गाभा:
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर मिपाकरांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. यापुर्वी फलज्योतिषावर आपले मत काय? हा कौल घेतला होता. दैनिक सकाळ मध्ये ही यावर निवेदन दिले होते. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्याचे ही जागा नाही. धनंजयाचे स्टॅटिस्टिकल मॉडेल वर या अगोदर चाचणी झाली आहेच. त्याचे संदर्भ खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत
दुवा क्र १
दुवा क्र २
प्रतिक्रिया
15 Aug 2009 - 8:50 am | प्रकाश घाटपांडे
अरे मिपाकरांचा शुन्य प्रतिसाद. चला आता नव्या बाटलीत जुनी दारु भरु या! डॉन्या क्युबिकल च डिजाईन झाल असल तर फॉर्च्युन डिजाईन च्या कामाला लाग आता.
आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आपापल फॉर्च्युन सांभाळण्यासाठी राजकीय लोकांची लगबग चालू होईल. अनेक फॉर्च्युन लव्हर्स ज्योतिषांना भेटी देतील. त्यानिमित्त विधानसभानिवडणुका व ज्योतिषांचे अंदाज या वर एखाद चाचणी/आव्हान/आवाहन चे डिजाईन तयार करा. चांगल डिझाईन करणार्याला नव्या बाटलीतील जुनी दारु पाजु.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Aug 2009 - 11:45 am | प्रशांत उदय मनोहर
आज रात्री निवांतपणे त्या दुव्यांवरील मजकूर वाचेन आणि त्यावर विचार करेन. सध्या व्यस्त असल्यामुळे फलज्योतिषाचा अभ्यास पूर्णपणे बंद आहे. पण नक्की विचार करेन आणि उत्तर देईन. :)
धन्यवाद.
- प्रशांत
15 Aug 2009 - 8:51 am | अवलिया
पकाशेट वेळ जात नाहिये का?
--अवलिया
15 Aug 2009 - 9:01 am | प्रकाश घाटपांडे
ल्वॉकांचा वेळ आपल्या 'कारणी 'लावुन घ्यावा म्हंतो. आम्हाला एक नरेंद्र नायक यांचे एक चाचणीचे डिजाईन आवडले आहे. लोकांन अजुन काही सुचतय का बघाव म्हन्ल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Aug 2009 - 9:14 am | अवलिया
हा हा हा
चालु द्या... :)
च्यामारी पकाशेट म्हणजे डेंजर मनुक्ष... कोंबडं झुंजवण्यात एक्सपर्ट.. :)
--अवलिया
15 Aug 2009 - 3:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रमवर घेतलेल्या चाचणी निष्कर्ष समजून घेतलेले असल्यामुळे ते भविष्य कथन, कुंडल्या, भाकितं यावर विश्वास ठेवायचा नाही इतके आम्हाला कळले आहे.
>>विधानसभानिवडणुका व ज्योतिषांचे अंदाज
हे बेष्ट आहे.उमेदवारांच्या ज्योतिषांना कुंडल्या द्यायच्या ( पण त्या तरी खर्या असतील का ) आणि त्यावरुन कोणत्या विधानसभा मतदार संघातून कोण निवडून येईल हे त्यांनी सांगायचे. आणि कितीच्या फरकाने निवडून येईल, किंवा कोण किती मतांनी पराभूत होईल हे सांगायचे, का ज्योतिषांना अवघड होईल ?
-दिलीप बिरुटे
18 Aug 2009 - 1:04 pm | मिसळभोक्ता
"फॉर्च्यून डिझाईन" ह्या शीर्षकावरून प्रकाशकाका कोंबडेच झुंजवतात असे नाही, तर "आ बैल, मुझे मार" पण अधून मधून करतात, असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
बैलपोळ्याच्या शुभेच्छा !
-- मिसळभोक्ता
18 Aug 2009 - 1:25 pm | सहज
प्रकाशकाकांना कसलाच विधिनिषेध नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे.
विशेष सुचना - पण बघा प्रकाश घाटपांडे, त्यांच्या नावातच (पी जी / P . G.) आहे, पॅरेंटल गायडेन्स. नंतर तक्रार चालणारच नाही
18 Aug 2009 - 3:12 pm | प्रकाश घाटपांडे
खी खी खी!
आव्हान व आवाहन या भिन्न गोष्टी करुन निवडणुकीच्या निकालावर २१ लाखाचे बक्षिस लवकरच अंनिस जाहीर करणार आहे. त्यासाठी नरेंद्र नायकांचे हे डिजाईन वापरणारण्यात येणार आहे. थोडा फार बदल होईल. यात आयुका सहभागी नाही
चाचणीच्या आवाहना बद्दल कालच नारळीकरांच्या सोबत चर्चा केली. त्यांनी घटस्फोटितांच्या कुंडल्या व ज्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालू आहे अशा जोडप्यांच्या कुंडल्या असा मुद्दा मांडला होता.
हा मुद्दा पुर्वी वि म दांडेकरांनी मांडला होता.वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. माझ्याकडे पाहुन त्यांनी प्रथम तुच्छ्तेचा कटाक्ष टाकला. नंतर नाईलाजे आत बोलावले. त्यांची 'महाराष्ट्राचा कुंडली संग्रह' या म.दा. भटांच्या पुस्तकाला प्रस्तावना दिली होती. मी ती वाचली आहे आणि त्यावर माझ्या काही शंका आहेत असे म्हणुन मी त्यांना पंचमातील गुरु या त्यांच्या प्रस्तावनेतील उदाहरणा बाबत खालील प्रश्न विचारले.
१) आपल्याला सायन पत्रिका अभिप्रेत आहे कि निरयन्? निरयन असल्यास कुठले अयनांश?
२) आपण भावचलित पहाणार का? असल्यास भाव मध्य कि भावारंभ?
३) भावेश महत्वाचा कि पंचमातील गुरु?
४) गुरु स्वतःच्या स्थानाची हानी आणि समोरच्या स्थानाची वृद्धी करतो यावर आपले मत काय?
५) पंचमातील गुरु हा काही शिक्षणक्षेत्राशी संबंधीत असल्याचा एकमेव निकष नव्हे. अन्य योग आपण तपासायला तयार नाही मग ज्योतिषातला "साकल्याने" विचार हा कसा होणार?
परिणाम असा झाला कि मला बसायला खुर्ची मिळाली आणि त्यांनी सांगितले कि मी मुलतः ज्योतिष अभ्यासक नाहि मि ज्योतिषांच्या मदतीने हा प्रकल्प करतो आहे. मग पुढचा विषय चाचणीचा होता. त्यावेळी संगणकाच्या व संख्याशास्त्राच्या मदतीने आता या विषयाचा एकदा काय तो निकाल लागला जाईल असे त्यांचे मत होते. म.दा भट व व.दा भट या दिग्गज ज्योतिषांच्या मदतीने त्यांचा प्रयत्न चालू होता. त्यांच्या मताशी अर्थातच मी असहमत होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा त्यांचा संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो.
(छापील)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Sep 2009 - 11:50 am | प्रशांत उदय मनोहर
मला काही प्रश्न विचारायचे आहेत.
१. दुवा क्र. १ मध्ये दिल्यानुसार
"This was done using standard
software by one of us (PG) who possessed
enough experience in astrology, having
been a practising astrologer a few years
back."
आपण स्वतः फलज्योतिषाची practice केली आहे काही वर्षे, मग तुम्ही स्वतः त्या दोनशे पत्रिका तयार केल्यानंतर त्यांचा अभ्यास केलात का? नियत्कालिकात छापण्यासाठी नव्हे, पण एक अभ्यास म्हणून तुमची काय निरीक्षणं होती पत्रिकांबद्दल, ते ऐकायला आवडेल.
२. "इंटलेक्च्युअली ब्राइट" आणि "मेंटली रिटार्डेड" या शब्दांच्या संज्ञा आणि सीमारेषांबद्दल अधिक माहिती हवी आहे. मेरिटमध्ये येणारा विद्यार्थी इंटलेक्च्युअली ब्राईट आणि नापास झालेला रिटार्डेड अशी संज्ञा आहे का? की त्यापेक्षा अधिक व्यापक संज्ञा आहे? व्यापक असल्यास व्याप्ती किती?
इंटलेक्च्युअली ब्राईट लोकं अतिविचारांमुळे मेंटली रिटार्डेड होण्याचा संभवही असतो. त्यामुळे वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर these two sets are not truely orthogonal.
३. ज्या फलज्योतिषांनी पत्रिकांचा अभ्यास केला, त्यांतली कारणमीमांसा वगैरे उपलब्ध आहे का?
उदा. ज्यांच्या मते पत्रिका क्र. क्ष मतिमंद व्यक्तीची आहे त्या सर्व ज्योतिषांनी कोणकोणत्या निकषांवरून हे अनुमान काढलं? (व अशाचप्रकारे इतर अनुमान काढण्यामागे फलज्योतिषाच्या अंगाने काय दृष्टीकोण होता?)
४. दुवा क्र. १ मध्ये प्रस्तुत केलेल्या निबंधाच्या लेखकांमध्ये केवळ "चिकित्सक(?) अभ्यास" या हेतूने चार व्यक्ती एकत्र आल्या आहेत. त्यांची कार्यक्षेत्रे इतकी भिन्न आहेत, की एकमेकांशी संवाद साधताना एकमेकांच्या क्षेत्रातले superfine details समजणं शक्य आहे का याबद्दल मला शंका आहे. फलज्योतिषाची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः केली असली, तरी खुद्द ज्योतिर्गणिताचा अभ्यास असलेल्या डॉ. नारळीकरांनी त्याचा अभ्यास केला आहे का, याबद्दल खुलासा झालेला नाही.
[Physics आणि Theoretical Chemistry (which is very close to Physics) या क्षेत्रातल्या दोन व्यक्ती नियत्कालिकांमध्ये प्रकाशित करतात, तेव्हासुद्धा एकमेकांच्या क्षेत्रातले काही मुद्दे एकमेकांना पटवून द्यायला वेळ लागतो, कारण physics आणि chemistry च्या भाषेमधला (किंवा विचारशैलीतला) फरक संवाद साधाण्यामध्ये अडचणी निर्माण करतो.]
आपला,
(उत्तराभिलाषी) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
5 Sep 2009 - 2:43 pm | प्रकाश घाटपांडे
१) पत्रिका तयार करताना त्रुटी रहाणार नाही याची काळजी ज्योतिषाच्या भुमिकेतुन घेतली. पत्रिकेत मतिमंदत्व वा हुशारी (प्रयोगातील व्याखेनुसार) यांचे प्रतिबिंब दिसु शकत नाही हे आमचे मत
२) चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे होते.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या होत्या. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या . मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे.
३) कारणमिमांसा ही ज्योतिषांनी स्वतंत्रपणे दिली नाही. अमुक अमुक ग्रहयोग असेल तर हुषार आणी अमुक अमुक असेल त मतिमंद असा ठोस नियम नाही ज्योतिषानुसार कारणमीमांसा बदलते. खर तर या चाचणीवर काही मान्यवर ज्योतिषांनी बहिष्कार घातला होता. आधिक माहिती http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/blog-post_27.html
४) चाचणीचा समन्वयक यानात्याने ही जबाबदारी माझी होती. नारळीकरांनी फलज्योतिषाचा अभ्यास केला नाही. पण खगोलशास्त्राशी ज्योतिषाचा संबंध जोडल्यागेल्याने ज्योतिषशास्त्राच्या खरेखोटपणा विषयी नारळीकरांना अनेकांकडून विचारणा कायम होत असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Sep 2009 - 3:12 pm | प्रशांत उदय मनोहर
माझा प्रश्न क्र. १
याचं उत्तर मिळालं नाही अजून.
नारळीकरांनी या प्रयोगात भाग का घेतला असा माझा प्रश्न नव्हता.
चार लोकांपैकी एकाचा मुद्दा दुसर्याला १००% समजेल अशा किमान दोन तरी व्यक्ती असायला हव्या होत्या. तसं इथे मला आढळलं नाही.
आपला,
(उत्तराभिलाषी) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
5 Sep 2009 - 3:19 pm | प्रशांत उदय मनोहर
मी याबाबत जो मुद्दा मांडला होता की "these sets are not truely orthogonal" ते फलज्योतिष वाचून नाही बोललो.
:)
असो. तुम्ही फलज्योतिषाची practice करायचे पूर्वी. तरी या पत्रिकांचा स्वतंत्रपणे अभ्यास करावासा वाटला नाही, याचं आश्चर्य आहे.
5 Sep 2009 - 3:42 pm | प्रकाश घाटपांडे
पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.
( आमचे मत/अनुभव वेगळा नाही)
प्रकाशशास्त्री घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 Sep 2009 - 10:38 pm | प्रशांत उदय मनोहर
तुम्ही "समन्वयक" होता हे वर सांगितलं, तिथे दिलेल्या दुव्यावर
हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पूर्वी माझ्या ब्लॉगवर "शास्त्र आणि कला" या लेखावर आपण प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर आपली ई-ओऴख झाली तेव्हा "ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..." हे पुस्तक मी वाचलं. त्यात "मृत्युषडाष्टका"बद्दल आपण परिच्छेद लिहिला होता, त्यात सरसकट सर्व षडाष्टक मृत्युषडाष्टक असतात असा तुमच्या लिहिण्याचा सूर होता. वास्तविक फलज्योतिषाच्या पुस्तकांमध्ये "मृत्युषडाष्टक" आणि "प्रीतिषडाष्टक" ही दोन्ही well-defined आहेत. तुम्ही "चिकित्सात्मक" दृष्टीने केलेला अभ्यास बाजारात विक्रीला ठेवलेल्या पुस्तकात प्रकाशित करताना फलज्योतिषात नसलेल्या चुका घुसडून केवढा ढळढळीत अन्याय केला आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा मुद्दा नंतरचा. पण "फलज्योतिष थोतांड आहे" असं गृहित धरूनच तुम्ही ते पुस्तक प्रकाशित केलंय हे एक-दोन पानं वाचल्यावरच लक्ष्यात येतं.
असो. तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणे चिकित्सात्मक अभ्यास करायचा असल्यास दुवा क्र. १ मध्ये सहभागी झालेल्या फलज्योतिषांपैकी काहींना संपर्क करून आपल्या उपक्रमात सहभागी करण्याचा प्रयत्न करावा. आणि फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी थोडा तरी अभ्यास करावा.
काय आहे, व्यक्तीची प्रकृती पाहून डॉ. औषधे देतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने औषधे देण्यातही फरक असतो. म्हणून "औषधांचे नियम नाहीत" असंही होत नाही आणि वैद्यकशास्त्र "थोतांड"ही होत नाही.
आणि स्टॅटिस्टिक्सबद्दल म्हणायचं, तर उदाहरण सांगतो.
एक डॉक्टर एका रुग्णाला म्हणतो, "या आजारात सरासरी दहापैकी नऊ रुग्ण दगावतात. पण तुम्ही चिंता करू नका. यापूर्वी माझे नऊ रुग्ण या आजाराने दगावले. तुम्ही दहावे असल्यामुळे दगावणार नाही."
तात्पर्य, दोनशे पत्रिका खूप कमी होतात.
आणि पत्रिकांवरून अनुमान काढण्यामधला raw अभ्यासही मिळवता आला, तर बरं होईल. नियत्कालिकात जरी अंतिम निकाल प्रकाशित करत असले, तरी मजकूर लिहिण्यासाठी raw data चं analysis अत्यंत आवश्यक आहे.
(...) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? ;)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
6 Sep 2009 - 4:33 pm | प्रकाश घाटपांडे
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ३] विवाह पत्रिका आणि ज्योतिष मधील प्रश्न क्र ३१ पहा
३१) मृत्यूषडाष्टक काय आहे?
समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या.
आता यात मी सरसकट मृत्युषडाष्टक म्हटले आहे असे कुठे? काही ज्योतिषी मृत्यु शब्द अलिकडे जोड्ला गेल्याने दहशत निर्माण होते त्याचा वापर करतात.मेष- कन्या हे मृत्यु षडाष्टक का तर बुध मंगळाचा शत्रु आहे मेष -वृश्चिक हे प्रिती षडाष्टक का तर दोन्ही राशीचा स्वामी मंगळच आहे. अर्थात सामान्य जातकाला याच्याशी घेण देण नसत.
आता ज्योतिषशास्त्रात नसलेल्या गोष्टी घुसडुन अनेक ज्योतिषीच ज्योतिषशास्त्राची बदमानामीच करत असतात असे काही सुज्ञ ज्योतिषांनाच वाटत. यावर ज्योतिषांपासुन सावधान असा ज्योतिषी श्री श्री भट यांचा एक लेख आहे. तसेच काही माहीती व दा भट यांची अखिल भारतीय ज्योतिष संमेलन, सोलापूर २००१ च्य निमित्ताने येथे पहावयास मिळेल (आमच्या भाष्यासह)
चिकित्सा करणे म्हणजे ढळढळीत अन्याय करणे असे आपल्याला वाटते त्याला आमचा नाईलाज आहे. सुदैवाने काही ज्योतिषांना तस वाटत नाही. पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने आम्ही खालील मनोगत मांडले आहे.
आपल्याला जे पटत नाही ते सर्व त्याज्य अशी भूमिका न घेता बहुविध दृष्टिकोणातून या विषयाकडे बघण्याची दृष्टि ही मला माझया ज्योतिष प्रवासातूनच मिळाली. अनेक बुद्धिप्रमाण्यवादी फलज्योतिष विरोधक आपल्या मताशी जो पूर्णत: सहमत नाही तो फलज्योतिष समर्थकच आहे असे मानणारे आहेत. तसेच अनेक फलज्योतिष समर्थक हे आपल्याशी सहमत नसणारा तो विरोधक असे मानणारे आहेत. हे पुस्तक फलज्योतिषाचे समर्थन करते की विरोध असाही प्रश्न काही लोकांना पडला. एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. फलज्योतिष समर्थक वा विरोधक हे आपापल्या व्यासपीठावरुन एकमेकाविरुद्ध आग्रही मतं मांडत असतात. या दोन्ही भूमिका लोकांना एकाच वेळी ऐकायला मिळाव्यात या हेतूने पहिल्या आवृत्तीचे समारंभपूर्वक प्रकाशन केले. त्यात डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांनी आपला फलज्योतिष विरोधी आणि ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी आपली समर्थक भूमिका मांडली. तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दोघांनीही उत्तरे दिली. उत्तरे पटणे वा न पटणे हा भाग निराळा. पण या निमित्ताने एक विचार प्रक्रिया तर चालू झाली. आतापर्यंत फलज्योतिष हा विषय वा ज्योतिषी ही व्यक्ती केन्द्रबिंदू धरुन विरोध वा समर्थन झाले आहे. हा विषय मुख्यत: ज्योतिषाकडे जाणारी व्यक्ती म्हणजेच जातक यांच्या करता आहे. परंतु यांना केन्द्र बिंदू मानून चिकित्सा केली जात नाही. जातक हा चिकित्सकही बनू शकतो अशी भूमिका मांडताना त्याची मानसिक जडणघडण विचारात घेतली आहे. फलज्योतिष हा श्रद्धेचा विषय झाला की चिकित्सेच्या वाटाच बंद होतात. चिकित्सेला प्रवृत्त करण्यासाठी काही तडजोड करणे ही आवश्यक असते. ती तडजोड म्हणजे जातकाला वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
फलज्योतिषातील समर्थक वा विरोधी मते यातील विविध अंतर्प्रवाह मला जवळून पहायला मिळाले. अत्यंत तटस्थ राहून मी फलज्योतिष चिकित्सा केली आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. टीकाकार या नात्याने अंतर्विसंगती मांडायच्या झाल्या तर त्या फलज्योतिषीय परिभाषेत मांडाव्या लागतील. त्या फक्त अभ्यासकांनाच समजतील सर्वसामान्य माणूस चिकित्सेपासून पुन्हा वंचितच राहिल म्हणून तो विषय फलज्योतिषीय पातळीवर फारसा मांडला नाही. चिकित्सा करताना दोन्ही बाजू अभ्यासक या नात्याने समजावून घेताना कधी सुसंगतीतही विसंगती आढळली तर कधी विसंगतीतही सुसंगती आढळली. हेच तर मानवी स्वभावाचे वैशिष्टय आहे. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत हे भान ठेवून चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने वाचकांना काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 Sep 2009 - 4:44 pm | प्रशांत उदय मनोहर
षडाष्टकाला "मृत्युषडाष्टक" केव्हा म्हणतात व "प्रीतीषडाष्टक" केव्हा म्हणतात या गोष्टी well defined आहेत. तुमची वरील वाक्ये निश्चितच misleading आहेत. अर्थात, तुमच्या त्रुटी काढण्याला जर तुम्ही "चिकित्सक अभ्यासाला विरोध" म्हणत असाल, तर माझा नाईलाज आहे.
याबद्दल दुमत नाहीये. पण याचा अर्थ चिकित्सात्मक अभ्यास करताना "misleading statements करणे माफ" असं होत नाही.
फलज्योतिषात अंतर्गत विसंगती आहेत हे मी नाकारत नाही. पण त्या विसंगती शोधताना पदरचं टाकण्यात येऊ नये ही अपेक्षा आहे. फलज्योतिषात आहे की नाही, हे तपासणं वेगळं आणि त्याला थोतांड म्हणून सिद्ध करत बसणं वेगळं. :)
असो.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
6 Sep 2009 - 4:56 pm | प्रशांत उदय मनोहर
अशाप्रकारे अतिरिक्त वाक्ये टाकल्याने "फलज्योतिष थोतांड आहे" या मुद्द्याकडे mislead करण्याचा आपण प्रयत्न केल्याचा वास येतो. वास्तविक या वाक्यांच्या आधीच प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालेलं होतं.
The thing is, the flow of your text was projected towards your presumed conclusions. याला चिकित्सात्मक अभ्यास/संशोधन म्हणत नाहीत.
आपला,
(परखड) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
6 Sep 2009 - 11:04 pm | प्रकाश घाटपांडे
आमचा फलज्योतिषातील अपप्रवृत्तीवर प्रहार आहे. आपण चिकित्सक अभ्यास/ संशोधन म्हणा अगर म्हणु नका. आम्हाला जे सभोवती दिसत ते आम्ही मांडतो. आमच म्हणण पटलच पाहिजे असा आमचा कधीही आग्रह नसतो. पण त्यानिमित्ताने विचार प्रक्रिया चालु होते असे आमचे निरिक्षण आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Sep 2009 - 8:09 am | प्रशांत उदय मनोहर
अपप्रवृत्तीवर प्रहार करू नये असंही माझं म्हणणं नाही. पण "फलज्योतिषातील अपप्रवृत्तीवर प्रहार" आणि "फलज्योतिषावर चिकित्सक अभ्यास/संशोधन" या गोष्टी भिन्न आहेत.
पुस्तकातल्या अतिरिक्त लेखनामुळे तुमच्या साध्याच्या विरुद्ध दिशेने वाटचाल होतेय. ज्यांना फलज्योतिषाबद्दल थोडं आकर्षण आहे व ज्यांनी थोडं वाचन केलंय, त्यांना या अतिरिक्त बाबी खटकतात. परिणामत: अपप्रवृत्तींपासून परावृत्त होण्याऐवजी तिथे प्रवृत्त होण्याचा संभव आहे.
तुम्हाला खरोखर चिकित्सा करायची असेल तर या मुद्यांकडे लक्ष्य द्यावं ही विनंती.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
11 Aug 2010 - 12:16 pm | प्रकाश घाटपांडे
मंडळी , आता मिपावर लई नवीनवी मंडळी आल्यालीत तव्हा म्हन्ल जरा धागा उकरुन काढावा. फलज्योतिषाची चाचणी कशी असावी हा खुपच वादग्रस्त मुद्दा आहे.
11 Aug 2010 - 12:32 pm | मदनबाण
ते नविन राशी कुठली भरती झाली हाय त्याच्या इषयी काही तरी सांगा की राव...सर्पधारी असं काहीस हाय वाट्टं
11 Aug 2010 - 12:49 pm | प्रकाश घाटपांडे
http://mr.upakram.org/node/806 प्रश्न क्र ११ मदी लिवलय ना! काही विशेष नाहीये ते
पण मला या धाग्यावर चाचणीच्या काही अभिनव कल्पना लोकांच्या डोक्यात कशा आहेत हे अजमावयाचे आहे