मोबाइल हॉल मधे ठेवला होता.
तरी सुद्धा सकाळी साडेपाच ला जाग आली.
बायॉलॉजिकल अलार्म.
नाईट लॅम्प च्या मंद प्रकाशातुन बाहेर निघालो तर आरशातुन एक हाक अयकु आली.
"ओ मास्तर, कुठे चालले? आज काही शेड्युल नाही ना. गप्प झोपा की."
बर बर. निसर्गाची हाक पुर्ण करतो.
" हो, नंतर चहा मागाल बायकोकडे"
नाही.
" उद्यापासुन हेवी असेल ना शेड्युल. संधी मिळाली आहे तर गपगुमान झोपा की. एकदिवस जरा उशीरा गेलात तर ऑफिस काही वाहुन जाणार नाही"
बर बर
परत अंथरुणावर पसरताना त्याला वाकुल्या काढुन वेडावुन दाखवले.
उठलो ते एकदम साडे आठ वाजता.
चहा पिता पिता बायको म्हणाली,
" सकाळी कुणाकडे बोलत होतात"
स्वःतकडे
"कमाल आहे, ती भावाची नात सुद्धा रात्री अडीच वाजता अशी उठुन बोलत बसते म्हणे"(वयः ९ महीने)
हम्म
मोबाइल तपासला. अनोळखी फोनचे ५ मिस्ड कॉल होते.
इतक्यात त्याच फोन वरुन परत फोन आला.
" सर, सुप्रभात. मी अमुक. तमुक ने तुमचा फोन दिला. जरा सल्ला हवा होता.
आता हा तमुक कोण ते मला आठवेना.
"फोन वर बोलु का घरी येउ" अमुक
नको ऑफिसमधे या.
_________________________________________________________________________________
ऑफिसमधे मी पोचायच्या आधी अमुक पोचला होता.
मिपावरच्या 'घोड्बंदर वाचक' मित्रमंडळापैकी एक.
" अहो सर, तुम्ही तमुकाना सल्ला दिला होता. तो एकदम लागु पडला. त्यांनी सांगितले म्हणुन तुमच्या कडे आलो"
(आयला, ह्या तमुकच्या)
बोला.
"मला स्वप्ने पडतात"
सगळ्याना पडतात.
"विचित्र असतात, सर्व आठवतात सकाळी"
सगळ्यांना पडतात, काहीना संपुर्ण आठवतात
"नाही जरा वेगळच आहे प्रकरण"
सविस्तर सांगा.
"झोपल्यावर पडणार्या स्वप्नात जागा असलेला 'मी' पण सामील असतो."
म्हणजे काय?
"अस बघा जागृत अवस्थेत असलेला 'मी' आणि झोपलेला 'मी' हा वेगळा असायला हवा की नाही"
असायलाच पाहीजे असे काही नाही.
" काल मला एक स्वप्न पडल. त्यात मी फर्स्ट क्लास मधे उभा आहे. कुर्ला स्टेशन गाडीने सोडले. वेग पकडला. इतक्यात एक बाई चालत्या गाडीतुन खाली उतरली. त्या मागोमाग एक वर्षाचे बाळ वेग पकडलेल्या गाडीतुन उतरले. झोपेतल्या 'माझा'हा प्रकार बघुन श्वास कोंडला. जागृत "मी" मधे आला आणि झोपेतल्या ' मला' हे स्वप्न आहे हे समजवले. आणि झोपेतला मी शांत झाला"
" आणखी एक स्वप्न सांगतो. मी समुद्रकिनार्यावर बसलो आहे माझ्या शाळेतल्या मैत्रीणीबरोबर. तीचे तिचे पीन्गट केस माझ्या गालाला स्पर्श करताहेत. आमचे लग्न ठरले आहे. थोड्या वेळाने मी घरी येतो. वहीनी विचारते तेंव्हा लक्षात येते की तीचा मोबाईल नंबर माझ्या कडे नाही. वहीने ओरडते,"झाले भावोजी केलात का पहील्याच दिवशी बावळटणा". झोपेतला मी पॅनिक होतो. जागृत 'मी' मधे येतो आणि झोपेतल्या 'मी' ला समजावतो, अरे मुर्खा, तुझे लग्न होउन १० वर्षे झालीत. तुझी बायको ही नाही.शांत राहा. मग झोपेतला" मी" परत शांत होतो.आणि हे सर्व सकाळी संपुर्ण आठवते आणि त्रास होतो.
अहो मी सायकॉलॉजिस्ट नाही.
" मला माहीत आहे ते. पण तुमुक ची केस अशीच कॉम्प्लीकेटेड होती ती तुम्ही सोडवलीत की. मला पण काय करु ते सांगा?"
अहो ते मी जे काही सांगितले तो निव्वळ अंदाज होता. अगदी टोळंभट्टा सारखा.
"माझ्या साठी पण तसाच करा. सायकिट्रीस्ट म्हणतात की मला 'डीप चाईल्ड हुड ट्रोमा' आहे.
अहो तो सर्वांना असतो.
सोळा वर्षे झाल्या वर जुने आठवुन 'आय हेट माय मदर्,किंवा फादर' हे काही नविन गोष्ट नाही.
तुमचे सहजीवन बरोबर आहे ना.
" तसा काही प्रॉब्लेम नाही. आता 'सर्व काही' थोडेच मीळते. कधी कधी जेवणातपण कमी जास्त होते. पण चालवुन घेतो."
तुमची आई उत्कृष्ट जेवण करायची का?
"अगदी बोटे चाटायला लागतील असे. लग्नानंतर सर्व बायकोने ताबा घेतला"
(टीपीकल मम्मा'ज बॉय)
शाळेतल्या मुलीवर प्रेम होते का?
"एकतर्फी"
माझ्या मते तुम्ही झोपता तेंव्हा भुतकाळात जाउन वर्तमानात कमी असलेल्या गोष्टी शोधता. आणि ते चुक आहे अशी अपराधीपणाची भावना तुमच्यातल्या जागृत 'मी' ला मधे आणते. बाकी काही त्रास नाही असे मला वाटते.ह्यावर कसलेही सिडेटीव हा उपाय नाही.
"आता यातुन बाहेर कसे यायचे?"
बघा हो, माझा एक टोळंभट्टी उपाय. जमला तर जमला. एक लिस्ट करा,तुमच्या मनासारखे जे होत नाही त्याची. बायकोला दाखवा. तीला विश्वासात घेउन त्यात काय जमते ते बघा. जे जमत नाही त्याचा आग्रह करु नका.
सकाळी उठल्यावर आरशातल्या प्रतिबंबाला वेडावुन दाखवा.त्याच्याबरोबर खीखीखीखी करा. एक महीन्यात उतार पडेल.(आयला निदान एक महीना तरी मी सुटलो)
अमुक धन्यवाद म्हणुन निघुन गेला.
३० व्या दिवशी फोन आला. आता'जागृत' अमुक झोपलेल्या 'अमुक' ला त्रास देत नाही.
जाता जाता: आता अमुक ला जे जमत नाही त्याचे काय?
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 2:30 pm | बिपिन कार्यकर्ते
वा मास्तर!!! भारी समुपदेशान!!! आरशासमोर उभे राहून स्वतःशी बोलणे हा एक चांगला उपाय आहे. आजपासून करतो. फक्त सकाळी सकाळी स्वत:चेच तोंड बघायचे म्हणजे दिवस बेक्कारच जाणार. त्यासाठी समुपदेशन द्या मास्तर आता.
'अमकी' येईलच की मग तुमच्याकडे, समुपदेशनासाठी. ;)
बिपिन कार्यकर्ते
28 Jul 2009 - 2:41 pm | अनिल हटेला
--->सकाळी सकाळी स्वत:चेच तोंड बघायचे म्हणजे दिवस बेक्कारच जाणार. त्यासाठी समुपदेशन द्या मास्तर आता.
ऐसाईच बोल्ताये.....
=)) =))
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
28 Jul 2009 - 4:14 pm | विजुभाऊ
एक सोपा उपाय.
