तू..... !

चंद्रशेखर महामुनी's picture
चंद्रशेखर महामुनी in जे न देखे रवी...
20 Mar 2009 - 7:07 pm

तू......

तू इथेच कुठेतरी आहेस.... की हा तुझा भास आहे ?...
वार्‍याची झुळुक होउन येणारा... तुझा स्पर्श आहे कि रातराणीचा सुवास आहे?......
भोवती फ़ेर धरुन ,आजकाल तु नुसती नाचत असतेस.....
गिरक्या घेत..वाकुल्या दाखवत..माझी होणारी धांदल बघत असतेस..
पुस्तक उघडल्यावर,आताशा,तुझा चेहेराच दिसायला लागतो.....
हार्मोनियम उघडुन मग मी.. तुझी फ़र्माइशी गाणीच गायला लागतो....
रस्त्यावरुन जाताना..वळ्णा-वळ्णाला.. आठवणी दिसायला लागतात...
सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात..........
निळ्याशार आकाशात... चंद्राकडे पाहाताना.. मन तुझ्याकडे धावायला लागतं.......
तू देखील त्याच्याकडे.. त्याच वेळी पाहात आहेस.. असं सांगून त्याला
आवरावं लागतं........
शांत वाटावं.. म्हणून देवाला जावं... तर तिथेही तु पाठ सोडीत नाही..
अगं ! असं कोणतं देउळ आहे ? जिथे आपण दोघे गेलो नाही ?...
देहभान विसरुन मी गात असताना.... हळुच निरखून पहात असतेस....
गाडीत बसायला यावं.. तर आधीच शेजारी वाट पहात असतेस...
हिरव्या श्रावणात रंगलेल्या.. मेंदी सारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात....
आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात...
जिकडे-तिकडे, भास-आभास आणी आठव-सावल्यांचेच खेळ.......
स्वप्न आणी वास्तवाचा आता... घालताच येत नाही मेळ !......
वेडं मन..... तरीही खुणावतच असतं.......
हा भास नाही..... तू इथेच ..... कुठेतरी आहेस !.......

-चंद्रशेखर

कविता

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

20 Mar 2009 - 7:11 pm | क्रान्ति

हिरव्या श्रावणात रंगलेल्या ..मेंदीसारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात...
सुन्दर कल्पना! कविताही सुन्दर.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

20 Mar 2009 - 7:18 pm | प्राजु

रंगधुंद आठवणी.. मस्त आहे कल्पना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Mar 2009 - 7:26 pm | चंद्रशेखर महामुनी

प्राजु !
आभारि आहे ! काल मि तुझ्या ब्लोग वर लिहिलेले वाचलेस का?

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Mar 2009 - 7:23 pm | चंद्रशेखर महामुनी

तुझा अभिप्राय आला कि बरे वाट्ते !

सूहास's picture

20 Mar 2009 - 7:31 pm | सूहास (not verified)

आमिताभच्या "मे॑ और मेरी तनहाई"ची आठ्वण झाली.
वास्तव
सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात
आणी स्वप्नर॑जन
आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात

चा॑गल जमवलय॑

सुहास..
(द गुड)

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Mar 2009 - 7:40 pm | चंद्रशेखर महामुनी

क्या बात हे ! आवड्ले !

Dhananjay Borgaonkar's picture

20 Mar 2009 - 7:47 pm | Dhananjay Borgaonkar

लैइइइइइइइइइइइइइइइइइ भारी आहे कविता. च्यामारी एकदम तिचिच आथवन आलि...
येउदेत अजुन...

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Mar 2009 - 9:45 pm | चंद्रशेखर महामुनी

धन्यवाद ! तिचि आठ्वण आलि... कवितेचे सार्थक झाले...

अबोली's picture

21 Mar 2009 - 10:44 am | अबोली

कविता खूप सून्दर , मी 'मिपा' मध्ये नवीन आहे म्हणून विचारते 'स्वराली' चे महामुनी आपणच का ?

चंद्रशेखर महामुनी's picture

22 Mar 2009 - 1:00 pm | चंद्रशेखर महामुनी

हो ! अबोलि ! मी तोच आहे !

जागु's picture

21 Mar 2009 - 1:47 pm | जागु

खुप सुंदर.

चंद्रशेखर महामुनी's picture

22 Mar 2009 - 1:01 pm | चंद्रशेखर महामुनी

आभारी आहे !

विसोबा खेचर's picture

22 Mar 2009 - 4:20 pm | विसोबा खेचर

अरे वा! छान कविता..!

तात्या.

चंद्रशेखर महामुनी's picture

22 Mar 2009 - 8:57 pm | चंद्रशेखर महामुनी

वा ! तात्या ! तुमची दाद मिळाली म्हणजे क्या बात है ! छान वाट्ले मला !

जयवी's picture

24 Mar 2009 - 12:56 pm | जयवी

हिरव्या श्रावणात रंगलेल्या.. मेंदी सारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात....
आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात...

मस्तच :)

अबोली's picture

24 Mar 2009 - 5:11 pm | अबोली

मी तुमची खुप चाह्ती आहे. 'मिपा'वर तरी भेट झाली , हा खुप आन॑दाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला .

चंद्रशेखर महामुनी's picture

24 Mar 2009 - 8:00 pm | चंद्रशेखर महामुनी

धन्यवाद ! अबोली...