चौथा पेग संपला
सिगारेट विझवली...
आणि तारवटलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला
मित्रा, खुप आठवण येते रे तिची, तुला ?
आठवण? मला नाही येत...!
पाचवा भरला....
या वारुणीसारखेच रसरशीत होते
तिचे मद्याने भरलेले नेत्र
प्रीतीने ओथंबलेले, तुला आठवतात?
आठवण? मला नाही येत...!
आता शब्द अडखळु लागले होते..
ओठांशीच थबकू लागले होते..
दोस्ता...तुला आठवतात तिचे केस?
नागिणीसारखे सळसळणारे...
आठवण? मला नाही येत...!
शिमल्याला म्हणाली होती मला
हा बर्फ किती छान आहे ना...
पांढराशुभ्र, निरागस्,स्वच्छ...
त्याच्या मनासारखा, आठवते का रे?
आठवण? मला कशी असणार..?
अरे, ग्लास सुटला वाटतं हातातून..
तो विषण्ण हंसला...
अगदी अशीच निसटली रे...
सुळकन्...गेल्या क्षणासारखी
आठवते तुला?
विशाल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2046
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावूक कविता
धन्स
विशाल, मस्तच !
सहमत
In reply to विशाल, मस्तच ! by उदय सप्रे
शवटचे कडवे
हो ते
In reply to शवटचे कडवे by चिरोटा
विशाल, क्ला
सही......!!
झक्कास....