खिडकीकडून खिडकीकडे

Primary tabs

रंजन's picture
रंजन in जे न देखे रवी...
19 Sep 2007 - 7:07 pm

आमचे आपले असेच आहे
खिडकीकडून खिडकीकडे..
कधी इकडे कधी तिकडे
बेन्चावरून बेन्चावरती

माझ्या खिडकीचा फडफडे डोळा
कितिदा समोरच्या स्क्रिनवरती
मनात हलणारी पिंपळपालवी
बसलेली विजेच्या लोळावरती

पक्क्या गुंतल्या जुनाट गाठी
काळ्या गढूळ डोहाच्या काठी
अंधारडोह बसला जसा पाठी
प्रकाशदीप जातो बुडीत खाती

खिडकीकडून खिडकीकडे
जुन्या पारावरून पारावरती
झोकांड्या खात चालणे आता
बेन्चावरून बेन्चावरती

कविताविचार

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 6:57 am | पाषाणभेद

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद