डिस्क्लेमर : सगळ्यांनीच ह. घ्या.
कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि नाही.
यादीत आपले नाव नसल्यास मिपा आमदारांनी नाराज होऊ नये. (एकूण २० भाग आहेत. प्रत्येकाला कुठे ना कुठे सामावून घेण्यात येईल. ;) )
मंत्रिमंडळातील ६ जागा रिक्त ठेवण्यात येतील.
माननीय स्त्री-सदस्यांसाठी ३३% आरक्षण ठेवण्यात येईल.
बहुमताने खातेवाटप / खांदेपालट करण्यात येईल.
पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम राहिल.
सर्व मिपा-सदस्यांसाठी :
आंतर्जालिय पंचवार्षिक निवडणूकीत मिपा आघाडीला तब्बल दोन-तृतीयांश बहुमत मिळाले असून लवकरच खातेवाटप जाहीर होईल. संसदीय पक्षनेतेपदासाठी सर्वानुमते
श्रीयुत विसोबा खेचर यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. शपथविधी लवकरच शिवाजी पार्कवर होईल. शपथविधीसाठी कॅबिनेट मंत्र्यांची प्राथमिक यादी जाहीर करीत आहोत.
श्री. विसोबा खेचर : मुख्यमंत्री .
अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुबंदी.
श्री. नीलकांत : उपमुख्यमंत्री.
उद्योग, सहकार, माहिती व तंत्रज्ञान.
श्री. क्लिंटन : पणन, अर्थ व नियोजन.
३_१४ विक्षिप्त अदिती : गृहमंत्री, हुच्च व तंत्रशिक्षण.
श्री विनायक प्रभू : युवा कल्याण, कुटूंब-कल्याण,रोज गार हमी योजना. ;)
श्री ब्रिटिश : आदिवासी विकास, उत्पादनशुल्क, खारजमिन व बंदरे विकास.
श्री आनंद घारे : अंधश्रद्धा निर्मूलन.
सौ. स्वाती दिनेश : अन्न व नागरीपुरवठा.
सौ जागु : महिला व बालकल्याण.
श्री. दिलीप बिरुटे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण.
श्री. श्रीकृष्ण सामंत : अल्पसंख्याक मंत्री.
डॉ. श्री. प्रसाद दाढे : आरोग्यशिक्षण व अवजड वाहन परिवहन.
श्री. भडकमकर मास्तर : सार्वजनिक आरोग्य.
श्री. पाषाणभेद : कृषी, जलसंधारण.
सर्व सन्माननीय सदस्यांनी इतर मंत्रीपदासाठी नावे सुचवावीत.
प्रतिक्रिया
14 May 2009 - 6:01 pm | पर्नल नेने मराठे
आवलीया : वनखाते (फोरेस्ट डीपार्ट्मेन्त) :-?
चुचु
16 May 2009 - 12:20 am | विकि
मंत्रीमंडळाचा .नेहमीप्रमाणे कोकणावर अन्याय नको हा?
14 May 2009 - 6:04 pm | नितिन थत्ते
धनंजय?
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 May 2009 - 6:04 pm | पर्नल नेने मराठे
कुन्दन : एक्स्तर्नल अफेअर्स (फोरेन मिनिस्त्रि) ;)
चुचु
14 May 2009 - 6:10 pm | कुंदन
आम्ही एक्स्तर्नल वा इंतर्नल अशी कोणतीही अफेअर्स निस्तरु इच्छित नाही...
बिपिनदांसाठी आम्ही "एक्स्तर्नल अफेअर्स" मंत्री पद मोकळे सोडतोय...
14 May 2009 - 6:08 pm | प्रमोद देव
श्री. विसोबा खेचर : मुख्यमंत्री .
अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुबंदी.
काय तरीच काय?
दारुमुक्ती म्हणा. म्हणजे मुक्तपणे दारू मिळेल अशा अर्थी. दारूपासून मुक्ती नव्हे. ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
14 May 2009 - 6:12 pm | अनंता
हीच तर खरी गोम आहे. ;)
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
14 May 2009 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
घ्या ! म्हणजे डोंगर पोखरुन निघाली गोम.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 May 2009 - 6:19 pm | अनंता
श्री.परिकथेतील राजकुमार : गृहराज्य सायबर-गुन्हेगारी (प्रतिबंधक)
श्री. || राजे || : दळणवळण, अर्थ राज्य. कामगार कल्याण.
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
14 May 2009 - 6:22 pm | नितिन थत्ते
परिकथेतील राजकुमारः इतिहास संशोधन (अतिरिक्त भार)(खरडवह्या वाचण्याचा जंगी अनुभव)
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 May 2009 - 6:23 pm | कुंदन
पर्नल नेने मराठे : राज्य मंत्री : शालेय व उच्च तांत्रिक शिक्षण.
14 May 2009 - 6:33 pm | नितिन थत्ते
>>पर्नल नेने मराठे : राज्य मंत्री : शालेय व उच्च तांत्रिक शिक्षण.
त्याशिवाय मराठी भाषा विकास (ह. घ्यालच)
खराटा
(रंग माझा वेगळा)
14 May 2009 - 6:16 pm | कुंदन
श्री विनायक प्रभू : कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार)
15 May 2009 - 11:33 am | विजुभाऊ
श्री विनायक प्रभू : कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार)
हे जर्रा असे थोडेसे सुधारुन घ्या
श्री विनायक प्रभू : अतिरिक्त कुटुंब कल्याण ( अतिरिक्त भार)
14 May 2009 - 6:18 pm | सायली पानसे
माहिति व जनसंपर्क खाते ... श्री. प. रा
14 May 2009 - 6:20 pm | सायली पानसे
दुर संचार खाते-- श्री. कुंदन
14 May 2009 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार
अहो पैसा खाता येईल असे एक तरी खाते द्या की =))
दुरसंचार खात्यासाठी आम्ही मिंटीतैंचे नाव सुचवत आहोत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
15 May 2009 - 12:14 pm | मिंटी
दुरसंचार खात्यासाठी आम्ही मिंटीतैंचे नाव सुचवत आहोत.
:? :? :? :? :? :?
15 May 2009 - 12:41 pm | परिकथेतील राजकुमार
कसला विचार करतीयेस मिंटैय्या ?
(चाल :- कसला विचार करतोयस रामय्या? )
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 May 2009 - 6:24 pm | सायली पानसे
साक्षरता आणि प्राथमिक शि़क्षण.
14 May 2009 - 10:27 pm | अनंता
प्रौढ-साक्षरता आणि प्राथमिक शि़क्षण.
छोटा डॉन- वस्रोध्योग.
पिवळा डांबिस- फलोत्पादन, कृषी.
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
15 May 2009 - 12:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिरिक्त भार: अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्रालय!
14 May 2009 - 6:43 pm | अनंता
श्री नाटक्या.
इतर नावे सुचवा / बदलही करु शकता.
राज्यमंत्री पदासाठीही नावे सुचवा.
अवांतर : माझी खव, व्यनि बंद आहे.
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
14 May 2009 - 6:47 pm | पर्नल नेने मराठे
राज्यमंत्री पदासाठीही नावे सुचवा.
:-?
अवलीया शोभेल ;)
वनखाते दुसर्याला हान्ड-ओवर करा
चुचु
14 May 2009 - 7:13 pm | सँडी
चुचु - खाद्य राज्यमंत्री.
-संदीप.
काय'द्याच बोला.
14 May 2009 - 7:16 pm | पर्नल नेने मराठे
:))
चुचु
14 May 2009 - 9:28 pm | नाटक्या
मी आणि उत्पादनशुल्क : राज्यमंत्री? नशीब माझं दारुबंदी खातं दिलं नाही ते. नाही तर नाक्यावरच्या दादाला जेपी करण्यासारखं होतं ...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
14 May 2009 - 6:55 pm | मराठमोळा
ही निवडणुक कधी झाली बॉ? :O असो..
अनंता: माहिती व प्रसारण मंत्री . (सोबत पार्ट टाईम समीक्षक) ;)
देवकाका: पर्यटन मंत्री
टारझणः ग्रामविकास मंत्री
अवलिया: प्रमुख सल्लागार
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
14 May 2009 - 6:50 pm | विसोबा खेचर
श्री विनायक प्रभू : युवक कल्याण, रोज गार हमी योजना.
श्री ब्रिटिश : आदिवासी विकास, उत्पादनशुल्क, खारजमिन व बंदरे विकास.
