आणखी एक पुणेरी पाटी...

ओंकार देशमुख's picture
ओंकार देशमुख in कलादालन
21 Jul 2009 - 10:37 pm

पुणेकरांच्या सूपिक डोक्यातून नेहमीच नवीन काहीतरी उगवत असतं...
पुणेरी पाट्या म्हणजे तर बारमाही पीक...
आता खालची पाटी बघून कोणी या मेस मधे जेवायला जाइल का असा प्रश्ण नक्कीच पडेल...
पण ह्या पाटीवरून पुणेकर मंडळी नियमांची किती पक्की असतात हे लक्षात येतं !!
गिहाईक गेलं तरी चालेल ,पण नियम हे पाळलेच गेले पाहीजेत....

http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/07/blog-post.html

http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/07/blog-post.html

विडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Jul 2009 - 10:47 pm | प्राजु

हाहाहा... सह्हिये!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बबलु's picture

22 Jul 2009 - 5:03 am | बबलु

:)

....बबलु

भाग्यश्री's picture

22 Jul 2009 - 5:13 am | भाग्यश्री

पाटी भारीच..
पण ती खालची सही काय अगम्य आहे!! लोल !

http://www.bhagyashree.co.cc/

प्रियाली's picture

22 Jul 2009 - 6:13 am | प्रियाली

मिसळपाव नावाच्या हाटेलावरही अशी जबरा पाटी लावा. ;)

छोटा डॉन's picture

22 Jul 2009 - 7:07 am | छोटा डॉन

>>मिसळपाव नावाच्या हाटेलावरही अशी जबरा पाटी लावा.
=)) =)) =))
अगदी अगदी अगदी सहमत आहे ...
जबरा आणि एकदम फिट्ट पाटी आहे त्यासाठी, ही घ्या ...

" कॄपया मेसचे नियम नीट वाचा व त्याचे पालन करा. नंतर मुर्खासारखे वाद घालत बसु नका"

------
छोटा डॉन काणे
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

Nile's picture

22 Jul 2009 - 7:30 am | Nile

थोडीशी सुधारणा चालेल का हो? ;)

"कॄपया मेसचे नियम नीट वाचा व त्याचे पालन करा. नंतर मुर्खासारखे वाद घालत बसु नका आणि नाही आवडले तर च. घा. चा. प."

:$ कुठं आहेत रे माझ्या?

छोटा डॉन's picture

22 Jul 2009 - 7:40 am | छोटा डॉन

लै भाई नाईल भौ ...

"शिवाय कसलेही स्पष्टीकरण देण्यास मेसचालक बांधील नाहीत" हे एक कमल जोडुन टाका ह्यात हातासरशी ...
( तोवर आम्ही चपला घालुन निघतो .... ;) )

------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

अवलिया's picture

22 Jul 2009 - 9:50 am | अवलिया

हा हा हा
खालती सही टाका "आणीबाणीचा शासनकर्ता"

चपला ? आम्ही चपला घालुनच वावरतो ;)

--अवलिया

पाषाणभेद's picture

22 Jul 2009 - 7:28 am | पाषाणभेद

पुणेरी पाटी ही ईरसालपणाची झलक देते. त्या पाट्यांवरून तो दुकानदार , संस्था यांचा स्वभाव कसा असेल याची चुणूक देतात. मला वाटते ती एक पुणेरी संस्क्रूतीचा भाग असावी.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

अडाणि's picture

22 Jul 2009 - 8:29 am | अडाणि

दगड फोडता फोडता तु स्वताचे डोके आपटुन घेतले काय ??? च्यायला काही पाट्या काय त्या वरून पुण्याची संस्कॄती काय ?

पुण्या बाहेरून येणार्‍या मुर्खांसाठी अश्या पाट्या आवश्यक असतात, त्याला पुणेकर काय करणार...

-
अफाट जगातील एक अडाणि.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2009 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐला, मला वाटलं आता झकासपैकी पुणेकर-पुण्याबाहेरचे असा वाद झडेल, मग आणिबाणीचा शासनकर्ता येईल "आहे हे असंच आहे, आवडत नसेल तर चपला तयार ठेवा" वगैरे ऐकवतील तर इथे सामोपचाराची भाषा!

