साप पकडायला आणि त्यांना हाताळायला शिकायचे आहे असे मी म्हणल्यानंतर घरात महाभारत,रामायण आणि पानिपत सगळे एकत्रच झाले होते आणि मीच त्याला कारणीभूत होते >:) कारण मुळातच मागच्या दहा पिढ्यान मध्ये कोणीही असेले काहीतरी छंद (आईच्या भाषेत नसते उद्योग) केलेले नव्हते. आणि मुळातच अशा काही गोष्टी करून काय सध्या होणार त्यापेक्षा साप जंगलात आणि मी घरी सुखी राहू शकते ना ? ;) असे आईचे म्हणणे होते.
खूप दिवसांपासून माझी साप पकडायला शिकायची इच्छा होतीच 8> आणि आवश्यक तेवढ शिकूनही झाले होते :? नोकरी पण मिळाली होती त्यामुळे मोकळे मिळालेले शनिवार आणि रविवार मी काय करणार हा प्रश्नही माझ्यापुढे होताच म्हणून मग मी तो विचार करून या दिवशी आपण साप पकडायला शिकूया असे मी ठरवले होते पण आत्ता ऐन वेळी आईने मात्र खो घातला होता आणि घरातील इतर लोकांनीछी फुटीर अमादारांसारखी माझी साथ सोडून दिली होती. :''(
फक्त एकटी मीच आईला पटवण्यासाठी उपलब्ध असलेलं सगळी मार्गांचा उपयोग करयला सुरुवात केली अगदी रडण्य्पासून :''( ते अगदी शहाणी मुलगी असल्याचा अभिनय करण्यापर्यंत सगळी अस्त्रे बाहेर काढली पण आमच्या या मंडवालीचा आईवर काहीही परिणाम न झाल्याने आमचे हे स्वप्न काही त्या रविवारी पूर्ण नाही होऊ शकले. ~X( मग पुढचा अख्खा आठवडा साप किती चांगले असतात :? ते लोकांना उगीचच कसे चावत नाहीत ;) (फक्त समोर दिसले कि चावतात हे आईला नाही सांगितले ) आणि त्यांना पकडायला शिकल्यामुळे किती फायदा (कोणाचा?) होईल :) हे आईला समजून सांगण्यात गेला आणि महत्वाचे म्हणजे हे तिला पटले? :? कि नाही ते मला माहिती नाही पण तिने मला हे असले काहीतरी करण्याची परवानगी दिली. >:D
आणि मग माझी माझ्याच मनाची तयारी करायची सुरुवात झाली कारण शेवटी साप कितीही आवडत असला तरीही आजून तो प्राणी माझ्यासाठी अगदीच नवीन होता. आणि सगळीकडे त्याबद्दल वाईट आणि भितीदायकच ऐकले होते म्हणून थोडी भीती होतीच. :S पण मग अशा वेळी गुगालोबा मदतीला धाऊन आले तसेही साप आवडत असल्यामुळे यापूर्वीही अनेक वर्ष त्यांच्याबद्दल माहिती गोळा करत होतेच पण आत्ता हा शोध नव्याने सुरु झाला.पहिल्यांदा कमीतकमी महाराष्ट्रातल्या सापांची माहिती तर घेऊ म्हणून सुरुवात केली . सापाची सचित्र माहितीचे पुस्तक विकत आणले आणि त्याची पारायणे करायला सुरुवात केली पण त्याचा भलताच परिणाम झाला
कारण हे सर्पभूत इतके मानगुटीवर बसेले कि मला हळू हळू उठता बसता सगळीकडे सापच दिसू लागले. रात्री झोपले तरी स्वप्नातही साप दिसू लागले आणि मग त्याचा त्रास हळूहळू घरी सगळ्यांनाच होऊ लागला कारण रात्री मला स्वप्नात माझ्या आसपासच साप दिसू लागले आणि मग माझी त्याला पकडण्याची धडपड पण कसेच काय ते तर स्वप्नच असायचे ना !
कुठला साप आणि कसचे काय !
आत्ता मात्र आईने हात टेकले आणि मी विषारी सापाची बिलकुल नदी लागणार नाही या अटीवर मला साप पकडायला शिकायला जाण्याची परवानगी देऊन टाकली. ;;)
शेवटी बरीच माहिती तोंडपाठ आणि बरेचेसे साप नुसते वर्णनावरून आणि बघून ओळखण्यापर्यंत मजल गेली आणि मग मलाच असे वाटायला लागेले होते कि मी कसली सापांना घाबरतीये मी तर सहजच त्यांना हाताळीन फक्त हातात मिळण्याची खोटी आहे. अर्थात हे फक्त मलाच वाटत होते कारण बाकी सगळयांना हे एका दिवसातच सगळे बंद होईल असे वाटले होते. पण काही का असेना परवानगी तर मला मिळालीच होती आत्ता फक्त सुट्टीची वाट पाह्यची होती :)
क्रमश :
वाचने
5729
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतो आहे ...
+१
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
सहमत आहे
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
छान छंद आहे
मजेदार.
मजेदार लेखन..जगावेगळा छ॑द...
झकास....
भारीच
+१
In reply to भारीच by सहज
छान..
मस्त...
वाचतो आहे...
अरे वा !
शाब्बास!
लई भारी
सुरूवात
धन्यवाद
कुठे
In reply to धन्यवाद by पाऊसवेडी
विषारी साप पकडायला शिका
In reply to धन्यवाद by पाऊसवेडी
बापरे...
मस्त!
हाहाहा
एकमद मस्त
. पहीली
In reply to एकमद मस्त by ऋषिकेश
पहिली स्मायालीच्या
लेख छान