फ्रेश इंजिनीअर्सनी घेण्याची काळजी- तुमच्या ओळखीच्या फ्रेश इंजिनीअर्सना सांगा

अमृतांजन's picture
अमृतांजन in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 2:32 am

मंदीमुळे गेले २ वर्षे आयटीतील नोकऱ्यांचा तुटवडा आहे. अजुनही कित्येक आयटी इंजिनीअर्स २००८ सालापासुन नोकरीच्या शोधात आहेत. सगळ्यांनी त्यांचे अर्ज आतापावेतो जॉब पोर्टलवर दिले असतीलच. मंदीत जी एखाद-दुसरी संधी निर्माण होते ती महाराष्ट्रातील तरुणांनी गमावू नये म्हणून खालील काळजी त्यांनी जॉब पोर्टलवर व इतरत्र घ्यावी. तुमच्या ओळखीचे कोणी असे इंजिनीअर असतील तर त्यांना जरुर कळवा-

email address:

१. इमेल पत्त्यात चुका करु नका- gamil, redifmail, असे चुकीचे स्पेलिंग सर्रास आढळते. नावातही स्पेलींगच्या चुका होऊ शकतात त्याही तपासाव्यात.
२. इमेल पत्ते शक्यतो पॉप्युलर सर्व्हीस प्रोव्हायडरचे असावे उदा.- हॉटमेल, जीमेल, याहू, ई
३. इमेल पत्ते तुमचे नाव व आडनाव असे असावे. फारतर त्यात एखादा अंक द्यावा लागतो, तो ठीक आहे. सर्रासपणे coolsandy वगैरे कॉलेजवयीनाला शोभतील असे इमेल पत्ते दिलेले पहिले आहेत. विद्यार्थी दशेत असे पत्ते ठिक आहेत.
४. तुम्हाला जर ऑटो रिस्पॉन्स इमेल सेट करायचा असेल तर, तो काळजीपुर्वक करा. "BUZZ" असे लिहिलेला ऑटो रिस्पॉन्स इमेल मी पाहिला आहे. काही ऑटो रिस्पॉन्स इमेल मध्ये स्पेलींगच्या घोडचुका पाहील्या आहेत.
५. जो इमेल पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर एक इमेल पाठवून खरच त्या पत्यावर इमेल जाते ना ते पहावे.

मोबाईल फोन व संभाषण:

१. मोबाईल फोन नंबर अर्जात अपुर्ण लिहीला गेला नाही ना ह्याची खात्री करा
२. तुम्ही अशा ठिकाणी असाल की जेथे फोन घेणे शक्य नसेल तर सरळ स्वीच-ऑफ करावा. किंवा अशावेळी जर इंटर्व्ह्युबाबतची विचारणा करणारा कॉल आला तर काय सांगावे ते आधीच ठरवा.
३. अनेकदा तुम्हाला पलिकडचे ऐकू येत नाही किंवा कळत नाही. अशावेळी कॉलरला रिपीट करायला सांगायचे असेल तर काय बोलावे ते आधीच ठरवा. "I could not catch you; can you please repeat your last couple of sentences?" असे म्हणता येईल.
४. इंग्लिश मध्येच बोला. इंग्लिश बोलायला कचरणारे हिंदीत बोलायला सुरुवात करतात अशा वेळी मराठीत बोलले तर अधिक शुद्ध भाषेत तरी बोलता येईल कारण ती अशुद्ध हिंदी ऐकून पलिकडचा गार पडेल
५. अपरीचित फोननंबर वरुन फोन आल्यास, अनेकजण "हं", "बोला", असे मित्राशी बोलतांना बोलतात तशी सुरुवात करतात. येथून पुढे प्रत्येक अपरीचित नंबर प्रॉस्पेक्टीव्ह एंप्लॉयरचा असू शकतो असे समजून वागा. फोन घेतल्यावर सुरुवात "This is "name" असे म्हणायची एक प्रथा आहे.
६. तुमच्या लक्षात आले की फोन बहुदा प्रॉस्पेक्टीव्ह एंप्लॉयरचा आहे, तर धडधड होते; एक मोठा श्वास घ्या, म्हणा, "Can you hold for a minute, I will get hold of a pen and a paper"; तो पर्यंत तुम्हाला सावरायला वेळ मिळेल. कोणत्या कंपनीतून फोन आला आहे हे अनेकदा कळत नाही; सांगणारा पटकन सांगतो; नाव पहिल्यांदाच ऐकलेले असते अशा वेळी अनेकजण, "व्हू व्हू?" असे दोनदा किंवा, "कौनसी कंपनी?", अशी सुरुवात करतात. वरील वाक्य लक्षात ठेवा व सगळे संभाषण झाल्यानंतरही तुम्हाला कंपनीचे नाव पुन्हा विचारता येईल. "कौनसी कंपनी?" म्हणतांना टोन असा असतो की, बास्स! जसे काही फोन करणाऱ्यालाच गरज आहे.
७. तुम्ही कशात ग्रॅज्युएशन केले आहे हे फक्त तुम्हालाच माहीती आहे. बरेचजण "I am a fresh BE" एव्हढेच म्हणतात. कॉम्प्युटर, आयटी अशी ब्रांच सांगायला विसरतात.

आणखी काही सुचले तर सांगेन नंतर.

अमृतांजन

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Aug 2009 - 7:42 am | llपुण्याचे पेशवेll

>>४. इंग्लिश मध्येच बोला. इंग्लिश बोलायला कचरणारे हिंदीत बोलायला सुरुवात करतात अशा वेळी मराठीत बोलले तर अधिक शुद्ध भाषेत तरी बोलता येईल कारण ती अशुद्ध हिंदी ऐकून पलिकडचा गार पडेल<<
हजार टक्के सहमत... इंग्रजी बोलणे सुधारण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्र मोठ्याने वाचण्याचा सराव करा.. इंग्रजी शब्दोच्चार तोंडात रुळले की उच्चारणे कठीण जात नाही. बर्‍याचदा इंग्रजी वाक्यरचना (पक्षी: कन्स्ट्रक्षन ) चांगले असूनही शब्द उच्चारायला न जमल्याने अडखळलेली मुले मी पाहीली आहेत..
इंग्रजी बोलताना सावकाश शब्द आठवून बोलावे लागले तरी चालतील पण इंग्रजी शब्द सुचला नाही तर हिंदी बोलू नका. कारण त्यामुळे इंग्रजीवरची पकड कधीच सुधारणार नाही.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

अमृतांजन's picture

7 Aug 2009 - 10:09 pm | अमृतांजन

इंग्लिश बोलणाऱ्याला हिंदीतून उत्तरे देणाऱ्या मराठी माणसांच्या मनोवृत्तीचे नेहमीच मला आश्चर्य वाटते.
नक्की काय होत असावे?
जगाच्या पाठीवर अशी स्वतःच्या मातृभाषेला नाकारणारी जमात दुसरीकडे शोधून सापडणार नाही.

अमृतांजन's picture

7 Aug 2009 - 10:12 pm | अमृतांजन

वर मी इंग्लिशमध्येच बोला असे म्हणले आहे व नंतर स्वतःच्या मातृभाषेला नाकारु नका असे म्हणलेय. हा विरोधाभास नाही; त्यातील कॉन्टेक्स्ट वेगळा आहे.

विंजिनेर's picture

7 Aug 2009 - 8:32 am | विंजिनेर

जर तुम्ही संगणक क्षेत्रातील शिक्षण घेतले असेल तर तुमचे छोटेखानी वैयक्तिक संकेत स्थळ चालू करा. होणारा खर्च(साधारण २०००रू. वर्षाला) ही तुमच्या शिक्षणाची मोठी जाहिरात (२४x७)ठरेल आणि खूप चांगली गुंतवणूक होईल.
त्यावर तुमचे रेझुमे, तुम्ही केलेले तांत्रिक प्रयोग/कुठल्या परिषदा इ.मधे सादर केलेले पेपर, इंजिनियरिंग चा शेवटच्या वर्षाचा प्रक्लप इ. ची माहिती लिहीली तर ती अतिशय प्रभावी ठरेल.

इतकेच काय तर नेटकी मांडणी, सुखद वावर (नेव्हिगेशन) इ. बघून तुम्हाला वेब प्रोग्रॅमींग आणि इतर क्षेत्रात नोकरीसुद्धा मिळेल.

(शक्यतो, बटबटीत, हलके फुलके विनोदी साहित्य टाकू नये)

अमृतांजन's picture

7 Aug 2009 - 8:38 am | अमृतांजन

मस्तायडीया!

खरे म्हणजे Wordpress blog सारख्या मुक्तप्रणालीचा उपयोग करुन सुरुवात करता येईल.

रामदास's picture

7 Aug 2009 - 8:34 pm | रामदास

माझी आहे ती नोकरी संपायला दहा-एक वर्षं आहेत तरी पण निवृत्तीनंतर नोकरी -व्यवसाय सुरु करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी म्हणतो.

अमृतांजन's picture

7 Aug 2009 - 7:26 pm | अमृतांजन

मोबाईल फोनची कॉलर ट्युन एखादे वाद्यसंगीत असले तर बरे अथवा नुसतीच डिफॉल्ट रींग असू द्यावी.

अमृतांजन's picture

8 Aug 2009 - 8:51 am | अमृतांजन

ह्या माहीतीचा एखाद्याला फायदा झाला असेल तर तसे कळल्यास आनंद होईल.