मंदीमुळे गेले २ वर्षे आयटीतील नोकऱ्यांचा तुटवडा आहे. अजुनही कित्येक आयटी इंजिनीअर्स २००८ सालापासुन नोकरीच्या शोधात आहेत. सगळ्यांनी त्यांचे अर्ज आतापावेतो जॉब पोर्टलवर दिले असतीलच. मंदीत जी एखाद-दुसरी संधी निर्माण होते ती महाराष्ट्रातील तरुणांनी गमावू नये म्हणून खालील काळजी त्यांनी जॉब पोर्टलवर व इतरत्र घ्यावी. तुमच्या ओळखीचे कोणी असे इंजिनीअर असतील तर त्यांना जरुर कळवा-
email address:
१. इमेल पत्त्यात चुका करु नका- gamil, redifmail, असे चुकीचे स्पेलिंग सर्रास आढळते. नावातही स्पेलींगच्या चुका होऊ शकतात त्याही तपासाव्यात.
२. इमेल पत्ते शक्यतो पॉप्युलर सर्व्हीस प्रोव्हायडरचे असावे उदा.- हॉटमेल, जीमेल, याहू, ई
३. इमेल पत्ते तुमचे नाव व आडनाव असे असावे. फारतर त्यात एखादा अंक द्यावा लागतो, तो ठीक आहे. सर्रासपणे coolsandy वगैरे कॉलेजवयीनाला शोभतील असे इमेल पत्ते दिलेले पहिले आहेत. विद्यार्थी दशेत असे पत्ते ठिक आहेत.
४. तुम्हाला जर ऑटो रिस्पॉन्स इमेल सेट करायचा असेल तर, तो काळजीपुर्वक करा. "BUZZ" असे लिहिलेला ऑटो रिस्पॉन्स इमेल मी पाहिला आहे. काही ऑटो रिस्पॉन्स इमेल मध्ये स्पेलींगच्या घोडचुका पाहील्या आहेत.
५. जो इमेल पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर एक इमेल पाठवून खरच त्या पत्यावर इमेल जाते ना ते पहावे.
मोबाईल फोन व संभाषण:
१. मोबाईल फोन नंबर अर्जात अपुर्ण लिहीला गेला नाही ना ह्याची खात्री करा
२. तुम्ही अशा ठिकाणी असाल की जेथे फोन घेणे शक्य नसेल तर सरळ स्वीच-ऑफ करावा. किंवा अशावेळी जर इंटर्व्ह्युबाबतची विचारणा करणारा कॉल आला तर काय सांगावे ते आधीच ठरवा.
३. अनेकदा तुम्हाला पलिकडचे ऐकू येत नाही किंवा कळत नाही. अशावेळी कॉलरला रिपीट करायला सांगायचे असेल तर काय बोलावे ते आधीच ठरवा. "I could not catch you; can you please repeat your last couple of sentences?" असे म्हणता येईल.
४. इंग्लिश मध्येच बोला. इंग्लिश बोलायला कचरणारे हिंदीत बोलायला सुरुवात करतात अशा वेळी मराठीत बोलले तर अधिक शुद्ध भाषेत तरी बोलता येईल कारण ती अशुद्ध हिंदी ऐकून पलिकडचा गार पडेल
५. अपरीचित फोननंबर वरुन फोन आल्यास, अनेकजण "हं", "बोला", असे मित्राशी बोलतांना बोलतात तशी सुरुवात करतात. येथून पुढे प्रत्येक अपरीचित नंबर प्रॉस्पेक्टीव्ह एंप्लॉयरचा असू शकतो असे समजून वागा. फोन घेतल्यावर सुरुवात "This is "name" असे म्हणायची एक प्रथा आहे.
६. तुमच्या लक्षात आले की फोन बहुदा प्रॉस्पेक्टीव्ह एंप्लॉयरचा आहे, तर धडधड होते; एक मोठा श्वास घ्या, म्हणा, "Can you hold for a minute, I will get hold of a pen and a paper"; तो पर्यंत तुम्हाला सावरायला वेळ मिळेल. कोणत्या कंपनीतून फोन आला आहे हे अनेकदा कळत नाही; सांगणारा पटकन सांगतो; नाव पहिल्यांदाच ऐकलेले असते अशा वेळी अनेकजण, "व्हू व्हू?" असे दोनदा किंवा, "कौनसी कंपनी?", अशी सुरुवात करतात. वरील वाक्य लक्षात ठेवा व सगळे संभाषण झाल्यानंतरही तुम्हाला कंपनीचे नाव पुन्हा विचारता येईल. "कौनसी कंपनी?" म्हणतांना टोन असा असतो की, बास्स! जसे काही फोन करणाऱ्यालाच गरज आहे.
७. तुम्ही कशात ग्रॅज्युएशन केले आहे हे फक्त तुम्हालाच माहीती आहे. बरेचजण "I am a fresh BE" एव्हढेच म्हणतात. कॉम्प्युटर, आयटी अशी ब्रांच सांगायला विसरतात.
आणखी काही सुचले तर सांगेन नंतर.
अमृतांजन
वाचने
2536
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>४. इंग्लिश
इंग्लिश
In reply to >>४. इंग्लिश by llपुण्याचे पेशवेll
वर मी
In reply to इंग्लिश by अमृतांजन
जर तुम्ही
मस्तायडीया!
In reply to जर तुम्ही by विंजिनेर
चांगली सूचना
In reply to जर तुम्ही by विंजिनेर
मोबाईल
ह्या