मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू..... !

चंद्रशेखर महामुनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तू...... तू इथेच कुठेतरी आहेस.... की हा तुझा भास आहे ?... वार्‍याची झुळुक होउन येणारा... तुझा स्पर्श आहे कि रातराणीचा सुवास आहे?...... भोवती फ़ेर धरुन ,आजकाल तु नुसती नाचत असतेस..... गिरक्या घेत..वाकुल्या दाखवत..माझी होणारी धांदल बघत असतेस.. पुस्तक उघडल्यावर,आताशा,तुझा चेहेराच दिसायला लागतो..... हार्मोनियम उघडुन मग मी.. तुझी फ़र्माइशी गाणीच गायला लागतो.... रस्त्यावरुन जाताना..वळ्णा-वळ्णाला.. आठवणी दिसायला लागतात... सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात.......... निळ्याशार आकाशात... चंद्राकडे पाहाताना.. मन तुझ्याकडे धावायला लागतं....... तू देखील त्याच्याकडे.. त्याच वेळी पाहात आहेस.. असं सांगून त्याला आवरावं लागतं........ शांत वाटावं.. म्हणून देवाला जावं... तर तिथेही तु पाठ सोडीत नाही.. अगं ! असं कोणतं देउळ आहे ? जिथे आपण दोघे गेलो नाही ?... देहभान विसरुन मी गात असताना.... हळुच निरखून पहात असतेस.... गाडीत बसायला यावं.. तर आधीच शेजारी वाट पहात असतेस... हिरव्या श्रावणात रंगलेल्या.. मेंदी सारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात.... आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात... जिकडे-तिकडे, भास-आभास आणी आठव-सावल्यांचेच खेळ....... स्वप्न आणी वास्तवाचा आता... घालताच येत नाही मेळ !...... वेडं मन..... तरीही खुणावतच असतं....... हा भास नाही..... तू इथेच ..... कुठेतरी आहेस !....... -चंद्रशेखर

वाचने 3473 वाचनखूण प्रतिक्रिया 17

क्रान्ति 20/03/2009 - 19:11
हिरव्या श्रावणात रंगलेल्या ..मेंदीसारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात... सुन्दर कल्पना! कविताही सुन्दर. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by क्रान्ति

प्राजु 20/03/2009 - 19:18
रंगधुंद आठवणी.. मस्त आहे कल्पना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

चंद्रशेखर महामुनी 20/03/2009 - 19:26
प्राजु ! आभारि आहे ! काल मि तुझ्या ब्लोग वर लिहिलेले वाचलेस का?

In reply to by क्रान्ति

चंद्रशेखर महामुनी 20/03/2009 - 19:23
तुझा अभिप्राय आला कि बरे वाट्ते !

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 20/03/2009 - 19:31
आमिताभच्या "मे॑ और मेरी तनहाई"ची आठ्वण झाली. वास्तव सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात आणी स्वप्नर॑जन आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात चा॑गल जमवलय॑ सुहास.. (द गुड)

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

चंद्रशेखर महामुनी 20/03/2009 - 19:40
क्या बात हे ! आवड्ले !

Dhananjay Borgaonkar 20/03/2009 - 19:47
लैइइइइइइइइइइइइइइइइइ भारी आहे कविता. च्यामारी एकदम तिचिच आथवन आलि... येउदेत अजुन...

In reply to by Dhananjay Borgaonkar

चंद्रशेखर महामुनी 20/03/2009 - 21:45
धन्यवाद ! तिचि आठ्वण आलि... कवितेचे सार्थक झाले...

अबोली 21/03/2009 - 10:44
कविता खूप सून्दर , मी 'मिपा' मध्ये नवीन आहे म्हणून विचारते 'स्वराली' चे महामुनी आपणच का ?

In reply to by जागु

चंद्रशेखर महामुनी 22/03/2009 - 13:01
आभारी आहे !

In reply to by विसोबा खेचर

चंद्रशेखर महामुनी 22/03/2009 - 20:57
वा ! तात्या ! तुमची दाद मिळाली म्हणजे क्या बात है ! छान वाट्ले मला !

जयवी 24/03/2009 - 12:56
हिरव्या श्रावणात रंगलेल्या.. मेंदी सारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात.... आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात... मस्तच :)

अबोली 24/03/2009 - 17:11
मी तुमची खुप चाह्ती आहे. 'मिपा'वर तरी भेट झाली , हा खुप आन॑दाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला .