडचण येते ती म्हणजे ताल नीट ऐकू येत नाही. त्यामुळे तो मारे आडलयीत उत्तम गात असेल पण मला ते गाणे बेताल चालले आहे असे भासते.
- दिगम्भा
1 Sep 2009 - 3:11 pm | प्रमोद देव
उर्दू अजिबात कळत नाही...त्यामुळे इथे त्यातल्या जाणकारांनी अर्थ समजावून दिला असला तरी गाण्यातले शब्द माझ्या कानात फारसे घुसलेच नाहीत. तसं गाण्यातलंही फारसं कळत नाही म्हणा. :) पण ऐकायला गोड वाटलं.
तिघांनीही आपापल्या ढंगात ही गजल मस्त म्हटलेय.
सैगलसाहेबांचे गाणे म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच आहे. मी त्यांच्या गाण्याचा निस्सीम चाहता आहे.
दुव्याबद्दल संजय अभ्यंकराचे मन:पूर्वक आभार.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
1 Sep 2009 - 7:39 pm | संजय अभ्यंकर
काळे साहेब व दिग्म्भांनी गाण्याचा अर्थ चांगला समजावून सांगीतला.
जर हे गाणे विविध गायक व संगीतकारांच्या सूरांत मिळाले तर हवे आहे, ही नम्र विनंती.
मो. रफीच्या आवाजातले गाणे लोड करायचा प्रयत्न, esnip हाणून पाडला.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
2 Sep 2009 - 1:08 am | विसोबा खेचर
ते गाणं मला पाठवा. मी ते tatyaa.com वर चढवतो आणि सर्वांना ऐकण्याची सोय करतो..
आपला,
(मदतनीस) तात्या.