सौ जागु : महिला व बालकल्याण.
हे सर्वात जास्त आवडलं! :)
चालू द्या...
तात्या अभ्यंकर.
मुख्यमंत्री,
अर्थ, सांस्कृतिक विभाग, महसूल, दारुमुक्ति! :)
14 May 2009 - 8:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग प.रा. युवती कल्याण आणि पाठलाग मंत्रालय (हेरखातं) का? ;-)
=)) =)) गृहमंत्री, तंत्रशिक्षण हे वाचून लोटपोट!
हुच्च शिक्षण कसं ऐकल्यासारखं वाटतं!
आमचे राजकीय कोलॅबोरेटर, श्री. डानराव, दिसत नाहीत कुठे मंत्रिमंडळात??
14 May 2009 - 8:05 pm | बिपिन कार्यकर्ते
बाकी, प्रभूमास्तर रोज एक धमाका टाकून सगळ्यांना 'रोज गार' करायची 'हमी' आहेच.
बिपिन कार्यकर्ते
14 May 2009 - 11:01 pm | टारझन
घ्या ............ आम्ही वेगळंच "रोज गार" करण्याबद्दल समजत होतो :)
14 May 2009 - 11:04 pm | ब्रिटिश टिंग्या
गार होण्यात काय अर्थ आहे?
लवकरच हर्क्युलस होईल तुमचा!
14 May 2009 - 11:09 pm | टारझन
टिंगोजी राव .... मी "गार करण्या" बद्दल बोलतो आहे !!! दोन्ही प्रकारात जिमीन-आस्मानाचा फरक आहे !!
कळावे !!
15 May 2009 - 6:54 am | विनायक प्रभू
कुनी जमिनिवर कुनी आसमानात
चालायचेच.
बदल हवा असतो की?
15 May 2009 - 11:22 pm | टारझन
एक साधी लाईन टाकलेली ... च्यायला .. ती कस काय डिलीट झाली ? एक विणंती आहे .. सरळ सरळ अर्थाची एक साधी लाईन का बरं डीलीट व्हावी ? कळतं तर ठिक .. नाय तर जाब देण्यास कोणी बांधील नाही याची जाण आहे !!
बाकी मास्तर ... गार होणे .. आणि गार करणे ह्यात हार-जित मधे जेवढा फरक आहे तेवढाच फरक आहे हो :)
सांगा त्या टिंग्याला
14 May 2009 - 8:25 pm | परिकथेतील राजकुमार
वाह !
एकदम प्लॅटॉनीक कल्याण करीन मी ;)
आणी हो पाठलाग सुद्धा भयानक करीन.
या या वेड्याच्या कल्याण खात्यात आपले मनापासुन स्वागत ..
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 May 2009 - 8:13 pm | श्रावण मोडक
अगदी भारताच्या भावी मंत्रीमंडळाचेच चित्र दिसतय इथं. पक्ष कुठलाही असो, किंवा कोणतीही आघाडी!
जय हो!!
जनतेचं 'कल्याण' हे मात्र नक्की!!! ;)
14 May 2009 - 8:22 pm | गणा मास्तर
सामंत काका - साहित्य मंत्री
उदय सप्रे - साहित्य राज्यमंत्री
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
14 May 2009 - 8:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहज यांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे फक्त गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे त्यांचं खातं जाहीर करू नये.
14 May 2009 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>सहज यांचाही मंत्रीमंडळात समावेश आहे फक्त गोपनीयता महत्त्वाची असल्यामुळे त्यांचं खातं जाहीर करू नये.
सुप्पर !!! :)
14 May 2009 - 8:52 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो आम्हाला माहित होतं की ते मंत्रीमंडळात आहेत, पण गोपनियतेच्या कारणांमुळे तेवढं पण जाहिर करायचं नव्हतं.... तुम्ही फोडलंत की भांडं...
बिपिन कार्यकर्ते
14 May 2009 - 9:30 pm | श्रावण मोडक
त्यांचं प्रोफाईल 'बिनखात्याचा मंत्री'. सर्वात महत्त्वाचे 'खाते'. सगळी खाती व्यापून उरणारे.
14 May 2009 - 10:26 pm | ऋषिकेश
विरोधी पक्षनेता कोण?
