आणि म्हणे मी लिंबूटिंबू!!!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
9 Mar 2009 - 6:08 am

नमस्कार मिपाकर मंडळी!!!

आज तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. मी बरेच दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणत होतो पण आमच्या त्या खड्डूस मालकांनी (म्हणजे मालक आमचे, तुमचे पिडांकाका!!!!:)) कधी संधीच मिळू दिली नाही. "तू अजून पुरता तयार झाला नाहियेस" हे त्यांचं पालुपद!! तेंव्हा आत्ता कुठे तुमच्याशी जरा बोलायची मोकळीक मिळाल्येय, तिचा फायदा घेतोय!!!

"अरे पण तू कोण, कुठला, ते तरी सांग मिपाकरांना!", डांबिसकाका
"म्हणजे? त्यांना अजुन काही पत्ताच नाही?"
"पत्ता कसा असेल? अरे तू म्हणजे काय "अनुष्का" आहेस का की मिपावरच्या समस्त सभासदांना तुझी समग्र माहिती!!! अरे विसोबाच्या विरुद्ध सरपंचांकडे तक्रार करणारे सभासदही आहेत इथे :)!!!!!!!", इति डांबिसकाका.
"हां, ते पण खरंच!!! च्यायला, नेहमी तुम्हीच मिपावर पडीक राहून सारखे गप्पा मारत रहा, आम्हाला कधी चान्स देऊ नका! मग मिपाकरांना कळणार कसं आम्ही कोण ते?"

" अरे हो, हो!! पण अरे आता दिलाय ना तुला चान्स!! मग बोल की तुला काय बोलायचंय ते!! मात्र माझी लाज काढू नकोस म्हणजे झालं!!!!", डांबिसकाका.
'ओके!!! मग आता तुम्ही एकदम गप्प बसा!! अजिबात मधेमधे बोलू नका!!!!! तर मंडळी, नमस्कार!! मी आहे एक लिंबू!!!! तुमच्या डांबिसकाकांच्या बागेतल्या एका लिंबाच्या झाडावर जन्माला आलेला!!!!"

आँ? असे दचकू नका एकदम!! एक लिंबू असं अचानक कसं बोलायला लागलं म्हणून!! अरे जर "पिवळा डांबिस" तुमच्याशी बोलू शकतो तर "पिवळं लिंबू" का बोलू शकत नाही?

आहे की नाही पॉइंटाचा मुद्दा!!!!!!!:)

तर सांगत काय होतो की हे तुमचे जे डांबिसकाका आहेत ना, त्यांना ना बागकामाचा विलक्षण शौक आहे.... जवळ जवळ व्यसनच म्हणा ना!!!!
दर विकांताला तीन-चार तास बागेतल्या मातीत हात रंगवल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. जर उन्हाळा असला आणि दिवस मोठे असले तर काही विचारूच नका!!! रोज कामावरून आल्यानंतर एखादा तास तरी हातात खुरपं घेउन काहीतरी खण वा काहीतरी उकर वगैरे चालू असतं!!!!! महिन्याचा अर्धा पगार नुसता बागकामाची अवजारं, बियाणी, कलमं आणि खतं यामध्ये उडवतांत!! पोरगं वैतागतं, काकू तर शिव्या घालते पण या प्राण्यामधे काही काडीचाही फरक पडत नाही....
हे गुपित आपलं तुमच्या-आमच्यात हो! त्यांना लगेच जाउन सांगू नका!! आमचा मुडदाच पाडतील ते त्यांची लाज काढली म्हणून!!!!

तर सांगायचा मुद्दा हा की त्यांनी त्यांच्या घराभोवती एक बाग जोपासली आहे. निरनिराळया तर्‍ह्वेची गुलाबं आहेत, इतर फुलझाडं आहेत पण त्यांनी काही फळझाडंही जोपासली आहेत. त्यांच्या ब्लॉगवर तुम्हाला ती दिसतीलच. आणि त्यात काही लिंबांची आणि संत्र्यां-मुसंब्यांची झाडं सुद्धा आहेत. त्यातल्याच एका लिंबाच्या झाडावर माझा जन्म झाला.....

ही बघा,

ही माझी माऊलीDSC01254">माऊली!

डॉर्फ व्हरायटी आहे पण दर वर्षी ३००-४०० लिंबांना जन्म घालते!!!! इतकी लिंबं येतात की त्यांच्या भाराने जड होऊन माझी माऊली बिचारी जमिनीला टेकते.....
मग सीझन संपल्यावर डांबिसकाकाच तिला सोडवतात ती सगळी लिंबं झाडावरनं उतरवून......

