न्यूनगंड

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
22 Feb 2008 - 7:01 am

शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग...

लेखक एकटे राहणार्‍या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात.

लेखक विचारतो, "अरे हे काय?"

तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात"

त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो. पलंगावर घालतो आणि मस्तपैकी आडवा होऊन म्हणतो, "हे असे."

हे पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली तरी तो लेख अजुनही मला लक्षात आहे कारण मी स्वत:
पसारा-भक्त आहे. मला पसार्‍यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.

माझे टापटीप नातेवाईक आले आणि त्यांनी स्वच्छतेवर व्याख्यान दिले की मला न्यूनगंड की काय म्हणतात तो छळतो पण तो फार काळ टिकत नाही. नातेवाईक गेल्यावर घटका-दोन घटका हा न्यूनगंड मला ग्रासतो. पुन्हा ये रे मागल्या...

हे ठिकाण

प्रतिक्रिया

लंबूटांग's picture

22 Feb 2008 - 11:22 am | लंबूटांग

मला पसार्‍यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.

सहमत

आणि आवरून ठेवले की डोळ्यासमोरची गोष्ट पण दिसत नाही.

घरी असताना मातोश्रींबरोबर नेहमीच ह्या वरून सुखसंवाद व्हायचा.

"तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही."

आनंदयात्री's picture

22 Feb 2008 - 11:40 am | आनंदयात्री

म्हणतो.

राजमुद्रा's picture

22 Feb 2008 - 11:48 am | राजमुद्रा

मलाही पसार्‍यातच राहायला आवडते, घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. बाकी टापटिप घरात मला टेन्शन येतं.
होटेलात राहिल्यासारखं वाटतं

राजमुद्रा :)

धमाल मुलगा's picture

22 Feb 2008 - 11:59 am | धमाल मुलगा

"तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही."

ल॑बूटा॑ग, गेल्या जन्मीचा माझा जुळा भाऊ आहेस की काय? एकदम शेम टू शेम क॑डिक्शन आपली पण.

"सगळ॑ नीट आवरून ठेवा..समोरची वस्तूसुध्दा सापडणार नाही, तेच जर का उभ॑ घर व्यायल॑ असेल तर त्या पसार्‍यात हात घालून हव्व॑ ते लगेच काढतो...कसल॑ कार्ट॑ जन्माला आल॑य देव जाणे"

(आमच्या आऊसाहेबा॑च॑ आमच्या बाबतीत अत्य॑त लाडक॑ मत.)

मलाही पसार्‍यातच राहायला आवडते, घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. बाकी टापटिप घरात मला टेन्शन येतं.
होटेलात राहिल्यासारखं वाटतं

राजमुद्रा ताई माझ॑ही अगदी हेच मत. मी नेहमी आईला अस॑च वाक्य ऐकवतो.
"घर आणि हॉटेलच॑ रिसेप्शन ह्यात काहीतरी फरक असायला हवा ना? असा पसारा असला की कस॑ आपल॑ जवळच॑ जिव्हाळ्याच॑ वाटत...तस॑ त्या टापटीपीतल्या हॉटेलात वाटत का? नाही ना? शहाणी ना माझी आई ती?? मग असा त्रास नाही द्यायचा मला :)"
लगेच 'तुर॑त से भी पहेले' आमची आयशी हातात जे काही असेल ते घेऊन चालून येते..आपण लगेच "दुर्गे दुर्घट भारी..." चालू करायच॑ आणि आजीमाग॑ लपायच॑..............
ह्म्म्म.. च्यामारी, लय आठवण यायला लागली बॉ घरची :-(

आपला,
- पसार्‍यात पसरलेला
ध मा ल

मनस्वी's picture

22 Feb 2008 - 11:54 am | मनस्वी

थोडा पसारा चालतो.. नाहीतर ते घर कसलं.. पण खूपच असेल तर वेड लागतं.
तो आवरायचा सोडून मी त्याच्याकडे अर्धा तास बघत बसते.. मग आवरायला घेते.