असो, मी माझे फ्लोटर्स घालून या धाग्यातूनतरी बाहेर पडते.

(फ्लोटर्सवाली) अदिती
आता यावरून फ्लोटर्सच चपला का नाही असा वाद उकरू नये! काय आहे, कोल्हापूरी चपला "आपल्या" वगैरे बोलायला ठीक आहे. पण बोंबलायला त्या एकतर मुली-बायकांसाठी बनवतात असं वाटत नाही, त्यातून या पावसाळी हवेत चामडी चपला घालून काय 'स्केटींग' खेळायचं आहे का? त्यापेक्षा आपले "विदेशी" फ्लोटर्स बरे!

पाषाणभेद's picture

22 Jul 2009 - 11:25 am | पाषाणभेद

असल्या पाट्या पुण्यात जागोजागी दिसतात. पुण्याच्या काही लोकांनी तर त्याची वेबसाईट्पण केली आहे. त्यात अनेक ईरसाल पाट्या आहेत. त्या राहण्याच्या ठिकाणच्या आहेत, मनपा च्या आहेत, मंदिराच्या आहेत, किराणा मालाच्या दुकानाच्या, हॉटेलच्या पण आहेत. उदाहरणादाखल सदाशिव पेठेतली ही पाटी पहा. या वरील सर्व ठिकाणी तर पुण्या बाहेरून येणारे सर्व मुर्ख जात नसतील. त्यात काही सुजाण पुणेकर पण जात असतीलच. तरीही असल्या पाटया लिहीण्याची काय आवश्यकता भासते हे सर्व सुजाण पुणेकर जाणत असतीलच.

आता संस्कॄती संस्कॄती म्हणजे काय याचा उहापोह करू. प्राचीन काळापासून आपल्या पुर्वजांनी जे काही केले, जे उपचार केले ते ते आपण पाळतो. (उदा. दहन करणे, दफन करणे, गुढी उभारणे, ताबूत काढणे, ख्रिसमस साजरा करणे, पाय लागल्यास पाया पडणे इ. (बघा मी सर्व धर्म घेतले)) ( आता काही म्हणतील की मला हे मान्य नाही. मी अ‍ॅव्हरेज पब्लीक बद्दल बोलतोय. केवळ एक व्यक्ती किंवा छोटा समूह हा संस्कॄती ठरवू शकत नाही. )
त्याच चालीवर या पाट्यांकडे बघु या. म्हणजे कसे, सुरूवातीला एका दुकानदाराने असली पाटी लिहीली. ते बघून दुसर्‍याने तसली ईरसाल पाटी लिहीली. हि साथ पसरत गेली. कोणती पाटी चांगली कोणती वाईट हे न ठरवता , समोरचे गिर्‍हाईक परत गेले तरी चालेल पण पाटी ठेवूच हा बाणा असल्या दुकानदारांचा. बरे या पाट्या कमीतकमी तिन पिढ्या तरी वाचत असतील. म्हणजेच आजोबाच्या दुकानातली पाटी नातवानेपण बदलली नाही. त्याने तर त्यांना आधूनीक रंग ढंग देवून सजवीले, नविन नविन मजकुर टाकले. ही संस्कॄती नाही तर काय म्हणायची.

अहो हीच संस्कॄती कदाचीत पुण्याची ओळख असेल बाहेरच्या जगतात.
असलीच पाट्यांची साथ पुण्यात बघून इतर गावचे लोक पण त्याची कॉपी करत असावेत.

जाता जाता: माझी एक पुणेरी नसलेली नातेवाईक स्री नांदायला पुण्यात आली. तशी ती रूळली असेल पण आम्ही त्यांच्या घरी ती नवीनच असतांना गेलो होतो. तिने आम्हांला, "चहा घेवूनच आला असाल" विचारले.
आत्ता बोला.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

छोटा डॉन's picture

22 Jul 2009 - 11:32 am | छोटा डॉन

पाषाणभेदशेठ, एवढा मोठ्ठा प्रतिसाद टंकल्याबद्दल आभार ...

पण,
आपली थोडी गल्लत होते आहे.
आपण "संस्कॄती"ची चक्क " जीवनशैली अथवा विचारसारणी" ह्यांच्याशी गल्लत करत आहात, ह्या सर्वार्थाने भिन्न बाबी आहेत ....

आपण "जीवनशैली , विचारसारणी आणि संस्कॄती" हे ३ शब्द आणि आपला वरचा प्रतिसाद पुन्हा पडताळुन पाहिल्यास आपल्याला ह्याची प्रचिती यईल ...
( नाहितर मी आहेच लंबाचौडा सखोल प्रतिसाद टंकायला ) ;)
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

पाषाणभेद's picture

22 Jul 2009 - 12:01 pm | पाषाणभेद

खरे बोललात आपण. आता वर मी "संस्कॄती"ची " जीवनशैली अथवा विचारसारणी" कशी करू?

एक मात्र खरे की पुण्या बाहेरून येणारे व पुण्यातले असला फरक त्या पाट्यांना समजत नाही.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

धमाल मुलगा's picture

22 Jul 2009 - 12:58 pm | धमाल मुलगा

पुणेरी पाट्या म्हणजे च्यामारी निव्वळ बावन्नकशी सोनं असतं बॉ!
आणी अश्या पाट्या क्यामेर्‍यात बंदिस्त करण्याची मोठी हौस आपल्या विजुभाऊंना आहे ;)

आता डानरावांच्या मुद्द्याकडे!

आपण "संस्कॄती"ची चक्क " जीवनशैली अथवा विचारसारणी" ह्यांच्याशी गल्लत करत आहात, ह्या सर्वार्थाने भिन्न बाबी आहेत

ह्याबाबत मी स्पष्ट आणि भक्कम असहमती नोंदवू इच्छितो.
निदान 'हिंदूधर्म' जो केवळ धर्म नव्हे तर समाजाचे आचरण आणि शैली ह्यांचे प्रतिक आहे त्याबाबत तरी वरील वाक्य निदान माझ्यामते लागू पडत नाही.

असो, ह्या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची. (संदर्भः भाईकाकांचे "कोण व्हायचंय तुम्हाला? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर)
भेटूच खरडवहीत ;) ह्या गमतीच्या धाग्यावर अवांतर काथ्याकूट नको, कसें?

आपलाच,
-( लग्नानंतर अस्सल पुणेकर झालेला) ध. :D

छोटा डॉन's picture

22 Jul 2009 - 1:09 pm | छोटा डॉन

पुणेरी पाट्या म्हणजे च्यामारी निव्वळ बावन्नकशी सोनं असतं बॉ!
आणी अश्या पाट्या क्यामेर्‍यात बंदिस्त करण्याची मोठी हौस आपल्या विजुभाऊंना आहे.

+१, सहमत आहे.
पुणेरी पाट्यांची शान आणि सन्मान वेगळाच, लै खास बाब आहे ती आणि पुनेकरांनी अतिशय आपुलकीने ती जपल्याबाबत आम्हाला त्यांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

बाकी आपण भेटुच खरडवहीत, तसेही आपणास डॉनोश्रीच्या खरडवहीत येऊन बरेच दिवस झालेले आहेत ;)

------
छोटा डॉन
काय ? आपण चक्क सहमत आहात ? अहो हे तर चक्क आंतरजालीय बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण की हो ;)

Nile's picture

22 Jul 2009 - 1:12 pm | Nile

आम्हाला विद्वान, पंडीत लोकांचा वादविवाद ऐकायला आवडेल. तरी कृपया नविन काथ्याकुट काढुन आम्हाला तृप्त करावे. :) :)

(चपला घालुनच मेस मध्ये जेवणारा),
नाईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2009 - 2:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चला पुण्यावरच्या धाग्याच्या निमित्ताने का होईना नाईलशेटने त्यांचं नाव देवनागरीत लिहिलं तर!

आम्हाला विद्वान, पंडीत लोकांचा वादविवाद ऐकायला आवडेल. तरी कृपया नविन काथ्याकुट काढुन आम्हाला तृप्त करावे.

अगदी सहमत आहे.
मुद्द्याची कमरतरता पडते असं वाटल्यास योग्य वेळी मुद्दे 'सप्लाय' करण्यात येतील.

अदिती

प्रदीप's picture

22 Jul 2009 - 2:31 pm | प्रदीप

पाषाणभेद,

आता कल्जि घेने.. !!