काही दिवसांपुर्वी नेरळपासुन जवळ असलेल्या सगुणाबागेत (निसर्ग निकेतनात) एक विकांत घालवण्याचा योग आला. आम्ही शुक्रवारी रात्री थोडे उशीराच पोहोचलो, त्यामुळे जेवण करुन थेट पडी मारली. आम्ही तिथल्या पाँड हाऊसवर उतरलो होतो.
सकाळी उठल्यावर पाँड हाऊसच्या बाहेर पडलो तो समोर छान शाळा भरलेली. बहुदा शारिरीक शिक्षणाचा तास चालु होता.
पंतोजी अधुन मधुन नजर ठेवुन होते, पण तेही आपल्याच तंद्रीत होते.
त्यामुळे वर्गातले विद्यार्थी मात्र भलतेच बेशिस्त दिसत होते. आपापल्या मनाप्रमाणे वाट्टेल तसा व्यायाम चालु होता. कुणी गृपबरोबर तर कुणी एकटेच मजा करत होते. एकमेकाला दमदाटी करत शक्ती प्रदर्शनही जोरात चालु होते.
काही गरीब बिचारे नवीन विद्यार्थी मात्र कुठल्या गृपमध्ये सामील व्हायचे ते न कळल्यामुळे भांबावल्यासारखे झाले होते.
तेवढ्यात बहुदा शाळा सुटल्याची घंटा झाली आणि सगळे आपापल्या घरी पळाले. पण घरी परत जाताना त्यांची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी होती.

विशाल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4815
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा
हा
मस्त!!
अफाट!!
विशाल, मला
In reply to अफाट!! by प्राजु
+१
In reply to अफाट!! by प्राजु
माला बी
In reply to +१ by दिपाली पाटिल
मजेदार
धन्यवाद
परत
भारी
शाळा आवडली
मस्तय