(पदर खोचून (..जीन्सला पदर नसतो बहुतेक)) मनस्वी

भुमन्यु's picture

22 Feb 2008 - 12:13 pm | भुमन्यु

हे खरंय!!!!!!!!!!! कारण मला पण पसार्‍यात सगळं सापडत (कारण ऑर्डर लाईज ईन युवर माईंड)............................पण खुप पसारा पण नाही आवडत.

माझ्य कडे एक पोस्टर होते....त्यात एक पसारयुक्त रूम आणि दारावर लिहिले होते " माय रूम.... लव्ह इट ओर लीव्ह इट"
एक झकास विजुभाऊ

मुक्तसुनीत's picture

22 Feb 2008 - 9:46 pm | मुक्तसुनीत

"अवर हाउस वॉज नीट अँड क्लीन लास्ट वीक. सॉरी यू मिस्ड इट."

बाथरूम मधे :

"अवर एम इज टू कीप धिस प्लेस क्लीन. जेन्ट्स, यूअर एम विल हेल्प ! लेडिज, प्लीज रीमेन सीटेड थ्रु द एंटायर एक्सरसाइज ! "

चतुरंग's picture

22 Feb 2008 - 10:34 pm | चतुरंग

कोणत्यातरी कट्टयावरच तयार झाली असावी असे वाटते:))!

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2008 - 10:02 pm | llपुण्याचे पेशवेll

घरी असताना मातोश्रींबरोबर नेहमीच ह्या वरून सुखसंवाद व्हायचा.

"तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही."

एकदम सहमत बुवा.
पण हल्ली काय होते की घरी कोण येणार असले तर आई घर आवरायला सांगते. मग जो बकरा(मी किंवा भाऊ) उपलब्ध असेल त्याने घर आवरायचे. मग तिथे ज्याचे ज्याचे कपडे, वस्तू असतील त्या त्याच्या त्याच्या कपाटात टाकून्(कोंबून) कपाटाचे मुस्काट दाबायचे.
यथावकाश पाहुणे येऊन गेले की एखाद्या वेळेस वस्तू मिळत नसेल तर प्रश्न "परवा कोणाची मुन्सिपालिटी फिरली होती?"(घर कोणी आवरले होते?) मग ती वस्तू शोधून द्यायची जबाबदारी त्याची. अशा गोष्टी आईसमोर बिलकूल बोलायच्या नाहीत नाहीतर 'गेले बाबांच्या वळणावर' असे ऐकायला मिळते.
मग त्या गरीब बिचर्‍या कपाटाचे तोंड उघडले की ते पोटातल्या सर्व गोष्टी झटक्यासरशी बाहेर काढते. आणि त्याच झटक्यात हवी असलेली वस्तू बाहेर पडली तर होणारा आनंद म्हणजे 'ते ब्रम्हज्ञान गवसल्याच्या' आनंदाच्या तोडीचा असतो.
('पसारा' व्यवस्थेचा पुरस्कार करणारा)
डॅनी
पुण्याचे पेशवे

ऋषिकेश's picture

22 Feb 2008 - 11:00 pm | ऋषिकेश

तू कशाला आवरून ठेवलेस. आता मला अमूक अमूक सापडत नाही आहे." किंवा "तुझ्या कटकटीमुळे आवरून ठेवले आणि आता काहीच मिळत नाही

हा हा हा!!!
माझ्या घरची वाक्य ही अशीच.. पण त्या पसार्‍यालाही एक ऑर्डर असते :) त्या ढिगात कोणती गोष्ट अधी गेली, कोणती नंतर हे लक्षात असतं ;)

प्राजु's picture

22 Feb 2008 - 11:07 pm | प्राजु

हा एक कधिही न संपणारा विषय आहे. आमच्या घरात पसार्‍याशिवाय काहीच नसतं. आणि त्यात आणखी भर घालायचं अतिशय महत्वाचं काम आमचे सुपुत्र (वय वर्षे ४) अगदी चोख बजावत असतात. आणि पसारा न आवरण्याची भीष्मप्रतिज्ञाच केल्याप्रमाणे पतिदेव घरात वावरत असतात. कधी कधी मात्र तो पसारा पाहून डोकं फिरतं आणि मग सगळं घर अगदी झपाटून कामाला लागतं तो पसारा आवरण्याच्या.
मलाही पसारा आवडतो पण खूप नाही.. पसारा करावा पण तो केल्यानंतर स्वतःच आवरावा या मताची मी आहे.
घरच्या स्त्रीला तिच्या कामात मदत नाही करता आली तर निदान तिचे काम आपण वाढवू तरी नये अशीच आईचि शिकवण मिळाली त्याचा हा परिणाम.

