पाहिजे एकांत थोडा--

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
18 Jul 2009 - 6:55 pm

पाहिजे एकांत थोडा
पाहिजे थोडा अबोला
पाहिजे पहाट थोडी
पाहिजे निशब्द वारा
होउनी मग एक तेव्हा
अंतरी मिसळून जाउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

मिटूनी तू डोळे तुझे ग
काहीशी हरवून जासी
स्पर्शता लाभे दिलासा
तू मला बिलगून जासी
छेडूनी तारा मनाच्या
शब्द तू मी सुर होउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही
त्रुप्ताता देहात ही
त्रुप्ताता विश्वास सार्‍या
त्रुप्ताता श्वासास ही
संपता पहाट थोडी
काहीशी हुरहुर व्हावी
धुसरत्या तारकांना
भेटीचे संकेत देउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ

-पुष्कराज

शृंगारकविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Jul 2009 - 8:46 pm | प्राजु

कविता छान आहे.
तुमचे वृत्त पहिला कडव्यात गा ल गा गा , गा ल गा गा
असे आहे. मात्र नंतर ते थोडे विस्कळीत वाटते आहे.

धुसरत्या तारकांना
भेटीचे संकेत देउ

कल्पना छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मनीषा's picture

18 Jul 2009 - 9:02 pm | मनीषा

होउनी मग एक तेव्हा
अंतरी मिसळून जाउ
विसरूनी सार्‍या जगाला
चांदणे उधळून देउ ... सुंदर !

अनिरुध्द's picture

18 Jul 2009 - 9:28 pm | अनिरुध्द

सुंदर कविता. आवडली.

काय प्रतिक्रिया आहे .. ?
बट्ट्याबोळ ह्यांच्याशी अजिबात सहमत नाही.

पुष्कराज - मला कविता आवडली. फक्त टंकलेखन थोडे सुधारावे लागेल, कारण रसभंग होऊन लिंक तुटते.

बट्ट्याबोळ's picture

19 Jul 2009 - 5:34 pm | बट्ट्याबोळ

नावच बट्ट्याबोळ आहे ना !!!

मदनबाण's picture

19 Jul 2009 - 8:37 am | मदनबाण

सुंदर कविता... :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa