रव्या-खोबर्‍याची भाकरी - एक झटपट मधल्या वेळचे खाणे

सुनील's picture
सुनील in पाककृती
10 Aug 2009 - 12:09 pm

साहित्य -
रवा
किसलेले खोबरे (प्रमाण रव्याच्या किमान अर्ध्याने)
आले
हिरवी मिरची
मीठ
पाणी
तेल

कृती -
१) आले, हिरवी मिरची आणि खोबरे वाटून घ्या
२) त्यात चवीपुरते मीठ घाला
३) त्यात थोडे (रवा बुडेल इतपत) पाणी घाला
४) रवा घालून सर्व मिश्रण एकजीव करा
५) त्याचे छोटे गोळे करून भाकरीसारखे थापा
६) तापलेल्या तव्यावर तेल टाकून, भाकर्‍या दोन्ही बाजूने खरपूस भाजा

टीपा -
१) आले आणि हिरवी मिरची यांचे प्रमाण आपापल्या चवीनुसार ठरवावे
२) ह्या भाकरीस वेगळ्या तोंडीलावण्याची गरज नाही (आले-मिरची-मीठामुळे)
३) चिमूटभर साखर (वैकल्पिक) घालता येईल
४) रवा घातल्यानंतर ताबडतोब भाकर्‍या करायला घ्या. रवा फार काळ भिजत राहिला तर भाकर्‍या खरपूस होणार नाहीत.

फोटो -

प्रतिक्रिया

समंजस's picture

10 Aug 2009 - 12:19 pm | समंजस

खाउन बघावे लागेल.....लवकरच! :)

नंदन's picture

10 Aug 2009 - 1:04 pm | नंदन

झटपट पाकृ मस्त दिसते आहे, करून पहायला हवी. पाण्याऐवजी ताक वापरून अशीच एक झटपट डोशां/उत्तपांची कृती वाचल्याचं आठवतं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

JAGOMOHANPYARE's picture

10 Aug 2009 - 3:36 pm | JAGOMOHANPYARE

मी केळ घालून करत होतो.... बडिशेप घातल्यास आणखी छान होईल..

अश्विनीका's picture

10 Aug 2009 - 3:39 pm | अश्विनीका

छान वाटतोय हा प्रकार.
तव्यावर तेलात भाजण्याऐवजी तेलात तळल्या तर रव्याच्या पुर्‍या पण होतील.

- अश्विनी

पूनम९९'s picture

11 Aug 2009 - 1:53 am | पूनम९९

भगरे चि पण भाकरी अशीच करतात , आणि मस्त लागते , उपवासाला पण चालते.

प्राजु's picture

11 Aug 2009 - 11:55 pm | प्राजु

म्हणजे वरई का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

11 Aug 2009 - 1:55 am | प्राजु

संध्याकाळचा प्रश्न मिटला. :)
झक्क्कास फोटु!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

11 Aug 2009 - 10:06 am | विसोबा खेचर

जबर्‍या..!

तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Aug 2009 - 6:22 pm | श्रीयुत संतोष जोशी

सुनील शेठ
झटपट आणि मस्त पाकक्रिया.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.