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
14 May 2009 - 10:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ड्युप्लिकेट आय.डीं धारकांचं काय? त्यांना कोणतं खातं?? ;-)
14 May 2009 - 10:37 pm | अनंता
त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळे आहेतच.
लावून टाकू वर्णी ;)
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
14 May 2009 - 11:09 pm | कुंदन
>>विरोधी पक्षनेता ?
कॉ. विकी.
जरी ते विरोधी पक्षनेता असले तरी आम्हाला त्यांच्या बद्दल आदर आहे.
14 May 2009 - 11:13 pm | ब्रिटिश टिंग्या
अजानुकर्णसुद्धा लायक होता!
पण मुख्यमंत्र्यांनी त्याचा पत्ताच साफ केला! ;)
15 May 2009 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार
आम्ही गोड तोंडाने येथे 'बेला' यांचे नाव विरोधी पक्षनेता म्हणुन सुचवु इच्छीतो ;)
हलकट परा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 May 2009 - 11:15 pm | टारझन
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
मेल्या मुडद्या ... तुझ्या बोटाला काही हाड ?
15 May 2009 - 4:34 pm | विकि
कुंदन.पण आम्हाला खुर्चीचा मोह नाही.
15 May 2009 - 12:40 am | श्रावण मोडक
एकच. त्यांचं आख्खं प्रोफाईल झालेलं आहे. त्या नावाची एक गायिका आहे. ओळखा पाहू कोण ते?
स्वगत: हे तुझं क्षेत्र नाही ना? मग, शांत बस!!!
14 May 2009 - 10:55 pm | ब्रिटिश टिंग्या
9 आठवडे 5 दिवसात बराच आंतरजालीय अभ्यास झालेला दिसतोय!
लगे रहो! धागा लै भारी!
14 May 2009 - 11:43 pm | जागु
महिला व बालकल्याण.
अरे वा वा आवडीचा हुद्दा दिलात. आता बघा महीला आणि बालकांचे कल्याण करते. नविन योजना राबवायची तयारी केली पाहिजे.
15 May 2009 - 6:24 am | अवलिया
वा ! मस्त धागा !! :)
--अवलिया
15 May 2009 - 12:46 pm | मिंटी
१ प्रश्न :
मंत्रिमंडळात माननीय धमाल पंत आणि माननीय आनंदयात्री कुठे दिसत नाहीत ते ????
15 May 2009 - 12:52 pm | अनंता
बघूया कुणाला किती आमदारांचा पाठींबा आहे ते??
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
15 May 2009 - 12:53 pm | दिपक
मंत्रिमंडळात माननीय धमाल पंत आणि माननीय आनंदयात्री कुठे दिसत नाहीत ते ????
हवे तेवढे पोहचवले नसतिल कदाचित. ;)
15 May 2009 - 1:20 pm | विजुभाऊ
धमालपंत : बालकामगार कल्याण खाते आणि बालविवाह मंत्रालय
आनन्दयात्री : भायल्या भानगडीचो मन्त्री ( मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स)
15 May 2009 - 2:03 pm | मिंटी
धमालपंत : बालकामगार कल्याण खाते आणि बालविवाह मंत्रालय
=)) =)) =)) =))
15 May 2009 - 11:00 pm | जागल्या
आम्ही सोमनाथ चटर्जी
जागल्या
16 May 2009 - 12:18 am | विकि
ही पदाची लालसा निर्माण झाली आहे .एक तरी पद द्या की?
16 May 2009 - 12:53 am | कुंदन
विरोधी पक्षनेतेपद दिले तर नाही म्हणालात.
सरकार मध्ये सामील होणार की बाहेरुन पाठिंबा देणार ते नक्की ठरवा....
-- (किंग मेकर) कुंदन
18 May 2009 - 8:29 pm | क्रान्ति
शपथविधी कधी आणि कुठे? शपथ कोण देणार?
@) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
18 May 2009 - 8:34 pm | धमाल मुलगा
विजुभाऊ देतील शपथ...... काव्यखेचरं मारुन :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
18 May 2009 - 8:49 pm | बाकरवडी
बाकरवडी :- स्वागताध्यक्ष.
हल्ली कोणीच नवीन सदस्य येत नसल्याने काही काम नसणार !
:B :B :B बाकरवडी :B :B :B