तुम्हाला बायकोला जे काही बोलायचे असेल ते सगळे बायको जागी याची खात्री करुन घ्या आणि स्वप्नात बोलत आहात असे बोला.
सकाळी ऊठवल्यावर बायको काही विचारणार नाही. दिवसभरात वेळ मिळाल्यावर कधितरी स्वप्ने खरी होतात का/ माणसे त्यांच्या मनातल्या सूप्त भावना झोपेत बोलतात असे काहीसे वाक्या दर पाच तासानी एकदा पेरा.
समजा बायकोने काही विचरले तर आठवत नाही पण ते त्यानन्तर ते वाक्य पेरायला मात्र विसरु नका.
सुखी संसाराचा हमखास उपाय.
हवे तर डाम्बीसकाकाना विचारा.....
28 Jul 2009 - 2:58 pm | विजुभाऊ
मास्तर मला बघा ही
http://misalpav.com/node/1699 अशी
आणि http://misalpav.com/node/1712 अशी स्वप्ने पडतात.
28 Jul 2009 - 3:50 pm | परिकथेतील राजकुमार
भारीच समुपदेशन हो मास्तर !
एकदम रामबाण उपाय शोधता की तुम्ही.
"बायॉलॉजिकल अलार्म." हे वाक्य हृदयाला भिडले.
व्यक्तिगत टिप्पणी करणारा मजकूर संपादित. पुन्हा असे झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल..
आणिबाणीचा शासनकर्ता.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
28 Jul 2009 - 4:19 pm | दशानन
नेहमी प्रमाणचे भारीच समुपदेशन हो मास्तर !
+++++++++++++++++++++++++++++
28 Jul 2009 - 6:21 pm | टारझन
वा !! छाण भारी .. लै उत्तम ..
हा ही लेख काळजाला भिडला आहे ..
धन्यवाद मास्तर
- टारझन
(माझी सही विडंबण सेवा बंद आहे)
28 Jul 2009 - 10:46 pm | वेताळ
आरश्यात स्वःताला बघुन बोलण्यावरुन आठवले की कुणी तरी एकाला असाच एकाद्या झाडासमोर उभे राहुन मनातील जे काही विचार तुंबले आहेत ते झाडासमोर बोलण्याचा सल्ला दिला होता. त्याने दररोज सगळे तुंबलेले विचार झाडासमोर बोलण्यास सुरुवात केली. परिणाम व्हायचा तोच झाला. ते झाड थोड्या दिवसात मरुन गेले.तसे आरसा फुटायचा तर नाही ना? :))
वेताळ
29 Jul 2009 - 8:08 am | श्रीयुत संतोष जोशी
"बायॉलॉजिकल अलार्म." अगदी बरोबर.
मी पण रात्री कितीही वाजता झोपलो तरी सकाळी बरोब्बर ५.३० वाजता हमखास जाग येतेच.
आणि समुपदेशन भारीच.
आरशासमोर उभं राहून बोलणे हा " पर्सनालिटी डेव्हलपमेन्ट " चा एक भाग आहे एव्हढंच आजपर्यंत माहीत होतं.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
29 Jul 2009 - 8:50 am | पाषाणभेद
हेच म्हणतो.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
31 Jul 2009 - 8:42 am | अवलिया
वा ! मस्त !!
सुरेख लेखन, असेच लिहित रहा !
31 Jul 2009 - 9:26 am | दशानन
"बायॉलॉजिकल अलार्म." अगदी बरोबर.
मी पण रात्री कितीही वाजता झोपलो तरी सकाळी बरोब्बर ५.३० वाजता हमखास जाग येतेच.
आणि समुपदेशन भारीच.
:)
बायॉलॉजिकल अलार्म - जबरदस्त !
माझे डोळे खाडकन ६.१० मिनिटाला रोज उघडतात... व ६.२० मिनिटानी परत बंद होतात व मग सरळ बहाद्दुर नाही तर कोणी तरी मित्र पाणी मारुन ८.०० च्या आसपास उठवतात हाच आमचा बायॉलॉजिकल अलार्म ;)
** समुपदेशन जबरा ... जिओ मास्तर !
+++++++++++++++++++++++++++++