माझे जगावेगळे? छंद

पाऊसवेडी's picture
पाऊसवेडी in जनातलं, मनातलं
15 Jul 2009 - 2:14 pm

साप पकडायला आणि त्यांना हाताळायला शिकायचे आहे असे मी म्हणल्यानंतर घरात महाभारत,रामायण आणि पानिपत सगळे एकत्रच झाले होते आणि मीच त्याला कारणीभूत होते >:) कारण मुळातच मागच्या दहा पिढ्यान मध्ये कोणीही असेले काहीतरी छंद (आईच्या भाषेत नसते उद्योग) केलेले नव्हते. आणि मुळातच अशा काही गोष्टी करून काय सध्या होणार त्यापेक्षा साप जंगलात आणि मी घरी सुखी राहू शकते ना ? ;) असे आईचे म्हणणे होते.

खूप दिवसांपासून माझी साप पकडायला शिकायची इच्छा होतीच 8> आणि आवश्यक तेवढ शिकूनही झाले होते :? नोकरी पण मिळाली होती त्यामुळे मोकळे मिळालेले शनिवार आणि रविवार मी काय करणार हा प्रश्नही माझ्यापुढे होताच म्हणून मग मी तो विचार करून या दिवशी आपण साप पकडायला शिकूया असे मी ठरवले होते पण आत्ता ऐन वेळी आईने मात्र खो घातला होता आणि घरातील इतर लोकांनीछी फुटीर अमादारांसारखी माझी साथ सोडून दिली होती. :''(

फक्त एकटी मीच आईला पटवण्यासाठी उपलब्ध असलेलं सगळी मार्गांचा उपयोग करयला सुरुवात केली अगदी रडण्य्पासून :''( ते अगदी शहाणी मुलगी असल्याचा अभिनय करण्यापर्यंत सगळी अस्त्रे बाहेर काढली पण आमच्या या मंडवालीचा आईवर काहीही परिणाम न झाल्याने आमचे हे स्वप्न काही त्या रविवारी पूर्ण नाही होऊ शकले. ~X( मग पुढचा अख्खा आठवडा साप किती चांगले असतात :? ते लोकांना उगीचच कसे चावत नाहीत ;) (फक्त समोर दिसले कि चावतात हे आईला नाही सांगितले ) आणि त्यांना पकडायला शिकल्यामुळे किती फायदा (कोणाचा?) होईल :) हे आईला समजून सांगण्यात गेला आणि महत्वाचे म्हणजे हे तिला पटले? :? कि नाही ते मला माहिती नाही पण तिने मला हे असले काहीतरी करण्याची परवानगी दिली. >:D<

आणि मग माझी माझ्याच मनाची तयारी करायची सुरुवात झाली कारण शेवटी साप कितीही आवडत असला तरीही आजून तो प्राणी माझ्यासाठी अगदीच नवीन होता. आणि सगळीकडे त्याबद्दल वाईट आणि भितीदायकच ऐकले होते म्हणून थोडी भीती होतीच. :S पण मग अशा वेळी गुगालोबा मदतीला धाऊन आले तसेही साप आवडत असल्यामुळे यापूर्वीही अनेक वर्ष त्यांच्याबद्दल माहिती गोळा करत होतेच पण आत्ता हा शोध नव्याने सुरु झाला.पहिल्यांदा कमीतकमी महाराष्ट्रातल्या सापांची माहिती तर घेऊ म्हणून सुरुवात केली . सापाची सचित्र माहितीचे पुस्तक विकत आणले आणि त्याची पारायणे करायला सुरुवात केली पण त्याचा भलताच परिणाम झाला

कारण हे सर्पभूत इतके मानगुटीवर बसेले कि मला हळू हळू उठता बसता सगळीकडे सापच दिसू लागले. रात्री झोपले तरी स्वप्नातही साप दिसू लागले आणि मग त्याचा त्रास हळूहळू घरी सगळ्यांनाच होऊ लागला कारण रात्री मला स्वप्नात माझ्या आसपासच साप दिसू लागले आणि मग माझी त्याला पकडण्याची धडपड पण कसेच काय ते तर स्वप्नच असायचे ना !
कुठला साप आणि कसचे काय !

आत्ता मात्र आईने हात टेकले आणि मी विषारी सापाची बिलकुल नदी लागणार नाही या अटीवर मला साप पकडायला शिकायला जाण्याची परवानगी देऊन टाकली. ;;)

शेवटी बरीच माहिती तोंडपाठ आणि बरेचेसे साप नुसते वर्णनावरून आणि बघून ओळखण्यापर्यंत मजल गेली आणि मग मलाच असे वाटायला लागेले होते कि मी कसली सापांना घाबरतीये मी तर सहजच त्यांना हाताळीन फक्त हातात मिळण्याची खोटी आहे. अर्थात हे फक्त मलाच वाटत होते कारण बाकी सगळयांना हे एका दिवसातच सगळे बंद होईल असे वाटले होते. पण काही का असेना परवानगी तर मला मिळालीच होती आत्ता फक्त सुट्टीची वाट पाह्यची होती :)

क्रमश :

मुक्तकअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

15 Jul 2009 - 2:27 pm | छोटा डॉन

सुरवात तर झकास आहे, आवडली.
आपल्या जगावेगळ्या छंदाची माहिती आणि कहाणी वाचायला आवडेल, पुढचा भाग लवकर येऊद्यात ...

पुलेशु ...!!!

------
(भुते पकडणारा ) छोटा डॉनबाबा बंगाली
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अ‍ॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2009 - 11:51 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच बोल्तो!!!

बिपिन कार्यकर्ते

बेसनलाडू's picture

16 Jul 2009 - 12:12 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

वेताळ's picture

15 Jul 2009 - 2:39 pm | वेताळ

उत्कृष्टरित्या स्माईलींचा वापर वरील लेखात केला आहे. [( 8>
बरीच वाक्ये त्यामुळे तुमची टंकायची वाचली असावीत.
वेताळ

लिखाळ's picture

15 Jul 2009 - 3:08 pm | लिखाळ

मजेदार. पुढे लिहा :)
साप पकडून घरात बाळगण्याची माझीही एक आठवण आहे :)
-- लिखाळ.

सूहास's picture

15 Jul 2009 - 3:19 pm | सूहास (not verified)

लिहीत रहा ...वाचतो आहे...

पुलेशु ...!!!

<<<कारण हे सर्पभूत इतके मानगुटीवर बसेले कि मला हळू हळू उठता बसता सगळीकडे सापच दिसू लागले>>>
मला हि मध्ये अशीच स्वप्न पडायची .. नुसते सापच साप दिसायचे..मातोश्री नी मला सोमवार ऊपास करावा असे सुचविले..काही झाल नाही ..शेवटी एक दिवस खेड्-शिवापुर रोड वर खरोखरच्या सापाचे (सर्पराज्.नाग) दर्शन झाले ..आणी स्वप्नेही ब॑द झाले...

सुहास

महेश हतोळकर's picture

15 Jul 2009 - 3:31 pm | महेश हतोळकर

चला माझ्या सारखं कोणीतरी आहे तर.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

सहज's picture

15 Jul 2009 - 3:50 pm | सहज

सुरवात आवडली पण पुढचा भाग लवकर येउ दे हा.

सुबक ठेंगणी's picture

17 Jul 2009 - 7:24 pm | सुबक ठेंगणी

असंच म्हणते...
आणि त्या पकडलेल्या सापांचं काय करता? असं पण विचारायचं होतं.

स्वाती दिनेश's picture

15 Jul 2009 - 3:55 pm | स्वाती दिनेश

सुरुवात छान, खरच जगावेगळाच छंद दिसतो आहे, पुढचा भाग लवकर येऊ देत.
स्वाती

विमुक्त's picture

15 Jul 2009 - 4:12 pm | विमुक्त

मग आता पकडता का साप?.... मला पण शिकायचय...:-)...
discovery वर Austin stevens ला साप पकडताना बघायला तर सहिच वाटतं....

श्रावण मोडक's picture

15 Jul 2009 - 4:40 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे.
आधीच्या लेखापेक्षा या लेखात टंकनातही सुधारणा झाल्याचे दिसते आहे. स्वागतार्ह.

नीलकांत's picture

15 Jul 2009 - 6:26 pm | नीलकांत

मला सुध्दा साप पकडायची इच्छा आहे. पुण्यात आल्यावर येथे सर्पोद्यान आहे म्हणून तेथे गेलो होतो. तेथे श्री निलीमकुमार खैरे प्रमुख आहे. त्यांना सुध्दा विचारलं की मला साप पकडायला शिकवाल का? तर ते म्हणाले की सध्या आम्ही शिकवत नाही. आधीच खुप काम आहे. त्यांच्या सहाय्यकाला विचारले तर तो म्हणाला की आधी आम्ही शिबीरं घ्यायचो मात्र आता घेत नाही. उद्यानाचे बरेच काम आहे.

अश्या तर्‍हेने माझा प्रयत्न थांबला :(

इतर कुणी साप पकडणं शिकवतं का ?

- नीलकांत

धमाल मुलगा's picture

15 Jul 2009 - 8:10 pm | धमाल मुलगा

भारीच छंद आहे की :)

मीही एकदा असाच प्रयत्न करुन पाहिला होता. बत्तीसशिराळ्याला नागपंचमीला गेलो होतो मावशीसोबत...तिथे त्यांच्या वाड्यात राहणार्‍या एका टारगटाला बरोब्बर पकडलं आणि दोस्ती करुन घेतली...दुसर्‍या दिवशी सक्काळी सहा-साडेसहापासून त्याच्यासोबतच बोंबल्त हिंडत होतो गावभर...गळ्यात एक मोठी धामण आणि डाव्या हातावर धामणीचं पिल्लू गुंडाळून :D

घरी गेल्यावर मावशीनं लय बडिवलं होतं राव :( हां, पण एका बाटलीतून धामणीचं एक पिल्लू घेऊन आलो होतो त्या शर्‍याच्या मदतीनं.. (कॉलेजमध्ये मास्तरांच्या टेबलावर ठेवायचा पिल्यान होता :D ) पण आमचे काका आमच्यापेक्षा अतरंगी असल्यानं त्यांना लगेच कळलं आणी ते पिल्लू पुण्यात पोचता पोचताच बाटलीबाहेरून रस्त्यात सोडाव लागलं. :(

अवांतरः खरंच पकडता का हो तुम्ही साप? मला एक द्याल? आमच्या हापिसात एकाला छळायचा लै लै मूड आलाय :D

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

स्वाती२'s picture

15 Jul 2009 - 10:50 pm | स्वाती२

लई भारी छंद. लवकर येऊदे पुढील भाग.

प्राजु's picture

15 Jul 2009 - 10:56 pm | प्राजु

सुरूवात आवडली. पु ले शु.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पाऊसवेडी's picture

16 Jul 2009 - 10:52 am | पाऊसवेडी

सगळ्यांना धन्यवाद
मी सध्या फक्त बिनविषारी साप पकडते :) विषारी सापांना हात लावायची परवानगी पण नाही आणि खरतर आजून तेव्हडी हिम्मतही माझ्यात आली नाही हुक असेल तर हुसकून लावता येते फक्त त्यांना ;)

>>>>खरंच पकडता का हो तुम्ही साप? मला एक द्याल? आमच्या हापिसात एकाला छळायचा लै लै मूड आलाय
हे हे हे छळायची हि idea तर मला पण सुचली होती पण तसे केले न तर नंतर खूपच बोलणी खावी लागतात आणि मुख्य म्हणजे त्या माणसाला खरच त्रास होतो ( दोन दिवस ताप उतरला नवता एका मैत्रिणीचा ) :( हे लक्ष्यात आल्यावर हा प्रकार सोडून दिला.अर्थात मला पहिला साप चावला तेव्हा दहा मिनिटे मला काहीच सुचले नव्हते :(

>>>>>साप पकडून घरात बाळगण्याची माझीही एक आठवण आहे
लिहा न मग त्याबद्दल मला वाचयला आवडेल

>>>>चला माझ्या सारखं कोणीतरी आहे तर.
>>>> मला पण शिकायचय....
>>>>>मला सुध्दा साप पकडायची इच्छा आहे.
चला म्हणजे माझा काही जगावेगळा छंद नाही आहे तर

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

विमुक्त's picture

16 Jul 2009 - 7:41 pm | विमुक्त

कुठे शिकलात साप पकडायला?..... मी trinket नावाचा साप पकडलाय...फारच गरीब होता तो..... आणि रेवदंड्याला असताना लहानपणी खुप न्यानेट्या पकडायचो...

