साहित्य -
रवा
किसलेले खोबरे (प्रमाण रव्याच्या किमान अर्ध्याने)
आले
हिरवी मिरची
मीठ
पाणी
तेल
कृती -
१) आले, हिरवी मिरची आणि खोबरे वाटून घ्या
२) त्यात चवीपुरते मीठ घाला
३) त्यात थोडे (रवा बुडेल इतपत) पाणी घाला
४) रवा घालून सर्व मिश्रण एकजीव करा
५) त्याचे छोटे गोळे करून भाकरीसारखे थापा
६) तापलेल्या तव्यावर तेल टाकून, भाकर्या दोन्ही बाजूने खरपूस भाजा
टीपा -
१) आले आणि हिरवी मिरची यांचे प्रमाण आपापल्या चवीनुसार ठरवावे
२) ह्या भाकरीस वेगळ्या तोंडीलावण्याची गरज नाही (आले-मिरची-मीठामुळे)
३) चिमूटभर साखर (वैकल्पिक) घालता येईल
४) रवा घातल्यानंतर ताबडतोब भाकर्या करायला घ्या. रवा फार काळ भिजत राहिला तर भाकर्या खरपूस होणार नाहीत.
फोटो -
वाचने
5465
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
खाउन
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मी केळ
छान वाटतोय
भगरे चि पण
भगरे?
In reply to भगरे चि पण by पूनम९९
व्वा!
जबर्या..! त
छान