एक टरकावणारा अनुभव

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
28 Jul 2009 - 2:55 pm

२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते.

वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन. त्यामुळे पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला गवळी त्या दिवशी रात्री वडगांव पाचपीरला पोहोचला तेव्हा गावाचा जावई रहायला आल्यासारखे तिथे त्याचे स्वागत झाले. अर्थातच पुण्याच्या परसदारातच डॅडी आल्यामुळे माझे क्राईम रिपोर्टर म्हणुन तिकडे बारीक लक्ष होतेच.

गवळी तिथे येवुन दोन दिवस झाले अन मला माझ्या संपादकांनी मी तिथे जावुन, परिस्थिती पाहुन अन जमले तर गवळीला स्वतः भेटुन सविस्तर बातमी करण्याबाबत सुचवले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेचच सर्व व्यवस्था केली अन २५ जानेवारीला भल्या पहाटे वडगांव पाचपीरला रवाना झालो. बरोबर होते माझा फोटोग्राफर सहकारी, माझ्या वृत्तपत्राच्या सिस्टर कन्सर्न वृत्तपत्रातले एक ज्येष्ठ पत्रकार आणि गवळीला पहाण्यास उत्सुक असलेला आमचा आणखी एक पत्रकार मित्र.

भल्या पहाटे साडेसहा सात वाजता (पत्रकारांचा दिवस सहसा दुपारी सुरु होतो आणि रात्री एक्-दोन नंतर केव्हातरी संपतो. त्यामुळे नऊ-दहा वाजण्यापुर्वीची कोणतीही वेळ आमच्या दृष्टीने भली पहाटच असते.) निघाल्यामुळे साडेनऊ दहा वाजेपर्यंत आम्ही वडगांव पाचपीरला पोहोचलो अन लगेचच कामाला लागलो. काही गावकर्‍यांशी बोलल्यावर आम्ही साधारणता अकराच्या सुमारास शिक्रापुर खेड मार्गावरच्या गवळीच्या सासुरवाडीला पोहोचलो.

गवळीची सासुरवाडी म्हणजे मुख्य रस्ता आणि पाच पीरांचा दर्गा यांच्यामधली एक दोन मजली टुमदार इमारत होती. गावाच्या जरा बाहेरच, रस्त्याला अगदी लागुन असलेल्या आणि निळ्या किंवा हिरव्या (आत्त्ता नक्की आठवत नाही) रंगाने रंगवलेल्या त्या इमारतीभोवती साधारण पाच्-सहा फुट उंचीची कंपौंड वॉल बांधलेली होती. ऐसपैस अंगणात एक पत्राचा मांडव टाकला होता. तिथे चुल्हाणावर स्वयंपाक सुरु होता. काही माणसे कंपौंड वॉलवर चढुन वेल्डिंग मशीन वगैरे वापरुन तिच्यावर चार एक फुट उंचीच्या बारीक जाळ्या बसवत होती. मम्मी-डॅडी अन मुलांच्या सुरक्षिततेसाठीच बहुधा. पलीकडे मैदानात मुंबई नंबरप्लेटच्या काही गाड्या उभ्या होत्या.

आम्ही आमची गाडी सुद्धा पलिकडच्या मैदानात लावली अन ड्रायव्हरला तिथेच सोडुन चालत घराकडे निघालो. आम्ही घराजवळे पोहोचण्याआधीच काही लोक बाहेर आले अन त्यांनी विचारपुस सुरु केली. जरी ते निरुपद्रवी दिसत असले तरी आवाजात बरीच जरब होती. आम्ही कोण ते कळल्यावर त्यांनी आम्हाला तिथेच थांबायला सांगितले अन माझे व्हिजीटींग कार्ड घेऊन एक्-दोन जण आत डॅडींना वर्दी द्यायला गेले. ते एक्-दोन मिनिटातच परतले अन आम्हाला आत येण्याची खुण केली.

त्यांच्यामागे आत गेलो. घरात शिरल्याशिरल्या डाव्या हाताला एक अरुंद जिना होता, सुमारे तीन्-चार फुट रुंदीचा अन पाच सहा पायर्‍यांनंतर वळणारा. जिन्याच्या वळणार्‍या स्टेपवर चार पाच जण उभे होते. ते डॅडीचे बॉडीगार्ड असावेत हे त्यांच्या एकुण दिसण्यावरुन अन देहबोलीवरुनच लक्षात येत होते. एकुण माहौल दगडी चाळीसारखाच पण मेटल डिटेक्टर मात्र नव्हते. यावेळी आमची झडती घेण्याचा प्रयत्न झाला नाही पण जिन्यात उभे असलेले तरुण मात्र आम्ही आत गेल्यावर सावध झालेले जाणवले.

जिना चढुन गेल्यावर एक सुमारे बारा फुट लांबी-रूंदीची खोली होती तिथेच दारासमोर गवळी एका सोफ्यावर बसला होता, समोर एक टीपॉय त्याच्यावर काही पेपर अन पलीकडे काही खुर्च्या. गवळीच्या डाव्या बाजुला एक मोठ्ठी स्लायडिंग विंडो, ती उघडीच होती अन समोरचा मुख्य रस्ता दिसत होता. आजुबाजुला बांधकामे नसल्याने छान वार्‍याच्या झुळुका येत होत्या. चिमण्या मधुनच आत उडत येत होत्या अन खोलीभर फिरुन, एका कडेच्या कपाटावर बसुन परत बाहेर जात होत्या.

नमस्कार चमत्कात झाले अन डॅडीनं आमच्यासाठी चहा आणायला सांगीतले. चहा येईपर्यंत आम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली अन मुलाखत सुरु झाली. मुलाखत रंगली अन तेव्ह्ढ्यात......

एक मोट्ठा आवाज ऐकु आला अन खोलीत असलेल्या सर्वांचाच थरकाप उडाला. एक मिनिट वाटले गोळीबार होतोय. मी गवळीकडेच पहात होतो. तो दचकला. त्याच्या चेहर्‍यावर तेव्हा जे भाव दिसले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. तेव्हढ्यात जिन्यातुन कुणीतरी धावत येत असल्याचा आवाज आला अन क्षणार्धात त्या खोलीत पंधरा वीस तरुण जमले. सगळ्यांनी लूजर अन जीन्स घातलेल्या अन त्यांचे हात लूजरखाली, बेल्टजवळ होते. त्यांचे दिसणे, त्यांचे हावभाव अजुनही डोळ्यासमोर आहे पण त्याचे वर्णन करण्याला माझ्याकडे शब्द नाहीत.

क्षण दोन क्षण वातावरणात जबरदस्त तणाव. कुणीच बोलत नव्हते. आम्ही सोफ्यावरच्या डॅडींकडे पहात होतो. डॅडी दाराकडे अन दारातुन आत आलेले लोक आमच्याकडे. अन तेव्हड्यात पंख फडफडण्याचा आवाज आला. वर पाहिले तर आमव्या डोक्यावरुन उडत एक चिमणी खिडकीतुन बाहेर चालली होती. तिलाही बहुधा त्या तणावपुर्ण वातावरणात थांबावेसे वाटले नसावे.

अन त्यानंतर सर्वप्रथम भानावर आला तो आमचा फोटोग्राफर मित्र. त्याने नजर वळवुन खोलीभर फिरवली अन तो हसला. "काही नाही. बल्ब फुटला. चिमणीचा धक्का लागला बहुतेक," तो हसुन म्हणाला अन त्याने खिडकीच्या विरुद्ध बाजुला असलेल्या भिंतीच्या तळाशी फरशीकडे बोट दाखवले. सर्वाच्या नजरा क्षणार्धात तिकडे वळल्या तर तिथे काचेचे तुकडे पडलेले होते.

