राधा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
13 Aug 2009 - 8:57 pm

मिपाकर मंडळींना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
From Pandurang" alt="" />

त्या सावळ्या सख्याच्या रंगात रंगले मी
त्या साजिर्‍या सुखाच्या स्वप्नात दंगले मी

ते स्वप्न सत्य होते, की सत्य स्वप्न होते?
जाणीव-नेणिवेच्या गुंत्यात गुंतले मी

त्या रम्य संभ्रमाची जडली अनाम बाधा
वृंदावनात राधा होऊन गुंगले मी

त्याच्या करात मुरली, मुरलीत सूर झाले,
त्या अधररस सुधेला प्राशून झिंगले मी

हे गोड गुपित माझे सांगू कसे कुणाला?
त्या चित्तचोरट्याचे मन आज जिंकले मी

तो अंतरात वसतो, तो स्पंदनात घुमतो,
त्या सगुण निर्गुणाशी आयुष्य बांधले मी

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा
अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

शृंगारकविता

प्रतिक्रिया

रामदास's picture

13 Aug 2009 - 9:01 pm | रामदास

सुंदर काव्य.
तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा
ही ओळ खास आवडली.

अवलिया's picture

13 Aug 2009 - 11:14 pm | अवलिया

वा ! सुरेख !! आवडले !!!
:)

--अवलिया

अनामिक's picture

13 Aug 2009 - 11:17 pm | अनामिक

वा वा... सुरेख कविता. शेवटच्या दोन ओळी खासच!

-अनामिक

सुंदर क्रान्तिजी....

जन्माष्टमीची चांगली भेट दिलीत आम्हा सर्व मि.पा.करांना... :)
अगदी सुंदर जमले आहे काव्य...
खास करुन या चार ओळी अप्रतिमच.
भाव खूप सुंदर प्रकट झाला आहे या ४ ओळींत :)

त्याच्या करात मुरली, मुरलीत सूर झाले,
त्या अधररस सुधेला प्राशून झिंगले मी

हे गोड गुपित माझे सांगू कसे कुणाला?
त्या चित्तचोरट्याचे मन आज जिंकले मी

मलाही टंकायचा मोह आवरत नाहिये

राधा कृष्णावर भाळली का कृष्ण राधेवर भाळला?
युगानुयुगे सरली तरी हा प्रश्न का पडे मजला ?
बासरीने कृष्णाच्या मंत्रमुग्ध केले राधेला?
की राधेचे मन जिंकण्यास बासरीने अमर केले कृष्णाला? ;)

(राधा-कृष्णप्रेमी) सागर

बेसनलाडू's picture

13 Aug 2009 - 11:48 pm | बेसनलाडू

जन्माष्टमीच्या निमित्ताने आलेली प्रसंगानुरूप कविता. शब्दयोजनाही साजेशी आणि भावही खूपच सुंदर. कविता आवडली.
कलेच्या कोणत्याही रूपात - मग ते संगीत असो, काव्य असो, नृत्य किंवा चित्रकला असो - राधा-कृष्ण, त्यांच्या प्रणयक्रीडा इ. विषय अभिव्यक्तीसाठी इतका प्रसिद्ध आणि लाडका कसा असावा, याचेच राहून राहून आश्चर्य वाटते. कदाचित या विषयाची महती नि सौंदर्यच इतके असावे, की हे असे होणे सहज असावे, असे वाटते.
(कृष्णनामसाधर्म्यधारी)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

14 Aug 2009 - 4:10 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

प्राजु's picture

14 Aug 2009 - 12:17 am | प्राजु

अतिशय सुंदर्!!सुंदर शब्द!! सुंदर भाव... शेवट अप्रतिम!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2009 - 8:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच ओळी खास आहेत, आपल्या कविता आवडतातच !
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Aug 2009 - 9:58 am | फ्रॅक्चर बंड्या

सुंदर आहे

प्रशांत उदय मनोहर's picture

14 Aug 2009 - 10:47 am | प्रशांत उदय मनोहर

मस्त कविता

विशेषतः
>>ते स्वप्न सत्य होते, की सत्य स्वप्न होते?
>>जाणीव-नेणिवेच्या गुंत्यात गुंतले मी
>>
>>तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा
>>अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

क्या बात है! लाजवाब!

आपला,
(रसिक) प्रशांत

गोगट्यांचा समीर's picture

14 Aug 2009 - 11:27 am | गोगट्यांचा समीर

खुप आवडली कविता..

पूजादीप's picture

14 Aug 2009 - 11:40 am | पूजादीप

आवडली.
विशेषतः
तो अंतरात वसतो, तो स्पंदनात घुमतो,
त्या सगुण निर्गुणाशी आयुष्य बांधले मी

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा
अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

खुपच सुंदर भावना. धन्यवाद जन्माष्टमीनिमीत्त दिलेली भेट अप्रतिम आहे.

शाल्मली's picture

14 Aug 2009 - 11:43 am | शाल्मली

मस्त !
प्रसंगानुरुप कविता.

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा

खास!

--शाल्मली.

स्वाती२'s picture

14 Aug 2009 - 5:40 pm | स्वाती२

मस्त कविता. शेवट खास.

ऋषिकेश's picture

14 Aug 2009 - 7:29 pm | ऋषिकेश

एक छान प्रासंगिक कविता. आवडली

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "कान्हा वाजवी बासरी...."

धनंजय's picture

15 Aug 2009 - 3:03 am | धनंजय

प्रासंगिक कविता आवडली.

दत्ता काळे's picture

15 Aug 2009 - 10:06 am | दत्ता काळे

आवडली.

बाजीराव's picture

15 Aug 2009 - 2:07 pm | बाजीराव

छान. ही गझल आहे का? नसल्यास का नाही?
(अल्पमती) बाजीराव

मनीषा's picture

15 Aug 2009 - 4:02 pm | मनीषा

ते स्वप्न सत्य होते, की सत्य स्वप्न होते?
जाणीव-नेणिवेच्या गुंत्यात गुंतले मी

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा
अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

---------- सुरेख !!!

विसोबा खेचर's picture

16 Aug 2009 - 8:32 am | विसोबा खेचर

तो विश्वरूप कान्हा, मी कृष्णरूप राधा
अद्वैत हे युगांचे शब्दांत मांडले मी

वा!

तात्या.