शाळा

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
3 Aug 2009 - 2:24 pm

काही दिवसांपुर्वी नेरळपासुन जवळ असलेल्या सगुणाबागेत (निसर्ग निकेतनात) एक विकांत घालवण्याचा योग आला. आम्ही शुक्रवारी रात्री थोडे उशीराच पोहोचलो, त्यामुळे जेवण करुन थेट पडी मारली. आम्ही तिथल्या पाँड हाऊसवर उतरलो होतो.

सकाळी उठल्यावर पाँड हाऊसच्या बाहेर पडलो तो समोर छान शाळा भरलेली. बहुदा शारिरीक शिक्षणाचा तास चालु होता.

पंतोजी अधुन मधुन नजर ठेवुन होते, पण तेही आपल्याच तंद्रीत होते.

त्यामुळे वर्गातले विद्यार्थी मात्र भलतेच बेशिस्त दिसत होते. आपापल्या मनाप्रमाणे वाट्टेल तसा व्यायाम चालु होता. कुणी गृपबरोबर तर कुणी एकटेच मजा करत होते. एकमेकाला दमदाटी करत शक्ती प्रदर्शनही जोरात चालु होते.

काही गरीब बिचारे नवीन विद्यार्थी मात्र कुठल्या गृपमध्ये सामील व्हायचे ते न कळल्यामुळे भांबावल्यासारखे झाले होते.

तेवढ्यात बहुदा शाळा सुटल्याची घंटा झाली आणि सगळे आपापल्या घरी पळाले. पण घरी परत जाताना त्यांची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी होती.

विशाल.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

सहज's picture

3 Aug 2009 - 2:36 pm | सहज

झकास!

पण ह्या निसर्ग निकेतनात जायचे असल्यास काय करावे, कसे जावे, जेवायची सोय, रहाण्याची सोय(डॉर्मेटरी का स्वतंत्र खोल्या की कसे), किंमत इ इ माहीती दिल्यास अजुन जास्त आवडेल.

विशाल कुलकर्णी's picture

3 Aug 2009 - 2:46 pm | विशाल कुलकर्णी

हा त्यांच्या वेबसाईटचा दुवा आहे. यावर सर्व माहिती मिळेल.
http://www.sagunabaug.com/

एक अतिशय सुंदर ठिकाण आहे हे. मत्स्यप्रेमींसाठी तर मस्तच आहे, (खाणार्‍या आणि पकडु इच्छिणार्‍या अशा दोघांसाठीही)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

अश्विनि३३७९'s picture

3 Aug 2009 - 2:54 pm | अश्विनि३३७९

आम्ही पण मे महिन्यात सगुणा बाग ला भेट दिली होती ..
फार धमाल आली ..
शाळा आवड्ली

प्राजु's picture

4 Aug 2009 - 12:35 am | प्राजु

विशाल, मला वाटलं तुझ्या शाळेमध्ये तू गेला होतास खूप वर्षांनी म्हणून तिथले फोटो काढून इथे आठ्वणींसहीत लिहिले आहेस की काय!
पण भलताच सुखद आणि गोंडस धक्का बसला. :)
मस्त आहेत सगळे फोटो आणि फोटो वर्णनही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

4 Aug 2009 - 9:16 am | दशानन

विशाल, मला वाटलं तुझ्या शाळेमध्ये तू गेला होतास खूप वर्षांनी म्हणून तिथले फोटो काढून इथे आठ्वणींसहीत लिहिले आहेस की काय!
पण भलताच सुखद आणि गोंडस धक्का बसला.
मस्त आहेत सगळे फोटो आणि फोटो वर्णनही.

सहमत.
मला ही असेच वाटले होते.... पण फोटो झकास !
व प्रत्येक फोटोला योग्य असे शिर्षक !
आवडले !

+++++++++++++++++++++++++++++

दिपाली पाटिल's picture

4 Aug 2009 - 11:49 am | दिपाली पाटिल

मला ही तसेच वाटले होते पण शाळा आवडली .... :)

दिपाली :)

पाषाणभेद's picture

5 Aug 2009 - 9:26 am | पाषाणभेद

माला बी तसच वाटल. वर साळा नाव आन खाली पयला फटू पायला. मायला आसली पान्यातली साळा म्हंजे ईद्यार्थी लई लकी. आस वाटल की आसली कोनती साळा हाय? आशी साळा आपल्याला आसती तर? नाय तर आमचे झेडपी चे वर्ग आन काय ते मास्तर, याची आटवन झाली आन डोल्यात पानी आल.

नंतर पान खाली खेचल तशे पक्शांचे पटू दिसू लागले तवा उलगडा झाला. बाकी या बदकांना काय म्हंतात वो इंग्रजीत ? नाय आमचे सायब काय तरी म्हनत व्हते इंग्रजीत तवाच त्यांनी माला त्यांच्या टेबलावरल्या फाईली केबीन मधी घेवून जायला वरडले. (लई खउट सायब हाय वो माझा. आता त्याची बदली व्हईल तवाच पिडा टळल. )

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

लिखाळ's picture

4 Aug 2009 - 12:45 am | लिखाळ

मजेदार कल्पना .. :)

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

विशाल कुलकर्णी's picture

4 Aug 2009 - 9:11 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आशिष सुर्वे's picture

4 Aug 2009 - 9:27 am | आशिष सुर्वे

परत शाळेत जावेसे वाटतेय..

सुंदर छायाचित्रे आणि अप्रतिम कल्पना!!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

बेसनलाडू's picture

4 Aug 2009 - 10:55 pm | बेसनलाडू

अशा शाळेत शिकायला फार आवडले असते.
(विद्यार्थी)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

5 Aug 2009 - 8:44 am | विसोबा खेचर

शाळा आवडली बॉस! :)

तात्या.

झकासराव's picture

5 Aug 2009 - 9:12 am | झकासराव

मस्तय विशाल्भौ
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao