कर्नाळा - जैत रे जैत

विमुक्त's picture
विमुक्त in जनातलं, मनातलं
21 Jul 2009 - 10:18 pm

गो.नी.दां. च्या दुर्ग भ्रमण गाथेत कर्नाळ्या बद्दल वाचल्या पासुन मला तीथं जायच होतं. नंतर जैत रे जैत बघीतल्या पासुन तर कधी एकदा लिंगोबाला (कर्नाळा) जातोय असं झालं होतं. अलीबाग हून पनवेल ला जाताना S.T. च्या खिडकीतून कर्नाळा बऱ्याचदा बघीतला होता, पण जाणं काही जमलं नव्हतं.

एका weekend ला यशदीप आमच्या घरी आला होता. तेंव्हा आम्हां तिघांचा (मी, मझा भाऊ प्रसाद आणि यशदीप ) कर्नाळ्याला जायचा प्लान ठरला. पनवेल पर्यंत बस आणि मग पनवेल हून कर्नाळ्याला जायला टम-टम मधे बसलो. पनवेल हून पेणच्या दिशेने ५-६ km पुढे गेलो की रस्ता कर्नाळ्याच्या जंगलातूनच जातो आणि झाडीतून लिंगोबा डोकावताना दिसतो.

मी टम-टम वाल्या काकां सोबत गप्पा मारायला लागलो.....

मी: गेलाय का कधी कर्नाळ्याला?
काका: हां...तर....
मी: त्या सुळक्या वर चढतात का लोकं?...
काका: हां... तो काय वरती झेंडा.... पण दोर लावून चढतात... मी नाय कधी चढलो....
मी: दोर न लावता नाही का चढता येत....
काका: आता... चढायचच असेल तर काय.... पण कशाला विषाची परीक्षा घ्यायची?....
मी: खरं आहे... (पण मी एक तरी try मारणार....)

बोलता-बोलता कर्नाळ्याला पोचलो आणि प्रत्येकी २० रुपयाच तिकीट काढून अभयारण्यात घुसलो. पक्ष्यांचा चिवचीवाट आणि दाट झाडी, यामुळं निवांत वाटलं. आत घुसल्या-घुसल्या लगेचच वाटेच्या दोन्ही बाजूला bird trails सुरु होतात. आम्ही bird trails वर न जाता सरळ जाऊन डाव्या हाताला कर्नाळा किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेला लागलो. पायवाट मस्त मळलेली असल्यामुळं वाट चुकायची भीती अजिबात नव्हती. पावसाळा संपून एक महीना झाला तरी ओढ्यांमधे पाणी होतं. वर चढताना सारखं, जैत रे जैत मधलं "वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी...." हे गाणं डोक्यात वाजत होतं. अर्धा तास चढून गेल्यावर डाव्या हाताला प्रबळगड आणि कलावंतीणीचा सुळका दीसू लागला, त्याच्या मागे माथेरानचा दोंगर पण जाणवत होता. "लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला...हा ठाकर गडी तिथं कधी नाय गेला....".हे गाणं गुणगुणत आम्ही पुढे सरकत होतो आणि एकदमच लिंगोबाच दर्शन झालं.

"ह्या दोंगरान आपलं बोट कश्यापाई उचील्लं?..." असा प्रश्न मलापण पडला (जैत रे जैत मधल्या नाग्या सारखाच). मग जैत रे जैत मधले dialogues आणि scenes आठवत किल्यात प्रवेश केला. आत घुसल्यावर समोरच किल्लेदाराचा वाडा आणि त्याच्या मागं आभाळात घुसलेला टेंबा दिसला. टेंबा न्याहाळतच त्याच्या पायथ्याशी पोचलो. टेंब्याच्या पोटात बरीच पाण्याची टाकी आहेत, एका टाक्या जवळ बसून, आणलेलं थोडफार खाऊन घेतलं. मग.........

मी: मला जमेल का रे टेंब्यावर चढायला?
यशदीप: तू चढशील आरामात...
मी: चला...जरा जमतय का ते बघू....
प्रसाद: उगी हीरोगीरी नको करु.... आपटशील तोंडावर...
मी: थोडं चढतो...मग बघूत...

सुळक्याच्या पोटात असलेल्या एका झाडाच्या मदतीनं मी पहिला टप्पा पार केला. मग दगडात कोरलेल्या खोबण्यांच्या मदतीनं थोडं चढलो. आता ३-४ माणूस उंच rock-patch होता आणि थोडा overhang पण होता. overhang पर्यंतचा भाग आरामात चढलो, पण आता उजव्या पायाला काहीच grip मिळत नव्हती. उजवा हात खोबणीत मस्त चिकटला होता आणि डावा पाय पण खोबणीत होता. आता डाव्या हातानं push hold घेऊन सरपटच तो overhang चढलो (उतरताना वाट लागणार ह्याची जाणीव झाली...).


(मी चढताना दिसतोय ह्या फोटोत)

डाव्या बाजूनं जरा वर गेलो आणि मग चारजण बसतील एवढी जागा होती, तीथं थोडावेळ बसलो. आता ६ फुट उंच पायरी सारखा टप्पा पार करायचा होता... दोन्ही हात पायरीच्या वर ठेवले, पायानं जोरात push केलं आणि हातावर शरीर balance करत पायरीच्या वर पोचलो. आता पुढची वाट तशी सोपी होती. पण प्रचंड exposure आणि बऱ्यापैकी scree होती. जरा जपुन हा ट्प्पा पार केला आणि सुळक्याच्या डोक्यावर पाय ठेवला. कसला खुष होतो मी... पहील्यांदा कोणतातरी सुळका चढलो होतो...आणि ते पण एकटा... रोप चा वापर न करता.....अजून काय पाहीजे?....लय भारी. वरुन आजूबाजूचा केवढा परीसर दिसत होता!एखाद्या घारीनं उडत खालचा परीसर न्याहाळावा....तसच क्षणभर मला वाटून गेलं....

थोडा वेळ बसुन उतरायला सुरुवात केली. नजर एकदम प्रचंड खोल दरीतच उतरत होती. जराजरी चुक झाली की एकदम पाताळातच पोचणार होतो. solid concentration नं exposure आणि scree असलेला टप्पा उतरलो. मग ६ फुट उंच पायरी आरामात उतरलो आणि झाडा-झुडपांच्या मदतीनं बराचसा भाग उतरुन overhang च्या ट्प्प्याच्या वर पोचलो. इतक्या वेळ टेंब्याकडं पाठ करुन निवांत उतरत होतो, पण आता मला टेंब्याकडं तोंड करुन उतरावं लागणार होतं. वळलो, पण पाय कुठे ठेवायचे हेच दिसत नव्हतं आणि blindly उतरावं म्हंटल तर फक्त एकाच हाताला grip होती. थोडा वेळ प्रयत्न करुन पाहीले पण खाली काही उतरता येईना, मग परत जरा वर जावून बसलो.
खालून...

यशदीप: काय रे.... जमतयं ना?..
मी: अरे... एका हाताला grip नाही रे...
यशदीप: वर चढताना कसा गेलास मग?....
मी: चढतानाच जाणवलं होतं की उतरताना लागणार आहे ते... पण चढायचच होतं.... आता जरा बोंब आहे...थांब जरा...
प्रसाद: नडलं ना आता... म्हणत होतो....
मी: थांब रे.... grip सापडते का बघतो.....

मग मी बसलो होतो तीथलं आसपासच गवत उपटून, दगडात एखादी खोबण सापडते का ते शोधायला सुरुवात केली. luckily हाताला एक खोबण लागली.
आता दोन्ही हातांना मस्त grip होती...मग दोन्ही हातांनी लोंबकाळत, पायांनी चाचपडत, पाय ठेवायला कुठं खाच सापडते का ते शोधू लागलो. डावा पाय ठेवायला खाच सापडली; पण उजवा पाय अजून हवेतच होता. उजव्या पायाला काही आधार मिळाल्या शिवाय मी खाली सरकू शकणार नव्हतो. जाम टरकली होती आता माझी. भर दुपारची वेळ, घसा कोरडा पडला होता, सर्वांगाला घाम फुटला होता आणि आता बराच वेळ लोंबकळल्या मुळं हात एकदम निर्जीव झाले होते. मग परत वर गेलो आणि थोडा वेळ शांत बसलो.
खालून...

प्रसाद: मी जरा वर येऊन guide करु का?
मी: नको रे.... जमेल मला.... (आणि मदत घेऊन काय खाली उतरायचं...)

हातात परत जरा जीव आल्या सारखं वाटल्यावर, मी पुन्हा लोंबकळत उजव्या पाया साठी खाच शोधू लागलो. पण काही केल्या उजवा पाय ठेवायला काहीच सापडत नव्हतं. जास्त वेळ लोंबकाळण्याच्या स्थितीत नसल्या मुळं, मी डावा हात सोडला (डाव्या हात उजव्या हाता पेक्षा वर होता) आणि अंग जरा खाली सरकवलं तर उजवा पाय मस्तपैकी एका खोबणीत अडकला. आता दोन्ही पायांवर वजन टाकल्या मुळं हातांना जरा आराम मिळाला. डावा हात overhang च्या खालच्या फटीत अडकवून, उरलेला टप्पा उतरलो. हुशशशश्य्.....जरा जिवात जीव आला... मग, थोडा वेळ बसता येईल अश्या जागी पोचलो आणि ओरडून.....

मी: आता झालं.... उतरतो आता आरामात.... (भन्नाट आनंद झाला होता.... फार अंगावर आलं होतं नसतं धाडस...)

मग उरलेला टप्पा निवांतपणे उतरुन, टेंब्यावरुन झाडावर ऊडी घेतली आणि शेवटी खाली पोचलो. लगेचच पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि पोटभर पाणी प्यायलो. जाम थकलो होतो, पण तेवढाच खुष होतो. मनातल्या मनात देवाचे फार आभार मानले.

यशदीप: पश्या... नको करत जावू असलं काही... अवघड वाटलं तर नाही चढायचं... अश्या जागी, अश्या वेळी काही झालं तर काय करणार होतो आम्ही दोघं?....
मी: हो... नाही करणार परत असं...

माझं डोकं एकदम हलकं झालं होतं. कसलेच विचार येत नव्हते. खूप खूप स्वतंत्र असल्या सारखं वाटत होतं. मग त्याच आनंदात संपूर्ण किल्ला भटकलो.
पण अजून सुद्धा असलं काही आव्हान समोर आलं तर मला अजिबात control होत नाही...आणि मग...वनी आनंद...भूवनी आनंद...आनंदी आनंद वनभूवनी....

कथा

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

21 Jul 2009 - 10:33 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

स्वाती२'s picture

21 Jul 2009 - 10:52 pm | स्वाती२

जिंकलत! लै भारी अनुभव.

नीलकांत's picture

21 Jul 2009 - 11:39 pm | नीलकांत

वाह रे भाऊ एकदम झकास.

- नीलकांत

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jul 2009 - 12:23 am | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त. बघा, नुसते फोटो न टाकता असं भारी लिहिलं तुम्ही तर कसलं मस्त वाटलं. लिहित जा हो नेहमी नेहमी. मस्त. मागे हरिश्चंद्रगडावर गेलो होतो पावसाळ्यात तेव्हाची आठवण आली. सगळीकडे निसरडं होतं आणि एकंदरीत वाटच लागली होती.

बिपिन कार्यकर्ते

विमुक्त's picture

22 Jul 2009 - 11:48 am | विमुक्त

हो.. आता जमेल तेव्हा लिहिन....
पावसात हरिश्चंद्रगडावर म्हणजे तर वेडच लागणार... काय जागा आहे ती.... पण आता खुप गर्दी असते... आणि देवळाच्या आजूबाजूला जाम कचरा झालाय....एखादी स्वछता मोहीम काढायला हवी.....

बहुगुणी's picture

22 Jul 2009 - 12:49 am | बहुगुणी

अभिनंदन! (वरून खालच्या दृश्याचा फोटो काढला असतात तुम्हाला 'घारीसारखं' दिसलेलं 'विहंगम' दृश्य आम्हालाही अनुभवता आलं असतं, पण ते जाऊ देत, तुम्ही सहीसलामत परत आलात ते महत्वाचं.)

विमुक्त's picture

22 Jul 2009 - 11:41 am | विमुक्त

टेंब्यावर चढताना camera नव्हता सोबत....

हर्षद आनंदी's picture

22 Jul 2009 - 7:58 am | हर्षद आनंदी

मस्त अनुभव, वाचताना डोळ्यासमोर घडते आहे असे वाटले काही क्षण.

आपणासारख्या अनुभवी फिरस्त्याची जेव्हा टरकते, तो क्षण विरळाच. इतके डोंगर-दर्‍या पायाखालुन घातल्यावर सुध्दा 'खोबण' मिळत नाही ह्यातच निसर्गाचे सामर्थ्य दिसुन येते. चढतानाचा फोटो बरेच काही सांगुन जातो.

विमुक्त's picture

22 Jul 2009 - 11:56 am | विमुक्त

अनुभवी वगेरे नाही हो....उतरताना थोडा जरी overhang असला तरी solid वाट लागते.. ढाक बहीरी उतरताना जाणवतं बघा, पण तीथे उतरताना धरायला रोप असतो..म्हणुन काय load नसतो...आरामात उतरता येतं...