आता तुम्ही म्हणाल की हे लिंबासारखं लिंबू, मग आता त्यात काय बघायचं?
पण हीच तर ग्यानबाची मेख आहे.....

मी जन्माला आल्यापासून डांबिसकाकांची विनवणी करत होतो कि मला एकदा तरी मिपावर बोलू द्या......
मला माझ्या भारतातल्या लिंबू-बंधुभगिनींना एक संदेश द्यायचाय!!!
पण ते म्हातारं कसलं खट!!!!!
म्हणे, "आधी तू पिकून तयार हो!!!!"
तेंव्हा आता त्यांच्या नियमानुसार तावून सुलाखून निघाल्यानंतर मला ही संधी मिळत्येय.....

तर मी जेंव्हा पिकून तयार झालो तेंव्हा त्यांनी मला झाडावरून तोडून घरात आणलं....
त्याआधी तसे ते आमच्याशी गप्पा वगैरे मारायचे....
विशेषतः जेंव्हा त्यांनी गोष्टीचा एखादा भाग लिहुन तासभरही झालेला नसतांना तुम्ही मिपाकर त्या लिहुन झालेल्या भागावर नीट व्यवस्थित प्रतिक्रिया न देताच त्यांच्याकडे लगेच पुढल्या भागाची मागणी करायचांत ना, तेंव्हा ते आमच्यापाशी येऊन वैतागून बडबडायचे!!!!:)

"अरे तुम्हीच माझ्या खर्‍या जिव्हाळ्याचे!!! तुमची माझ्यापाशी काहीच मागणी नाही!!! ते मिपाकर नुसते छळतायंत बघा!! आत्ता लिहून भाग संपवला, टंकून-टंकून बोटं अजून हुळहुळताहेत, तर लगेच पुढल्या भागाची मागणी!!! तुम्ही बिचारे मला असं कधीच छळत नाही!!!!" वगैरे वगैरे......

तेंव्हा अखेर त्यांनी झाडावरून तोडून मला घरात आणल्यावर मी त्यांना विचारलं, "आता तुम्ही माझं काय करणार?"
ते म्हणाले, " काय करणार म्हणजे? तुला कापून एखाद्या मटणावर पिळणार!!!"
च्यायला बघा, इथे आमचा जातोय जीव आणि हे थेरडं मटण खातंय!!!

पण काही हरकत नाही. आम्हाला कापून एखाद्या पुचाट दोडक्याच्या भाजीवर पिळत नाहीत हे काय थोडं आहे!!!!!:)

मग मी त्यांना म्हटलं कि "ठीक आहे! कापा आम्हाला!! आमचं तेच प्राक्तन आहे!!!! पण त्याआधी आमच्या भारतातल्या बंधूभगिनींना एक संदेश तरी देऊ द्याल की नाही?"
"ओके, दे तू संदेश!!", काका म्हणाले. पण लगेच पुढे म्हणाले, "पण नुसता संदेश काय कामाचा नाही, त्याबरोबर तुझा फोटोही हवाच!!! मी कॅमेरा घेउन येतो...."

खुळे काका कॅमेरा घेउन आले!! बहुदा शिवास रीगल अंमल गाजवीत असावी.......

माझा फोटोबिटो काढून झाला आणि मग म्हणाले की नुसता तुझा फोटो काढून तुझं वैशिष्ट्य लोकांना कळणार कसं? त्यासाठी तुलना करण्यासाठी भारतातल्या लोकांना समजेल अशी काहीतरी वस्तू हवी ना!! थांब, मी आत्ता येतो!!"

मला किचनच्या ओट्यावर ठेऊन डांबिसकाका कुठेतरी निघून गेले. गॅरेजमध्ये काहीतरी खुडबूड केल्याचे आवाज ऐकू येऊ लागले.....

मी आपला किचनच्या ओट्यावर तसाच.......

जरा डोळे उघडून बघतो तर डांबिस काकू किचनमध्ये सुरी घेऊन कांदा चिरत होती.....
माझ्या छातीत भीतीनं धडकी भरली.....
म्हटलं ही बाई आता क्षणार्धात आपल्याला हातात घेउन कापणार.....
तितक्यात तिने माझ्याकडे निरखून बघितलंही....
आणि तिच्या हातात धारदार सुरी......
माझं काळीज लक्ककन हललं........
मी आपला डोळे मिटून आमच्या लिंबेश्वरी देवीचा जप करायला लागलो.......

