पण म्हणुन काय झालं.....?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 May 2009 - 11:35 am

चौथा पेग संपला
सिगारेट विझवली...
आणि तारवटलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला
मित्रा, खुप आठवण येते रे तिची, तुला ?
आठवण? मला नाही येत...!

पाचवा भरला....
या वारुणीसारखेच रसरशीत होते
तिचे मद्याने भरलेले नेत्र
प्रीतीने ओथंबलेले, तुला आठवतात?
आठवण? मला नाही येत...!

आता शब्द अडखळु लागले होते..
ओठांशीच थबकू लागले होते..
दोस्ता...तुला आठवतात तिचे केस?
नागिणीसारखे सळसळणारे...
आठवण? मला नाही येत...!

शिमल्याला म्हणाली होती मला
हा बर्फ किती छान आहे ना...
पांढराशुभ्र, निरागस्,स्वच्छ...
त्याच्या मनासारखा, आठवते का रे?
आठवण? मला कशी असणार..?

अरे, ग्लास सुटला वाटतं हातातून..
तो विषण्ण हंसला...
अगदी अशीच निसटली रे...
सुळकन्...गेल्या क्षणासारखी
आठवते तुला?

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

27 May 2009 - 11:42 am | चिरोटा

आवडली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विशाल कुलकर्णी's picture

28 May 2009 - 11:50 am | विशाल कुलकर्णी

धन्स मित्रा.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

उदय सप्रे's picture

28 May 2009 - 12:01 pm | उदय सप्रे

एकदम छान आणि झटका देणारी कविता, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते शेवटचे कडवे सांगून गेले.....
माझ्या मनातली ती
तुझिया मनात राहे
अस्तित्व तिचे आजही
माझ्या.....तनामनात राहे !

अमोल केळकर's picture

28 May 2009 - 12:12 pm | अमोल केळकर

सहमत .
शेवटचे कडवे मस्त

अवांतर : पहिल्या ३ पेगला काय काय झाले :D
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

चिरोटा's picture

28 May 2009 - 12:11 pm | चिरोटा

बदलले का? "ती फोटोत आहे आणि मी बाहेर आहे.."असे काहीसे होते?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विशाल कुलकर्णी's picture

28 May 2009 - 12:19 pm | विशाल कुलकर्णी

हो ते शेवटचे कडवे बदलले..मला हवा तो अर्थ अभिप्रेत होत नव्हता आणि तो फ्लो देखील कमी होत होता शेवटच्या कडव्यात. म्हणुन बदलले आहे. सगळ्यांना धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

विसोबा खेचर's picture

29 May 2009 - 5:18 pm | विसोबा खेचर

विशाल,

क्लास कविता रे!

तात्या.

जयवी's picture

30 May 2009 - 3:13 pm | जयवी

सही......!!

पोलिसकाका_जयहिन्द's picture

30 May 2009 - 6:03 pm | पोलिसकाका_जयहिन्द

कविता आवडली.

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/