बरे नाही !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
9 Jun 2009 - 12:31 pm

हे असे
पुन्हा, डोकावणे बरे नाही.
चालताना
उगाच, वेडावणे बरे नाही.
मनी दाटले
भाव, लपवणे बरे नाही.
मज स्मरते
ती वाट, थबकणे बरे नाही.
आता तुझे
चोरुन, मज वाचणे बरे नाही.
तु चाल पुढे,
मागे वळुन, उसासणे बरे नाही.
हे माझे तुला
आता, विसरणे सुरु झाले.
तुझे असे
मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही.

विशाल कुलकर्णी

कविता

प्रतिक्रिया

प्रशु's picture

9 Jun 2009 - 1:29 pm | प्रशु

हे माझे तुला
आता, विसरणे सुरु झाले.
तुझे असे
मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही.

विशाल मित्रा तोडलस..........

एक पुस्तक येऊदे तुझ्या कवितांच...............

अविनाशकुलकर्णी's picture

9 Jun 2009 - 1:53 pm | अविनाशकुलकर्णी

ट्पोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची,
वर असे रोखुन बघणे, बरे नाहि

भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक
ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाहि

ओष्ट पाकळ्या गुलाबि,खट्याळ हास्य शराबि,
बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाहि

रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा,
लाविली आग,अंगास फुलांनि, हे, बरे नाहि

गुलाबी रेखिव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे
होतो जिव चोळा मोळा, असे करणे बरे नाहि

तुझे अल्लड वय,वाट अशी अवघड
अस भेटण वेळी अवेळी,प्रिये बरे नाहि.

खवळाला तो सागर्, सुटले पिसाट् वारे
तरी लोटतेस् होडि वादळात् ,सखे बरे नाहि

आविनाश

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2009 - 9:52 am | विशाल कुलकर्णी

अविनाशजी मस्त आहे तुमची कविता, त्यावरुन मला आणखी काही बदल सुचताहेत. पाहा कसे वाटते .... (ही कविता आहे, गझल नव्हे तेव्हा चुभुदेघे)

तुझे असे पुन्हा डोकावणे बरे नाही.
चालताना उगा वेडावणे बरे नाही.

दाटले भाव ते लपवणे बरे नाही.
थांबली वाट हे थबकणे बरे नाही.

तुझे चोरुन मज वाचणे बरे नाही.
वाचताना वळुन पाहणे बरे नाही.

मज उमजले हे वागणे बरे नाही
विसरताना तुला स्मरणे बरे नाही.

माझे तुला आता विसरणे सुरु झाले.
तुझे असे मनीं रेंगाळणे बरे नाही.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम: http://www.misalpav.com/node/8120

क्रान्ति's picture

9 Jun 2009 - 10:52 pm | क्रान्ति

हे माझे तुला
आता, विसरणे सुरु झाले.
तुझे असे
मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही.

खासच!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

स्वानन्द's picture

10 Jun 2009 - 3:41 pm | स्वानन्द

शेवटच्या ओळी तर अगदी खासच.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jun 2009 - 7:24 pm | अविनाशकुलकर्णी

विकास मस्त आहे..आवडली..मा़झि हि कविता जुनि आहे..म्हणुन टाकली