पाऊस कळलाय का?
मुसळधार पावसामधे भिजून
तुमचा शाळेचा गणवेष मळलांय का?
बालपणीच्या सखीच्या केसांत
मोठेपणी गजरा माळलांय का?
निसरड्या वाटेवर घसरून कधी
पायाचा अंगठा भळभळलांय का?
तुमच्या वेदना सोसवेनात म्हणून
तिचा जीव तळमळलांय का?
थरथरणार्या ओठातील तिची ती 'हाय्'
डोळ्यातून अश्रू होऊन गळलाय का?
भडभडून बोलणे झाले तरी ,त्यातून
'प्रेम' हा शब्द अचूक गाळलाय का?
तिचा बालपणीचा निरागस भाव
गाली लज्जा होऊन ओघळलाय का?
भातुकलीतली नवरी खरी व्हावी
इतके तुम्ही पाघळलाय का?
तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस
तिच्याचकडे करून वळलाय का?
' बालपण ते तारुण्य ' हा काळ
तिची वाट पहाण्यात वाळलाय का?
ऐन पावसात तिचं ते त्याला लपेटणं
पाहून तुम्ही कधी जळलाय का?
मुसळधार पावसाने, चिंब दोन जीव.....
एकास तृप्त दुसर्यास जाळलाय का?
आठवणींच्या पदरांचा खळकळता झरा
मनाचे बांध फोडून कधी ढळलाय का?
संपल्यावर तुमचं एकट्याचं घुसमटणं
आता तरी तिचा थंडपणा वितळलाय का?
प्रत्येक पाऊस एक नवी आठवण देतो
एखाद्या तरी आठवणीने कधी चळलाय का?
आपल्याच अंतरात बरसतो मग अविरत आनंद
एकांतात बसून कधी आतला पाऊस चाळलाय का?
'पुन्हा म्हणून प्रेम करणार नाही 'हा शब्द
स्वतःच्याच मनाशी तरी पाळलाम का?
पाऊस महणजे प्रेम नसून प्रेम म्हणजे पाऊस
तुडुंब नाहल्यावर तरी अर्थ हा कळलाय का?
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2861
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरी वाटली कविता.
कल्पना छान.
सगळी कविताच छान आहे.
कविता आवडली
शेर मस्तच आहे.....पण.....
In reply to कविता आवडली by बेसनलाडू
समर्पक नाहीच
In reply to शेर मस्तच आहे.....पण..... by उदय सप्रे
भारी आहे
कविता
एक निरक्शण
छान कविता
मनाला स्पर्शणारी कविता
कविता आवडली..
अहा.......खूपच