या अफलातून काकूचा काय भरंवसा नाय!!!
तिने गेल्या वर्षी लिंबांचे अनेक प्रकार केले होते....
४०० लिंबं संपवायची होती ना!!!!:)

लिंबांच तिखट लाल लोणचं....
लिंबांचं ओली हळद आणि हिरव्या मिरच्या टाकून पिवळं लोणचं....
लिंबाचं गोडं लोणचं....
लिंबाचं सुकामेवा घालून (खारीक, काजू वगैरे!!!) लोणचं
लिंबाचं उन्हात कॉन्संन्ट्रेट केलेले सरबत...
आल्या-लिंबाचा औषधी रस.....
लिंबाचा लेमन केक
लिंबाचं लेमन पुडिंग......
लिंबाची लेमन फ्लेवर्ड बिस्किटे....

तिच्यायला, ही बाई आहे का लिंबासुरमर्दिनी!!!!!!!!!!!!!!!!!!!
:)

पण माझी पुण्याई जबरदस्त असल्याने त्या क्रूर डांबिसकाकूने माझ्यावरचं लक्ष दूर केलं आणि परत समोरचे कांदे चिरायला सुरवात केली....
इतके कांदे? बहुदा मोगलाई मटणाचा बेत असावा........

तितक्यात डांबिसकाका परत आले, मी सुटकेचा निश्वास टाकला.....
काकांच्या हातात एक वस्तू होती......
" ही वस्तू भारतात सगळ्यांच्या ओळखीची आहे!! हा आहे टेनिसचा चेंडू!!! इथे त्याने टेनिस खेळतात पण भारतात याने क्रिकेट खेळतात!! इंडियामें इसकी अनोखी पेहेचान है, भारतका बच्चा-बचा इसे पेहेचानता है!!!!", शिवास रीगल हाय झाली की काका हिंदीमध्ये बोलतात!!!!

"बरं मग आता या चेंडूचं काय करूया?", माझा प्रश्न...
"अरे असं काय करतोस? भारतातली लिंबं असतात आवळ्याएव्हढी!!"
"आवळा? व्हॉट इज दॅट?",
"अरे म्हणजे लहान, दीड फार फार फार तर दोन इंच व्यासाची!!!!"
"अरेरे!! त्यांना पुरेसं खाणं मिळत नसेल!!", माझ्या बांधवांची अवस्था ऐकूनच मला भडभडून आलं....
"अरे, भारतातले शेतकरी गरीब असतात!!! त्यांमुळे त्या लिंबांना तुमच्यासारखी मशागत मिळत नाही!!! त्यात ग्रामीण भागात बारा-चौदा तासांचं लोडशेडिंग असतं!!! तुम्हाला इथे सगळं फुकट मिळतं म्हणून रांडिच्च्यांनो तुम्ही माजलायत!!!!", डांबिसकाकाने आपला पावशेर ठेवून दिला.......

त्याचं ते म्हणणं खरं असल्याने मी तो पावशेर निमूटपणे ऐकून घेतला.....

"बरं मग तुमचं काय म्हणणं? काय करायचं या चेंडूचं?", मी त्यांची रीगल एक्सप्रेस मूळ रूळावर आणत विचारलं...
"अरे असं करू या, तुझ्याशेजारी हा चेडू ठेवून तुमचे फोटो काढूया!!! म्हणजे तुझ्या भारतातल्या बंधू-भगिनींना तुझी विशेषत्व काय आहे ती कळेल!!! नायतर नुसत्या शाब्दिक संदेशाला आजकाल कोण विचारतो!!! महाराष्ट्राचे पाच नेते जनतेला दररोज दहा संदेश देतात, कोणी भीक घालतं?" बाकी पॉलिटिक्सचा विषय निघाला की डांबिसकाकाच्या जिभेवर सरस्वती "कजरा रे, कजरा रे" करत ठुमकत नाचते......
:)

"ठीक आहे, काढा फोटो!!!"

DSC01262">.

पण एक फोटो काढून डांबिसकाकाचं समाधान झालं नव्हतं.....
"अजून एक फोटो काढूया!!!!"
"आता तो कशाला?"
"अरे असं काय करतोस? हा फोटो बघुन मला बुवा यात काहीच विशेष दिसलं नाही असं कुणी म्हणालं तर? तुला माहीत नाही पण मिपावर असे शंकासूर खूप आहेत, माझा तिथला एक वर्षाचा भरीव अनुभव आहे!!! अजून एक काढूया फोटो!! म्हणजे कुणाला काही शंका रहायला नको!!!!"

असं म्हणत डांबिसकाकांनी माझे अजून फोटो काढले. आता कॅमेरा त्यांच्या हातात होता!! मी बिचारा काय करणार?

DSC01264">.

तर भारतातील माझ्या लिंबू बंधुभगिनींनो!!!
तुमच्यासाठी माझा संदेश हाच...

जरा माझ्याकडे बघा आणि आपल्या मनात बिंबवा, की.....
"बी ऑल यू कॅन बी!!!! ओन्ली स्काय इज द लिमिट!!!

कोणी काय म्हणतंय याच्यावर विश्वास ठेवू नका!!! तुमच्या हॄदयातल्या भरारीला मूर्ख ठरवणारे लोक केवळ वडिलधारे आहेत म्हणून त्यांचं काहीयेक ऐकू नका!!!!
ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय अशा वडिलधार्‍यांचा जरूर सल्ला घ्या.....
पण ज्यांनी अनुभव घेतला नाहिये त्या वडिलधार्‍यांच्या उपेक्षेला केवळ ते वडिलधारे आहेत आणि तुम्ही लिंबूटिंबू आहांत म्हणून मुळीच भीक घालू नका!!!!

आपल्या सात घोड्यांच्या सात टापांत अवघे नभोमंडळ व्यापणार्‍या त्या सहस्त्ररश्मी सूर्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा.......
माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच, पण....

आपली श्री लिंबेश्वरी देवीही तुम्हाला मदत करो!!!!!!

देशांतरविनोदजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

9 Mar 2009 - 6:24 am | सहज

वेगळाचं लेख. फोटो आवडले.

लिंबू, काका आणी शिवास तिघांनी मिळून एक चांगला लेख लिहलाय ;-)

---------------------------------------------
बागकामाची आवड असायचे हे एक कारण असु शकते काय? :-)

मुक्तसुनीत's picture

9 Mar 2009 - 7:54 am | मुक्तसुनीत

लिंबू, काका आणी शिवास तिघांनी मिळून एक चांगला लेख लिहलाय
हेच म्हणतो ! :-)

विजुभाऊ's picture

14 Mar 2009 - 11:31 am | विजुभाऊ

जय डाम्बीस काका.
लिम्बाला लावलेल्या वेंडुच्या कंकणाकृती ग्रहणाचा फोटो मस्त.
अवांतरः आम्ब्यावर ल्हिताल्हिता लिम्बावर ल्ह्यायला सुर्वात कर्रा

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

भाग्यश्री's picture

9 Mar 2009 - 6:44 am | भाग्यश्री

हेहे काका! लेख भारी लिहीलायत! लींबू तर कॉस्को मधे शोभेल इतके दणदणीत आहे! द्या त्यांना पाठवून.. :)

फक्त फोटो काढताना काय काय करामती केल्यात तेही लिहा.. म्हणजे जमिनीवर झोपून वगैरे फोटो काढावे लागले असतील नै? :))

लिंबं मस्त आली आहेत.. काळीशार सुपीक माती, आणि सुयोग्य हवामानाचा फायदा दिसतो आहे! ( अर्र.. भुगोलाच्या पेपरातले उत्तर आले इथे :) .. असो..)
आता , सॅन्ता रोझा रोड वर लिंबाची शेती विकत घेऊन टाका एकरभर! :) डिस्नेलँडच्या सोअरिंग ओव्हर कॅलिफॉर्निया राईडमधे दिसेल शेत वरून! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

नंदन's picture

9 Mar 2009 - 7:01 am | नंदन

'लिंब'लोण उतरवून टाकावं असा लेख :). किती मार्गारिटा ग्लासेस (किंवा गेला बाजार करोनाच्या बाटल्या) ह्या एका लिंबाच्या फोडी सजवू शकतील असा विचार डोक्यात आला. [न पिणार्‍याला लिंबे आंबट अशी नवीन म्हण रूढ करावी काय?]

लिंबाच्या झाडाचा फोटोही मस्त. झाड अगदी लिंबांनी लगडलेलं आहे (आऊट ऑन अ लिंब? :)). शेवटचा उपदेशही आवडला. 'कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी' असं बोरकरांनी सांगून ठेवलं आहेच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

9 Mar 2009 - 8:37 am | घाटावरचे भट

सहमत.

- (दक्षिण क्यालिफोर्निया कंपू म्येंबर) भटोबा

श्रावण मोडक's picture

9 Mar 2009 - 11:44 am | श्रावण मोडक

हेच म्हणतो...