क्रान्ति's picture

22 Jul 2009 - 8:40 am | क्रान्ति

वाचताना चढण्या-उतरण्याचा थरार अनुभवता आला, इतकं जीवंत आणि प्रभावी लिखाण आहे! त्यात पुन्हा सुंदर फोटो! जबरदस्त अनुभव!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

महेश हतोळकर's picture

22 Jul 2009 - 8:59 am | महेश हतोळकर

छान लिहिलयं. आगदी प्रत्यक्ष वर्णन. स्वानुभवाने सांगतो, धाडस करताना काहिच वाटत नाही पण परत एकदा करून दाखव म्हणल्यावर जमत नाही. फोटोही मस्त आहेत.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

ऋषिकेश's picture

22 Jul 2009 - 9:21 am | ऋषिकेश

अ श क्य मस्त!!
छान जिवंत वर्णन! अजून येऊ द्या

मी चढताना दिसतोय ह्या फोटोत

हे वाचून फोटु परत लक्ष देऊन बघितला आणि मग अग्गोग्ग्गोगो!!!! कुठे चिमटीत फसलाहेत राव!

बाकी शक्यतो विंग्रजी शब्द टाळा. डोंगराच्या या भागांना मस्त मराठी शब्द आहेत. जसे डोगरांची छाती, घसारा, धार, सुळका, खांदा, माची, नाळ वगैरे वगैरे

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

लिखाळ's picture

24 Jul 2009 - 7:44 pm | लिखाळ

कमाल आहे. एकदम मस्त अनुभव आणि छान चित्रे.

बाकी शक्यतो विंग्रजी शब्द टाळा. डोंगराच्या या भागांना मस्त मराठी शब्द आहेत. जसे डोगरांची छाती, घसारा, धार, सुळका, खांदा, माची, नाळ वगैरे वगैरे

ऋषिकेशशी सहमत आहे.

पु ले शु
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)

विसोबा खेचर's picture

22 Jul 2009 - 9:36 am | विसोबा खेचर

लैच भारी..

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2009 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी: आता झालं.... उतरतो आता आरामात.... (भन्नाट आनंद झाला होता.... फार अंगावर आलं होतं नसतं धाडस...)

हुश्श ... मलाच भीती वाटत होती वाचताना ... अगदी शेवट काय होणार आहे हे माहित असूनही!

कुंपणानंच शेत खाल्लं यात काय नवल?

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2009 - 11:56 am | स्वाती दिनेश

वाचताना अंगावर काटा आला,
स्वाती

नंदन's picture

22 Jul 2009 - 1:32 pm | नंदन

छायाचित्रं आणि वर्णन दोन्ही क्लास!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

22 Jul 2009 - 9:58 pm | पिवळा डांबिस

मस्त अनुभव लिहिलाय...
खूप आवडला...

चतुरंग's picture

22 Jul 2009 - 10:20 pm | चतुरंग

जबरी धाडशी गडी आहेस की तू! अनुभवातून आलेले वर्णन आणी फोटू एकदमच झक्कास! अजून येऊदेत रे.

चतुरंग

विशाल कुलकर्णी's picture

23 Jul 2009 - 1:25 pm | विशाल कुलकर्णी

भन्नाट ! हॅट्स ऑफ टु यु मित्रा !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सूहास's picture

23 Jul 2009 - 7:50 pm | सूहास (not verified)

सुहास

मृदुला's picture

24 Jul 2009 - 1:44 am | मृदुला

सचित्र अनुभव आवडला. पण जरा जपून!

सुधीर कांदळकर's picture

24 Jul 2009 - 3:10 pm | सुधीर कांदळकर

वाट लागली. जिवंत, थरारक अनुभवलेखन. अगोरोफोबियावाल्यांना चक्करच येईल.

सुधीर कांदळकर.

मदनबाण's picture

24 Jul 2009 - 7:07 pm | मदनबाण

विमुक्त भाऊ लय् भारी हाय तुमची कामगिरी. :)
बाकी यशदीप: पश्या... नको करत जावू असलं काही... अवघड वाटलं तर नाही चढायचं...
हेच मला पण सांगायचे आहे तुला.
झाडावर भलत्याच उंच फांदीवर चढुन बसल्यावर बर्‍याच वेळा खाली उतरताना अशीच गोची होते !!! :D
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

सुमीत's picture

28 Jul 2009 - 2:20 pm | सुमीत

खूप आवडले, तुम्ही केलेले साहस आणि त्याचे शब्दांकन.
मी खूप वेळा हा ट्रेक केला आहे, बर्‍याचदा एकट्यानेच पण कधी सुळक्या वर चढाई नाही केली, तुमच्या मार्गदर्शनाने करायला आवडेल :)

विमुक्त's picture

28 Jul 2009 - 3:59 pm | विमुक्त

मला पण आवडेल...:-)... आता उतरताना परत माझा इतका गोंधळ नाही होणार..

सुमीत's picture

29 Jul 2009 - 2:47 pm | सुमीत

तुमचा गोंधळ नाही होणार पण मला आधी उतरायला मदत करून मगच तुम्ही उतरा. :)