दखल

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
9 Jul 2009 - 5:13 pm

येक कविता लिहु पाहता
ऐसे होते लिहिता लिहिता
शब्द अटत जाती हाती येता
उरते केवळ शुष्क गाथा.
न लिहिता ऐशी कविता
मनात होई त्याचा चोथा
काय करु सांग मनमिता
कसा लिहु माझ्या मनगीता
घेऊन माझी झाडाझडती
शब्द बापुडे आडवे जाती
कठोर वज्रापरी करुनी छाती
येताजाता मला भिवविती
लिहिली कोणी ऐशी कविता
सांगेल का कोणी रचयीता
धैर्य आणिले कोठून मांडण्या
हीन आणि हिणकस म्हणण्या
लिहीने मीही म्हणतो तैसे
बोटचेपे अवघड आणिक
पेना वरती टोपण जैसे
वसन भरजरी विकेन शब्द
उगाच वाचक करेल अब्द
होईल कविता माझी ऐशी
नसेल दुसरी इतःपर तैशी
खातरी माझी ही मोजावी
माझ्याच शब्दांस मी दाद द्यावी
कुणा वाटे त्यास आग लावावी
कुणा वाटे त्यास फेकून द्यावी
ये ऐसे ऐकुनी बरे वाटते
निदान इतुकी तरी शब्दांची दखल घ्यावी
............विजुभाऊ सातारवी

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

10 Jul 2009 - 10:14 am | मदनबाण

आम्ही दखल घेतली बरं ;)

(मदनभाऊ कोल्हापुरी);)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jul 2009 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दखल घेतली. लगे रहो ! :)

-दिलीप बिरुटे