- (शक्यतो नीटनेटकी)प्राजु

चतुरंग's picture

23 Feb 2008 - 12:30 am | चतुरंग

लहान असताना आणि त्यानंतर कालेजात असताना.
पण मुळात मी जसा 'पसारेवाला' कॅटेगरी मधला नाही तसा प्रचंड शिस्तीचाही नाही.
थोडा पसारा चालतो पण घर हे 'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र झाले तर मात्र चालत नाही.

अवांतर - 'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ केंद्र'? - होय हे दिव्य नाव मी स्वतः वाचलेले आहे - बिचारे ज्ञानेश्वर, त्यांच्या नावाचा असा वापर केलेला बघून त्यांना वाटले असते की रेड्यामुखी वेद वदवले, भिंत चालवली पण ह्या नारळांना शिकवू शकलो नाही!:))

चतुरंग

विसोबा खेचर's picture

23 Feb 2008 - 12:42 am | विसोबा खेचर

माझ्या मते पसार्‍याशिवाय घराला घरपणच नाही! च्यामारी, स्वच्छ, टापटीप, नीटनेटक्या घरात वावरताना खूप परकेपणा वाटतो! मी तर स्वच्छ आणि टापटीप आणि पॉश घरं असलेल्या लोकांकडे सहसा जातसुद्धा नाही. आपल्याला तर बॉ तिथे फारच अवघडल्यासारखं वाटतं. मोकळेपणा नाही वाटत!

आपला,
(पसाराखोर) तात्या.

ता क - आत्ता हे लेखन करत असताना माझा संगणक जिथे ठेवला आहे तिथे बोंबलायला मजबूत पसारा पडला असून माझे काही महत्वाचे कागदपत्र त्यातच कुठेतरी आसरा घेऊन आहेत. मी त्यांना शोधतो आहे परंतु अजून गावले नाहीत! जाऊ द्या, गेलं सालं बा...! आत्ता झोपतो, उद्या सकाळी जरा निवांतपणे शोधेन म्हण्तो! :)

आपला,
(स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणाची शाणपत्ती करणार्‍यांना फाट्यावर मारणारा!) तात्या.

चतुरंग's picture

23 Feb 2008 - 12:55 am | चतुरंग

>>मी तर स्वच्छ आणि टापटीप आणि पॉश घरं असलेल्या लोकांकडे सहसा जातसुद्धा नाही
पण लोकांकडे गेल्याशिवाय ते स्वच्छ, टापटीप, नीटनेटके की पसारेवाले हे कसं कळणार ?:}} ( हा उगीचच एक चावा, ह.घ्या.!)

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 12:05 pm | सुधीर कांदळकर

मात्र टापटीप ठेवलेला असतो बरे का. तरीहि पसा-याला जागा जरा कमी पडते.

आनंद घारे's picture

24 Feb 2008 - 12:38 pm | आनंद घारे

घरात माणसं राहातात आणि ती जिवंत आहेत असं वाटतं. छान! ते घदते पसार्‍यामुळेच! सगळ्या गोष्टी नीटनेटक्या दिसतील अशा ठेवल्या तर त्याचे शोरूम होते. पसारा करणारा एकच माणूस असेल तर त्याला हवी असलेली वस्तू लगेच सापडते हे खरे असले तरी घरातले अनेक लोक आपापल्या परीने त्यात भर टाकत असले तर मात्र त्यात कोणालाच कांही सापडत नाही हा फक्त एकच दोष त्यात आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापले वेगवेगळे पसारे करावे हे उत्तम.

फक्त घरातच पसारा असतो असे नाही. माझ्या संगणकावरील फाइलींच्या पसार्‍यातून हवी असलेली फाईल शोधणे माझ्याखेरीज दुसरा कोणीही करू शकत नाही, अगदी शोधयंत्रांच्या सहाय्यानेसुद्धा!

'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र ...पुन्यात शनिवार पेठेत सकाळ च्या कोपर्यावर होते....महित नाही अजुन आहे का?
पण बर्याच रद्दी डेपोची नावे ज्ञानेश्वर रद्दी डेपो अशी का असतात ?
ज्ञानेश्वर आद्य मराठी साहित्यीक होते त्याचा असा सूड घेतला जाइल असे त्याना ही वाट्ले नसेल

पार्टनर's picture

3 Jun 2008 - 10:01 am | पार्टनर

शनिवारवाड्याच्या मागच्या गल्लीत आहे.पहिल्यांदा नाव वाचलं तेव्हा हसून हसून गाल दुखायला लागले होते !

- यात्रा,एकादशी, आणि गर्दीला न जुमानता आळंदीला चार वर्षे (बसमधून) वारी केलेला

नादिष्ट

ऋचा's picture

3 Jun 2008 - 10:43 am | ऋचा

मला पसारा 'च' आवडतो,
पण खुप नाही चालत (कारण मलाच आवरावा लागतो) :(

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मलातर पसारा खूपच आवडतो पण आवरायला ! मग तो अगदी गावातल्या आमच्या गोठ्यातला पसारा असो किंवा माझ्या रूममधल्या माझ्या तांत्रिक गोष्टींचा.. सुट्टीच्या दिवशी जर घरी असेन तर अथवा फावला वेळ मिळताच आवडीची गाणी लावून अशी आवरासावर करण्याचा मला भारी उचका येतो. धमाल मजा येते. माझ्या लॅप्टॉपमध्ये झालेला गाण्यांचा पसारा आवरायला मात्र अज्जुन जमलेले नाही मला कारण पसारा आवरायला उत्साह देणारी गाणी कशी ऐकणार मग मी.. झोल आहे ! काहितरी युक्ती काढून तो लवकरच आवरावा लागणारे हे मात्र निश्चित.

अहो, अगदि अस्साच पसारा माझ्या खोलीवर वरही असतो.

पण येणार्‍या प्रत्येकालाच उलट माझ्या समाधानी-आत्मानंदी वृत्तेचं कौतुकमिश्रित हेवा वाटतो.
आणि त्यांनाच न्युनगंड ते जगत असलेल्या अतिसामान्य-तथाकथित व्यव्स्थित आयुष्याबद्दल.
मग मला चहा वगैरे झाल्यावर उगिचच त्यांचं साअम्त्वन वगैरे करावं लागतं.
आणि सम्जवावं लागतं:-
"जाउ द्या हो साहेब, नस्तं एकेकाच्या भाग्यात पसारा करुन ठेवण्याचं सौख्य. त्यात काय इतकं "वगैरे...

आपलाच,
मनोबा

पार्टनर's picture

3 Jun 2008 - 2:06 pm | पार्टनर

कुठेसं वाचलेलं वाक्य आठवलं :

Creating mess is a sign of creativity.

काय म्हणता मंडळी ? :D

शितल's picture

3 Jun 2008 - 6:13 pm | शितल

मला तर घर व्यवस्थित लावायला आवडते, पण खुप पसारा करून म्हणजे मी दिवसातुन एकदाच घर आवरते, माझ॑ लेकरू तर खेळणी, भा॑डी आणि डा. टेबलच्या खुर्च्याच्या गाड्या करून घर भर फिरवत असतो, बाहेरचा आल्यावर आम्ही त्याच्या पुढे आवराआवरीचे प्रयत्न करतो पण पाठ फिरली की परत ये रे माझ्या मागला.
आणि पसार्‍यातीलच वस्तु हाताला पटकन मिळते जर ती आवरून ठेवली तर हरवली हे समजायचे.