पाऊस .....कळलांय का?

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
3 May 2009 - 11:50 am

पाऊस कळलाय का?

मुसळधार पावसामधे भिजून
तुमचा शाळेचा गणवेष मळलांय का?
बालपणीच्या सखीच्या केसांत
मोठेपणी गजरा माळलांय का?

निसरड्या वाटेवर घसरून कधी
पायाचा अंगठा भळभळलांय का?
तुमच्या वेदना सोसवेनात म्हणून
तिचा जीव तळमळलांय का?

थरथरणार्‍या ओठातील तिची ती 'हाय्'
डोळ्यातून अश्रू होऊन गळलाय का?
भडभडून बोलणे झाले तरी ,त्यातून
'प्रेम' हा शब्द अचूक गाळलाय का?

तिचा बालपणीचा निरागस भाव
गाली लज्जा होऊन ओघळलाय का?
भातुकलीतली नवरी खरी व्हावी
इतके तुम्ही पाघळलाय का?

तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस
तिच्याचकडे करून वळलाय का?
' बालपण ते तारुण्य ' हा काळ
तिची वाट पहाण्यात वाळलाय का?

ऐन पावसात तिचं ते त्याला लपेटणं
पाहून तुम्ही कधी जळलाय का?
मुसळधार पावसाने, चिंब दोन जीव.....
एकास तृप्त दुसर्‍यास जाळलाय का?

आठवणींच्या पदरांचा खळकळता झरा
मनाचे बांध फोडून कधी ढळलाय का?
संपल्यावर तुमचं एकट्याचं घुसमटणं
आता तरी तिचा थंडपणा वितळलाय का?

प्रत्येक पाऊस एक नवी आठवण देतो
एखाद्या तरी आठवणीने कधी चळलाय का?
आपल्याच अंतरात बरसतो मग अविरत आनंद
एकांतात बसून कधी आतला पाऊस चाळलाय का?

'पुन्हा म्हणून प्रेम करणार नाही 'हा शब्द
स्वतःच्याच मनाशी तरी पाळलाम का?
पाऊस महणजे प्रेम नसून प्रेम म्हणजे पाऊस
तुडुंब नाहल्यावर तरी अर्थ हा कळलाय का?

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

अनंता's picture

3 May 2009 - 1:44 pm | अनंता

असेच लिहीत रहा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)

क्रान्ति's picture

3 May 2009 - 8:11 pm | क्रान्ति

बालपणीच्या सखीच्या केसांत
मोठेपणी गजरा माळलांय का?
ही कल्पना खूप छान! :)

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

प्राजु's picture

3 May 2009 - 8:14 pm | प्राजु

खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

4 May 2009 - 12:52 am | बेसनलाडू

बालपणीच्या सखीच्या केसांत
मोठेपणी गजरा माळलांय का?

या ओळींवरून
माशूक का बुढापा लज्जत दिला रहा है |
अंगूर का मजा अब किश्मिश में आ रहा है |

या ओळींची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू

उदय सप्रे's picture

4 May 2009 - 9:10 am | उदय सप्रे

या ओळींना समर्पक नाही.कारण या दोन ओळींचा अर्थ हा की , बालपणी आवडलेली सखी , मोठी होईतोपर्यंत तुम्ही प्रेम धीर धरुन तसंच कायम राखून मग ते ती मोठी झाल्यावर व्यक्त केलंय का ?

अवांतर : मिपा वरील प्रतिक्रिया एकदम धमाल असतात ! मस्तच शेर ! आभारी !

बेसनलाडू's picture

4 May 2009 - 11:00 pm | बेसनलाडू

तुमच्या ओळींना निश्चितच समर्पक नाही. मला सहज पटकन आठवण झाली, आणि माझा आवडता शेर आहे म्हणून टंकला.
(स्मरणशील)बेसनलाडू

जृंभणश्वान's picture

4 May 2009 - 3:55 am | जृंभणश्वान

भारी आहे कविता, आवडली मला.

शितल's picture

4 May 2009 - 6:44 am | शितल

कविता आवडली. :)

दवबिन्दु's picture

4 May 2009 - 9:05 am | दवबिन्दु

बालपणीच्या सखीच्या केसांत
मोठेपणी गजरा माळलांय का?

आजकाल मुली गजरे घालन अडानीपनाच समजतात. केसात कोनीच फुल घालत नाहीत.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

लवंगी's picture

4 May 2009 - 9:17 am | लवंगी

खूप आवडली

वा वा खूप सुंदर

खास करुन पुढील २ कडवी...

निसरड्या वाटेवर घसरून कधी
पायाचा अंगठा भळभळलांय का?
तुमच्या वेदना सोसवेनात म्हणून
तिचा जीव तळमळलांय का?

तिचा बालपणीचा निरागस भाव
गाली लज्जा होऊन ओघळलाय का?
भातुकलीतली नवरी खरी व्हावी
इतके तुम्ही पाघळलाय का?

कविवर्य उदय मित्रा, इतिहासाबरोबरच प्रेमाची तरलता पण तुझ्या हृदयातून झलकते हे पाहून आनंद झाला....
अशा सुंदर कविता वाचायला मिळाल्या की मस्त वाटते... :)

निशिगंध's picture

4 May 2009 - 5:07 pm | निशिगंध

आपली कविता आवडली..

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

जयवी's picture

11 May 2009 - 4:51 pm | जयवी

अहा.......खूपच सुरेख !! खूप खूप आवडेश :)