सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग......आमच्या नाटकातला एक संवाद

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
6 Feb 2008 - 2:37 am

सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग......

आम्ही कॊलेजला एका वसतिग्रुहात शिकलो तेव्हा आमचा एक कविमनाचा मित्र होता...
लायक माणसांना कौतुक लाभायच्या ऐवजी नेहमीच कोणा भलत्यालाच (त्याच्या अंगभूत गुणांच्याऐवजी काही इतर कारणांमुळे..उदा. सत्ता , पैसा, उच्च वर्तुळात संपर्क इ.) कौतुक लाभते असे जेव्हा दिसत असे, त्यावेळी आमच्या या मित्रास भयंकर वैफ़ल्य येत असे...हे वैफ़ल्य कधी वाजवी आणि कधी अत्यंत अयोग्य असे, पण त्याच्याशी फ़ार वेळ वाद घालणे शक्य होत नसे.... " श्रीमंत माणसे लायकी नसताना पैशांच्या जोरावर काहीही मिळवू शकतात" असे तो म्हणे, आणि चिडचिड करे....
.........आम्ही गेल्या वर्षी एक दीर्घांक लिहिला आणि त्याचे पुण्यात काही प्रयोगही झाले...नाटकाचा मूळ विषय वेगळा असला तरी त्यातला एक संवाद माझ्या आणि माझ्या मित्राच्या त्यावेळच्या वाक्युद्धावर (?) बेतलेला होता...

धीरज, चिन्मय हे दोघे २२ वर्षे वयाचे, शाळेपासूनचे मित्र,....धीरज अभ्यासात हुशार, श्रीमंत घरातला, वडील मोठे पोलीस ऒफ़िसर,इन्जिनियर झाल्यावर परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणारा
चिन्मय : सामान्य आर्थिक परिस्थितीतला,पदवीनंतर मुंबईत जाऊन स्ट्रगल करणारा अभिनेता, आणि अर्थात अपेक्षाभंगामुळे वैफ़ल्यग्रस्त....
मोन्या : या दोघांचा एक कोमन मित्र, श्रीमंत..... वडिलांचा व्यवसाय सांभाळत हौशी नाटके, स्पर्धा वगैरे करणारा...त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीहून दोघे धीरज च्या घरी परत आले आहेत...

Untitled-3" width="५९०" height="१०२४" alt="संवाद फोटो" />

नाट्यप्रकटनविचार

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

6 Feb 2008 - 9:49 pm | देवदत्त

छान आहे.

अवांतरः तुमच्या लेखाला उद्देशून काही नाही. पण नावावरून आठवले.
सर्जनशीलता आणि सृजनशीलता ह्यांचे अर्थ कोणी सांगेल का?

चतुरंग's picture

7 Feb 2008 - 3:57 am | चतुरंग

सर्जनशीलता आणि सृजनशीलता ह्या दोन्हीचाही अर्थ एकच आहे.
संस्कृत जाणकार नेमका संधी कोणत्या दोन शब्दांचा होतो वैगेरे सांगू शकतील.

चतुरंग

धनंजय's picture

7 Feb 2008 - 3:18 am | धनंजय

पण अशा प्रकारे सडेतोडपणे मित्राच्या स्वयंपूर्णतेबद्दलच्या आत्मविश्वासाचा पाणउतारा करता येईल, आणि मैत्री धोक्यात येणार नाही, असे हृद्य संबंध चिन्मय आणि धीरज यांच्यात हवेत.

या नाटकाच्या मुख्य संघर्षाच्या कथानकात हा संवाद होता का? असल्यास या वैचारिक संघर्षाचे निरसन कसे झाले?

भडकमकर मास्तर's picture

7 Feb 2008 - 10:02 am | भडकमकर मास्तर

या नाटकाच्या कथानकाचा आशय एका वाक्यात... ( इंग्रजीतला प्रिमाइस?).... " श्रीमन्तीचा माज गुन्हा शाबित होण्यापासून वाचवतो..."
............शक्य तेवढ्या थोडक्यात कथा सांगतो...

मोन्याच्या पार्टीमध्ये भरपूर नशा करून धीरज्च्या स्वत:च्या कारने दोघे धीरजच्या घरी परत आलेले आहेत.( धीरजच्या घरी सद्ध्या कोणी नसते, कुटुंबीय पोलीस ओफिसर वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने दूर गावी, हा शिक्षणासाठी पुण्यात)...धीरज हुशार, सज्जन आहे, छंद म्हणून प्राणिमित्र संघटनेत काम करतो...त्याच्या यूएस ला जाण्याच्या विसा चे काम काही कारणाने अडलेले आहे.........चिन्मय मुंबईत अभिनेता होण्यासाठी झगडत आहे आणि त्याचे फ़ारसे बरे चालले नाही.( उधारी, मोठी फ़िल्म मिळाली म्हणून उधारीवर पार्ट्या देणे वगरे प्रकार तो करतो)..त्याला असे वाटत आहे की त्याच्या गरीबीमुळे सानिया नावाच्या त्याच्या मैत्रिणीने त्याच्या प्रेमाला नकार दिला आणि आता ती मोन्या बरोबर जास्तच प्रेमाने वागत आहे ( कारण अर्थात तो श्रीमंत आणि क्रिएटिव्ह आहे)......त्यामुळे त्याचा मोन्याबद्दल द्वेष मधून मधून उफ़ाळून येतो.....

यांच्या गप्पांमध्ये शाळेच्या आठवणी निघतात, घराजवळच्या चौकात कोपर्यावर बासरीवाला म्हातारा भिकारी बसायचा आणि त्याची गाणी हे रोज ऐकत असत वगैरे...गप्पांचा विषय श्रीमंत माणसे / सेलेब्रिटीजच्या गुन्ह्यांवर येतो, बेकायदेशीर शिकार प्रकरणावर आणि सलमानला झालेल्या शिक्षेवर तावातावाने चर्चा होते, धीरजमधला प्राणिमित्र पोटतिडीकीने बोलतो, "श्रीमंतीचा माज असणार्या गुन्हेगारांना भरपूर शिक्षा व्हायला हवी".. असे पुष्कळ आदर्शवादी बोलतो....नंतर मोन्याचा धीरजला फोन येतो , की त्याला गेले महिनाभर घाण शिव्या देणारे निनावी फोन येताहेत, वेगवेगळ्या बूथ वरून, आणि आता हद्द झाली,त्याला धीरजच्या मदतीने पोलीसांना भेटायचे आहे ..... धीरजला संशय येतो आणि तो चिन्मयला खोदून विचारतो तेव्हा चिन्मय मान्य करतो की मीच ते फोन करत होतो, ...एव्हाना दोघांची पुष्कळ उतरलेली आहे, आणि त्यांच्या लक्षात येते की येतानाच त्यांची कार कोपर्यावरच्या फ़ूट्पाथवर चढून म्हातार्या भिकार्याला उडवून आलेली आहे, आणि तो कदाचित त्यात जागेवरच गेला असावा... इथे धीरज घाबरून जातो पण पुढच्याच क्षणी म्हणतो, " या प्रकरणात अडकलो तर माझ्या व्हिसाचं काय?" ....धीरज सावरतो आणि शांतपणे त्याच्या ( वडिलांचे मित्र पोलीस ओफ़िसर , ) अंकलना फोन लावायला लागतो," काहीही करून मला या प्रकरणातून सोडवा वगैरे"...पार्श्वभूमीला धीरजने थोड्याच वेळापूर्वी बोललेले शब्द ऐकू येताहेत...," स्वत:च्या चुका मान्य करायला मनाची मोठी शक्ती लागते, त्यासाठी लागतात व्हॆल्यूज"......चिन्मय अवाक होउन धीरज मधला हा बदल पाहतोय, धीरज फोनवर अंकलना यातून सोडवायला सांगतोय....
पडदा

भडकमकर मास्तर's picture

7 Feb 2008 - 10:12 am | भडकमकर मास्तर

होय..तसे मैत्रीचे संबंध दोघांच्यात आहेत...मुख्य संघर्षाच्या कथानकात हा संवाद नसला तरी धीरजची आणि मोन्याची श्रीमंती, आणि चिन्मयचा मोन्याबद्दलचा थोडासा पूर्वग्रह इथे प्रथम कळतो...

भडकमकर मास्तर's picture

7 Feb 2008 - 10:06 am | भडकमकर मास्तर

आणि हो, नाटकाचे नाव लिहायचे राहिले....: ज्याचं त्याचं अभयारण्य

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Feb 2008 - 9:19 pm | llपुण्याचे पेशवेll

की हा पैसेवालाच मूल्य सोडून वागत आहे. कारण चिन्मय जरी परीस्थितीने गांजलेला वैफल्यग्रस्त असला तरी त्याचे गरळ तो सरळ सरळ ओकताना दिसतो. उगाच सभ्यतेचा बुरखा पांघरून असभ्य वर्तन तरी करत नाही. आणि घडल्या चुकीने एकदम बावरून तरी गेलेला नाही.
पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर's picture

8 Feb 2008 - 9:53 am | भडकमकर मास्तर

देवदत्त, चतुरंग आणि धनंजय,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
मात्र फक्त हा पैसेवालाच मूल्य सोडून वागत आहे, असे सांगायचे नाही....... तर स्वत:वरती वेळ आल्यावर माणूस सर्व मूल्ये सोयीस्करपणे विसरतो ,( आणि आपण बुडणार असे दिसताच आदर्शवादी बड्बड करणारा माणूस मूल्ये पायाखाली घेऊन पाण्यावर राहायचा प्रयत्न करतो...).असे सांगायचा प्रयत्न आहे.......( चिन्मयचा गुन्हा त्यातल्या त्यात फालतु आहे, पण आहे...जो तो स्वतःच्या अर्थिक ,सामाजिक ताकदीप्रमाणे गुन्हे करतो आणि त्यातून वाचतो असे चिन्मयचेच तत्त्वज्ञान आहे..)
...........
जालावरती विविध ब्लॉग्ज मध्ये शिकार प्रकरणातल्या शिक्षेच्या वेळी बरेच उलट सुलट वाचले होते , इतके लोक या गुन्हेगाराचे समर्थन कसे करत आहेत , याचे मनातून फार आश्चर्य वाटले आणि दु:ख होत होते ,....त्यावर चर्चात्मक काहीतरी लिहायचे मनात होते....पण लिहिता लिहिता सलमानचे तथाकथित सर्व गुन्हे आम्ही त्या त्या पात्रांना वाटून दिले आणि काम सोपे होऊन गेले...

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2008 - 5:59 pm | प्रकाश घाटपांडे

हे प्रायोगिक रंगभुमी सुदर्शन रंगमंचावर प्रयोग झाले होते का? छान आहेत संवाद. अभिनंदन. रंगभुमीवर लागले की बघु आता. नांव तर ऐकलेले आहे.
प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर's picture

8 Feb 2008 - 10:58 pm | भडकमकर मास्तर

घाटपांडे साहेब,
होय्...सुदर्शन वर याचे काही प्रयोग झाले २००७ मध्ये ...नंतर काही स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली....आणि आपण नाव ऐकलेले आहे हे ऐकून आनंद वाटला...
धन्यवाद....