अर्थ

अ-मोल's picture
अ-मोल in जे न देखे रवी...
16 Aug 2009 - 12:04 pm

दिवस सोन्याचा
आज उगवला
सूर्य स्वातंत्र्याचा
नभावर

अडगळीतून
काढा देशप्रेम
दुर्लक्षाची धूळ
पुसा बरे

सर्वत्र भरो रे
आनंदी आनंद
ऑफर्स ओसंडो
मॉल मॉली

चौकाचौकातून
पांढरे बगळे
विकाया बसोत
देश कार्य

घरोघरी चर्चा
पिकनिक पार्टी
देशप्रेम वाहो
ग्लासो ग्लासी

टीव्हीवर चालो
घोष मुक्ततेचा
नग्नतेचे दास
डोळे होती

मुक्त झालो आम्ही
परि ना कळेना
काय खरा अर्थ
स्वातंत्र्याचा

तुका म्हणे जगी
तोच खरा आहे
बनून जो राही
ब्रॅंड नेम

भारत मार्केट की जय !

कविता

प्रतिक्रिया

अनामिक's picture

16 Aug 2009 - 12:15 pm | अनामिक

कविता आवडली!
तुका म्हणे च्या ऐवजी अम्या म्हणे चालले असते असे वाटले.

-अनामिक

क्रान्ति's picture

16 Aug 2009 - 2:40 pm | क्रान्ति

मुक्त झालो आम्ही
परि ना कळेना
काय खरा अर्थ
स्वातंत्र्याचा
हेच खरंय!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी