आठवते मज शाळा
शाळेतील फळा
पृथ्वीचा तो गोळा
अन बेकंबे चा पाढा !
भिंतीवरचे सुविचार
घडवित होते आचार
मास्तरांची छडी
घाली शिस्तीची घडी
पुस्तकातील धडा
भरे ज्ञानाचा घडा
कवितेचे पठण
लावे आयुष्याला वळण
शाळेची मधली सुट्टी
डब्यासंगे जमे गट्टी
सर्वत्र आरडा ओरडा
शिक्षेसाठी उठा बशा
पिटीचा एक तास
मैदानाची पाहे वाट
कसरत अन कवायती
श्रमाचीही कळे मती
जन गण मन ची सुरूवात
वंदे मातरमने शेवट
संस्कारांची ही देवाण
जीवनातील ही ठेवण.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2247
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाळेची
छान
+१
आठवते मज
बालपणींच्या .....