परिणिता..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
10 Aug 2009 - 7:07 pm

कुणी रेखिली क्षितिजावरती चंचलशी मेघना
अश्व नभाचे दौडत आणित करूनिया गर्जना

मल्हाराला छेडित छेडित अळवूनिया गायले
पंख फ़ुलवुनी आतुर झाला मयूरही नर्तना..

लाही लाही साहुन धरणी भेगाळुनी गेली
'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना..

"नकोस राणी नको करू गं उगाच तू धावा..
जलद बघ हे, भरून आणिले तुझ्याच मी अर्पणा.."

कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला
बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा..

तरु-वेलीना किती नटविले गेल्या त्या हरखुनी
जळाशयी त्या वाकुन पुसती, "सांग तु रे दर्पणा!!"

तृप्त होऊनी साज ल्यायली परिणित ती अवनी
तेज मखमली ओस फ़ुलांचे झळके तीज यौवना..

थवे फ़ुलांचे, बीज तृणांचे दान देउन गेला
'पुन्हा वर्षण्या धावत येइन" करुनी तो घोषणा..

- प्राजु

* फोटो (१ तोरणा) मिपावरून आणि फोटो (२) इंटरनेट वरून साभार.

शृंगारकविता

प्रतिक्रिया

विकास's picture

10 Aug 2009 - 7:56 pm | विकास

कविता आणि छायाचित्रे आवडली!

थवे फ़ुलांचे, बीज तृणांचे दान देउन गेला
'पुन्हा वर्षण्या धावत येइन" करुनी तो घोषणा..

पुन्हा अजून याच वर्षात, याच हंगामात येउंदेत म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटेल!

धनंजय's picture

10 Aug 2009 - 8:25 pm | धनंजय

कविता आणि हिरवीगार चित्रे आवडली.

संदीप चित्रे's picture

10 Aug 2009 - 8:47 pm | संदीप चित्रे

आणि त्याबरोबर हिरवीगार चित्रंही ...
सुरेख :)

अनामिक's picture

10 Aug 2009 - 8:48 pm | अनामिक

कविता आणि फोटू, दोन्ही सुंदर!

-अनामिक

क्रान्ति's picture

10 Aug 2009 - 9:06 pm | क्रान्ति

लाही लाही साहुन धरणी भेगाळुनी गेली
'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना..

कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला
बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा..

वा! खूप सुरेख कविता आणि खूप सुरेख चित्रं.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

टारझन's picture

10 Aug 2009 - 9:13 pm | टारझन

आयला !! एक नंबर !! चित्रसंगतीमुळे इफेक्ट दुणावला !!
झकास कविता ..

आणि हो .. विषेश करून

'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना..

प्रार्थना हृदयाला भिडली गं प्राजु तै ;)

- टारिणिता

लिखाळ's picture

10 Aug 2009 - 9:19 pm | लिखाळ

वा .. सुंदर कविता.
मोठ्या कवितेत अनुरुप चित्रे टाकल्याने अजून मजा आली.

इंद्रधनुच्या साकवावरून श्रावणाला बोलावण्याची कल्पना फार सुंदर आहे.
-- लिखाळ.

मीनल's picture

10 Aug 2009 - 9:20 pm | मीनल

नुसत्याच सुंदर ओळी वाचून कल्पना करण्यापेक्षा इथली चित्र पहायला आवडली.
शब्द आणि फोटो एकमेकांना अनुरूप आहेत.
पण कवितेच्या मधेच ते फोटो आल्यामुळे वचनात जरासा खंड पडतो आहे. अधिक लक्ष त्या फोटों कडे जाते आहे.
पुढील कवितेत फोटो कवितेच्या आधी किंवा नंतर टाक म्हणजे फोटो आणि शव्द हे एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक ठरतील.

नेहमीचीच पृथ्वी, मेघातील प्रेमाची कल्पना.तोच तो पाऊस्,इंद्रधनुष्य,तरू-वेली,नाचरा मोर वगैरे.
तरीही कविता आवडली.शिर्षक सुंदर, शब्द छान. यमक ही आवडले.

मीनल.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Aug 2009 - 9:52 pm | llपुण्याचे पेशवेll

चित्रे दिसत नाहीयेत .. पण कविता छान वाटली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 10:32 pm | विसोबा खेचर

छानच कविता...

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

अवलिया's picture

10 Aug 2009 - 11:06 pm | अवलिया

कविता आणि चित्रं ... मस्तच !

--अवलिया

बेसनलाडू's picture

10 Aug 2009 - 11:30 pm | बेसनलाडू

कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू

घाटावरचे भट's picture

11 Aug 2009 - 6:12 am | घाटावरचे भट

छान!

दशानन's picture

11 Aug 2009 - 9:05 am | दशानन

कविता आणि फोटू, दोन्ही सुंदर!

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

मनीषा's picture

11 Aug 2009 - 2:45 pm | मनीषा

मस्त!!!

मदनबाण's picture

11 Aug 2009 - 2:48 pm | मदनबाण

व्वा,फोटो युक्त कविता आवडली. :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

परिकथेतील राजकुमार's picture

11 Aug 2009 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार

प्राजुतै हिरवीग्गार कवीता आणी हिरवेग्गार फोटु खुप आवडले.

सप्तरंगी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

हर्षद आनंदी's picture

11 Aug 2009 - 5:47 pm | हर्षद आनंदी

कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला
बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा....

सुंदर!!!

नुकतेच "इंद्रधनु" पहाण्याचा दुर्मिळ योग आला. वर्णनाने दॄश्य समोर आले :)

प्राजु's picture

11 Aug 2009 - 9:31 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.
कवितेसोबत चित्रे टाकण्याची कल्पना मीनल ने सुचवली. त्याबद्दल तिचे खास आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ज्ञानेश...'s picture

11 Aug 2009 - 10:38 pm | ज्ञानेश...

छान कविता आहे.
अभिनंदन. :)

"Great Power Comes With Great Responsibilities"

शाल्मली's picture

11 Aug 2009 - 10:50 pm | शाल्मली

मस्त आहे कविता आणि हिरवीगार चित्रेही सुंदर!

>>कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला
बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा..
मस्त!!

--शाल्मली.