हे घ्या मॅडम विषारी नाग पकडायला शिका. घसबसल्या झटपट ऑनलाईन शिकवणी. भाषा - मराठी /हिंदी

नीलकांत तुला देखील शिकायचे होते ना?

How to catch a snake (cobra) - (Part 1)
How to catch a snake (cobra) - (Part 2)

दिपाली पाटिल's picture

16 Jul 2009 - 12:18 pm | दिपाली पाटिल

साप पकडता म्हणजे भलत्या शुर आहात की तुम्ही...माझी मजल फार्-फार तर झुरळा ला हुसकावण्या पुरती च आहे.

दिपाली :)

राघव's picture

16 Jul 2009 - 12:31 pm | राघव

मस्त खुसखुशीत लेखन!

मी पण बिनविषारी साप हाताळलेला.. पण जास्त त्या फंदात पडलेलो नाय.. उगाच कशाला सापाला त्रास माझ्यामुळे ( याला म्हणतात धोरणीपणा राघवा!! स्वत:ची फाटली असे मान्य करणे म्हणजे जरा हेच नाय का?? ;) )

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

अवांतरः
बाकी,

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

या ओळी खूप मस्त! :)

दशानन's picture

16 Jul 2009 - 10:41 pm | दशानन

हाहाहा !

सापाची व माझी दोस्ती अगदी लहानपणापासून.... कधी पुरामध्ये .. कधी शेतामध्ये.. कधी घरा मधे कध मोरी मध्ये.. कुणाला भेटोना भेटो साप मला जरुर भेटायचा ;)

पण सध्या मला पाहीले की सापलाच फिट येते वाटतं.. त्यामुळे साप माझ्या पासून दुरच राहता =))

मस्त लेखन पध्दती.. स्माईलाचा योग्य व परिणामकारक वापर.. आवडला !

ऋषिकेश's picture

17 Jul 2009 - 9:15 am | ऋषिकेश

एकमद मस्त.. येऊ दे पुढला भाग

माणसाला एक छंद असलाच पाहिजे आणि तो असा असा जगावेगळा छंद असेल तर धम्मालच :)

स्मायलीजचा चपखल वापर हे तुमच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य ठरावे (पहिली स्मायली सोडल्यास ;) )

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

Nile's picture

17 Jul 2009 - 9:38 am | Nile

=)) . पहीली स्माईली पाहीली आणि घाबरुन लेख बंदच केला होता मी. आता इतके प्रतिसाद आलेत म्हणल्यावर पुन्हा उघडुन पाहीला. ;)

मजा येते साप पकडायला. >:D< <--हे सापाकरीता बरका उगाच गैरसमज नको. ;) ;)

येउद्या, सचित्र भाग येउद्या पुढचा. चित्रं पहायला आवडतील, सापाची.

पाऊसवेडी's picture

17 Jul 2009 - 10:19 am | पाऊसवेडी

पहिली स्मायालीच्या बाबतीत माझा थोडा गैरसमज झाला होता :S मला वाटले कि ते मोठ्याने ओरडत आहे म्हणून मी ती वापरली :O
पण आत्ता इतर कोणी गैरसमज करून घेऊ नये हि विनंती :)

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

ठकू's picture

17 Jul 2009 - 8:24 pm | ठकू

लेख छान आहे. जगावेगळा छंद आहे खरा तुमचा. 'वेताळा'प्रमाणेच म्हणते. लेखात स्माईलीज चा योग्य वापर केलेला दिसतो. पुढचा भाग लवकर टंका.

#o साप पकडून तो नंतर सोडून देता की नाही? 8>

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे