आज अचानक सर्व्हर गंडे
कामाच्या वेळी ऑफिस मेळी
असता मन 'मिपा'चकडे
माऊस क्लिकता सहज मिपावरि
एकाएकी 'एरर' पुढे
दचकुनी जागत जीव खुर्चीतच
क्षणभर 'स्वगृह'ते उघडे :)
--लिखाळ.
कवि अनिलांची क्षमा मागून. (मूळ कविता)
आज अचानक सर्व्हर गंडे
कामाच्या वेळी ऑफिस मेळी
असता मन 'मिपा'चकडे
माऊस क्लिकता सहज मिपावरि
एकाएकी 'एरर' पुढे
दचकुनी जागत जीव खुर्चीतच
क्षणभर 'स्वगृह'ते उघडे :)
--लिखाळ.
कवि अनिलांची क्षमा मागून. (मूळ कविता)
प्रतिक्रिया
29 May 2009 - 3:44 pm | श्रावण मोडक
लिखाळा, मस्त. वा. तात्या आणि नीलकांत तुला सरळ सोडणार नाही हे नक्की आता.
29 May 2009 - 4:11 pm | प्रमोद देव
लिखाळभाऊ,मस्तच!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
29 May 2009 - 5:51 pm | क्रान्ति
[लिखाळ जोशींच्या] या कवितेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D>
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
29 May 2009 - 6:15 pm | जयवी
व्वा.....क्या बात है :)
29 May 2009 - 6:21 pm | विकास
कविता एकदम चपखल आणि मस्त आहे!
29 May 2009 - 6:23 pm | चतुरंग
खरं आहे तुझं म्हणणं.
'आज अचानक गाठ पडे' असं झालंय खरं मिपा सुरु पाहून! ;)
(गंडलेला)चतुरंग
29 May 2009 - 10:21 pm | मुक्तसुनीत
मला वाटले होते , कुमारांचे हे गाणे जास्त योग्य आहे मिपाकरता सध्या :
अजुनि रुसून आहे
खुलता कळी खुलेना
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !
किंवा : ती येते आणिक जाते ......;-)
30 May 2009 - 4:37 am | विसोबा खेचर
व्वा भावजी..!
कविता आवडली.. :)
तात्या.
30 May 2009 - 1:29 pm | लिखाळ
प्रतिसादासाठी आभारी आहे. :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)