मग डॅडीची भानावर यायची वेळ होती. तोही हसला अन म्हणाला, "काही नाही. बल्ब फुटला. काळजीचं कारण नाही. आँ!" मग आमच्याही ओठांवर हसु फुटले. विचित्रच अवस्था होती ती - ओठांवर हसु अन अंगातुन घामाच्या धारा, अंगावर शहारे अन कापणारे हात-पाय. मग खोलीत आलेल्या इतर लोक पण सैलावलेले जाणवले. काहीनी तर स्मित पण केले.

मग डॅडीने ताठ बसत हुकुम सोडायला सुरुवात केली. "अरे इथे बघत काय बसलाय. आँ? बाहेर जा, चहाचे काय झाले ते बघा आँ! का साहेब तुम्ही जेवुनच जाणार. तयार आहे जेवण आँ?" अन मग वातावरण सैलावले. आम्ही जेवायला, चहाला नको म्हणालो तर चहा तरी घ्याच म्हणुन आग्रह झाला. शेवटी कसातरी चहा घेतला अन घराबाहेर पडलो.

घराबाहेर येवुनपण छातीत धडधडत होते, हातपाय लटपटत होते. फोटोग्राफरने ते काचांचे तु़कडे बघितले नसते अन काय झाले त्याचा अंदाज बांधला नसता तर काय झाले असते याचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. मग गाडीत बसण्याआधी शांत व्हावे म्हणुन आम्ही घरामागच्या दर्ग्यात गेलो तर तिथे पन्नास साठ तरुण आडोश्याला पडुन आराम करत गेलो, काही जण पत्ते खेळत होते. ते कोण होते ते त्यांच्याकडे पहाताच लक्षात येत होते. आम्ही आत गेलो तर पत्ते खेळणार्‍या तरुण एकदम सावध झाले अन आमच्याकडे टक लावुन पहायला लागले. शेवटी कसेतरी दर्ग्याचे दर्शन घेतले अन ठोकली धुम तिथुनपण. सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!

वाङ्मयमुक्तकनोकरीजीवनमानप्रकटनविचारलेखमाध्यमवेधअनुभव

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2009 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा मागचा अनुभव आणि हा अनुभव वाचून एक वाक्य आठवलं:
संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं.

बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?

अदिती

प्रसन्न केसकर's picture

28 Jul 2009 - 3:19 pm | प्रसन्न केसकर

>>संकटात सापडलेलं मांजरही वाघ बनतं.

अहो तो फोटोग्राफर खरच वाघ आहे. त्याच्याबरोबर असाईनमेंट करताना एकदम निर्धास्त वाटायचे. अनेकदा त्याच्या प्रसंगावधानानेच आमचे जीव वाचलेत. (भूतकाळ एव्हढ्यासाठीच की आता आम्ही एका संस्थेत काम करत नाही.)

>>बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?

तसे काही नाही हो आदितीताई. अहो तुम्ही स्वतः सुंदर लिहिता. डिटेलिंग एव्हढाच माझा स्ट्राँग पॉईंट - ते ही व्यवसायामुळे. लिहिण्याची शैली वगैरे बाबतीत मात्र मला काही कळत नाही.

कौतुकाबद्दल आभार

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jul 2009 - 3:13 pm | बिपिन कार्यकर्ते

पुनेरीशेठ, काय लावलंय काय? आँ? एकामागूनएक थरारक आठवणी... च्यामारी, नेक्ष्ट व्हिजिटला आख्खी रात्रच मोकळी ठेवतो. काय, आँ?

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

28 Jul 2009 - 3:20 pm | निखिल देशपांडे

पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत...
तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे...

निखिल
================================

नंदन's picture

28 Jul 2009 - 11:54 pm | नंदन

असेच म्हणतो, हाही अनुभव जबरदस्त.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

28 Jul 2009 - 3:20 pm | निखिल देशपांडे

पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत...
तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे...

निखिल
================================

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jul 2009 - 3:30 pm | परिकथेतील राजकुमार

हा ही अनुभव जबर्‍याच !

आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक.

'पुनम' का चांद
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

टारझन's picture

28 Jul 2009 - 11:21 pm | टारझन

आता मात्र तुमची गाठ घेणे गरजेचे बनले आहे हो मालक.

+१ , भेटायलाच हवंय एकदा !!

"पौर्णिमा" चा चंद्र
©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º©
'माझी सहि विडंबण सेवा बंद आहे .

ऋषिकेश's picture

28 Jul 2009 - 3:36 pm | ऋषिकेश

भ ह न्ना हा ट!!!
नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी!

बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?

अदितीसारखंच म्हणतो

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2009 - 5:35 pm | स्वाती दिनेश

भ ह न्ना हा ट!!!
नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी!
बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?
अदिती आणि ऋषिकेशशी एकदम सहमत.
स्वाती

मस्त कलंदर's picture

28 Jul 2009 - 6:18 pm | मस्त कलंदर

नुसतं वाचून अंगावर सर्रकन काटा आला! तिथे काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी! बाकी तुमच्या वर्णन करण्याच्या, लिहीण्याच्या उत्कृष्ट शैलीबद्दल म्या पामर काय लिहीणार?

अक्षरशः सहमत.. आणखीही अनुभव येऊदेत तुमच्या पोतडीतून...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

घाटावरचे भट's picture

28 Jul 2009 - 10:17 pm | घाटावरचे भट

फारच भ ह न्ना हा ट!!

सुनील's picture

28 Jul 2009 - 3:39 pm | सुनील

वाघाच्या गुहेत दोनदा?

मस्त अनुभव आहेत एक-एक. अजून येउद्यात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टुकुल's picture

29 Jul 2009 - 12:04 am | टुकुल

येवु द्या अजुन अनुभव..
खात्री आहे कि पोतडी बरीच भरलेली आहे.

--टरकलेला टुकुल.

दशानन's picture

28 Jul 2009 - 3:43 pm | दशानन

पुनेरीभाउ.... तुमचे एक एक अनुभव जबरदस्त आहेत...
तुमची लिहायची शैली पण मस्तच आहे... सुरेख लेखन व जबरदस्त अनुभव.
+++++++++++++++++++++++++++++

प्रकाश घाटपांडे's picture

28 Jul 2009 - 5:31 pm | प्रकाश घाटपांडे

सरळ गाडी काढली ती ऑफिसमधे परतेपर्यंत कोठेच थांवबली नाही, अगदी लघुशंकेलासुद्धा!

अरे बापरे लोकांच शंकानिरसन जागेवरच झाल असत. /:)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रसन्न केसकर's picture

28 Jul 2009 - 5:37 pm | प्रसन्न केसकर

शंकानिरसन जागेवरच झाल असत.
नशीबाने आमचे झाले नाही. तसे धाडस वगैरे काही नाही. बहुधा ते व्हायला लागते तेव्हढीसुद्धा शुद्ध उरलेली नसावी. ;)

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

अनामिक's picture

28 Jul 2009 - 5:44 pm | अनामिक

जबरी अनुभव. असेच अजून येऊ द्या पोतडीतून!

-अनामिक

प्राजु's picture

28 Jul 2009 - 11:40 pm | प्राजु

हेच म्हणते...
पोतडीतून येऊद्या अजून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

28 Jul 2009 - 10:16 pm | लिखाळ

विलक्षण थरारक.
फार छान लिहिता आपण. अजुन लिहा.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

टारझन's picture

28 Jul 2009 - 11:18 pm | टारझन

झबरदस्त टरकलो

- टरकलोझन

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jul 2009 - 11:20 pm | llपुण्याचे पेशवेll

छान. असेच थरारक अनुभव येऊदेत पोतडीतून बाहेर.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शैलेश देशमुख's picture

28 Jul 2009 - 11:34 pm | शैलेश देशमुख

डॅडीचा फोटो खेचायला हवा होता बल्ब फुटला तेव्हा. :)