या लिंबावर वेगवेगळ्या स्मायलीज काढल्या तर ...

अनिल हटेला's picture

9 Mar 2009 - 7:52 am | अनिल हटेला

लिंबुपूराण /लिंबुकथा आवडली !! :-)

!! श्री लिंबेश्वरी देवी प्रसन्न !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2009 - 8:23 am | प्रकाश घाटपांडे

आमाला आदुगर हे आंबेच वाटले व्हते. यवढाली लिंब असल्याव मंग लिंबुटिंबु ल्वॉक बी भारी पडतीन. डन्लॉप लिंबु लई आवाडल. आमच्याक बाजारात जी लिंब लई बारकी असायची त्येन्ला नवरानवरीची लिंब म्हनायचे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

9 Mar 2009 - 8:47 am | दशानन

मला बीं आंबाच वाटला हुता आधी =))

लै भारी पिडाआ ;)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

प्रमोद देव's picture

9 Mar 2009 - 8:34 am | प्रमोद देव

मालवणी माणूस आणि लिंबं ह्यांचा फार घनिष्ट संबंध आहे हेच ह्यावरून सिद्ध होते.
आता मिरच्याही पिकवा. ;)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राजु's picture

9 Mar 2009 - 8:49 am | प्राजु

एकदम वेगळा लेख.
लिंबाचा संदेश आवडला. मस्त फोटो. मस्त लेख. आवडला.
काका, लिंबाचा आकार मस्त आहे.
काकूंना लिंबाचे इतके प्रकार येताता... सह्ही!!
लिंबेश्वर प्रसन्न!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंद's picture

9 Mar 2009 - 10:25 am | आनंद

मी डनलॉप लिंबु बोलतोय निबंध आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 10:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, लिंबाला (आणि शिवासला) सांगा लेख मस्त जमलाय म्हणून! लिंब डाएटवर नाही आहेत ते मस्तच, डाएटवाल्या लोकांना दोन दिवस पुरतील. आता तुमचा ब्लॉग पाहिलाच पाहिजे. शहरात राहून ही हौस स्वतः भागवता नाही आली तरी तुमच्या ब्लॉगाकडे पाहून समाधान मानून घेता येईल.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 12:28 pm | बिपिन कार्यकर्ते

काका!!! लै म्हणजे लै भारी.... एका लिंबावर एवढं जबरदस्त लिहिलंय.... मजा आली.

लवणासुरमर्दिनी, अफलातून काकू
तुम्हाला फटके पडत नाहीत का हो? ;)

शेवटच्या ओळी आवडल्या. मान गये!!!

बिपिन कार्यकर्ते

अडाणि's picture

9 Mar 2009 - 12:33 pm | अडाणि

काकुंना नक्कीच मराठी वाचता येत नसणार...
-
अफाट जगातील एक अडाणि.

विनायक प्रभू's picture

9 Mar 2009 - 12:28 pm | विनायक प्रभू

मालकांकडुन प्रेरणा घेत आहेत लिंबू.

मदनबाण's picture

9 Mar 2009 - 2:04 pm | मदनबाण

लिंबाचे "आकारमान" भारी हाय...
लिंब पुराण आवडले... :)

अवांतर :-- लिंबा राम आठवला.

मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

बेसनलाडू's picture

9 Mar 2009 - 2:21 pm | बेसनलाडू

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही भारी!
(वाचक)बेसनलाडू

मनिष's picture

9 Mar 2009 - 2:33 pm | मनिष

लिंबासारखच ताज-तवानं, टवटवीत करणारं तजेलदार लेखन! :)

प्रभाकर पेठकर's picture

9 Mar 2009 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर

वा! मिपावरही लिंबू मारलेत..!

पण काकूंनी एवढे कांदे कशा करता चिरायला घेतलेत? एखादी नवीन पाककृती येते आहे का?

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

चतुरंग's picture

9 Mar 2009 - 4:35 pm | चतुरंग

तुमचं तुमच्या बागेवर मनसोक्त प्रेम दिसतंय! :)
मन लावून, निगुतीनं, तुमच्यातला माळी त्या बागेची मशागत करत असणार (तुमच्या ब्लॉगावर आम्ही फोटू बघितलेत).
एका लिंबाबद्दल एवढ्या आत्मियतेने तोच माणूस लिहू शकतो ज्यानं त्याला लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवलंय!
त्या फळांचा आकार, रंग, त्यावरची तकाकी, वा!! क्या बात है!!! :) :)
(खुद के साथ बातां १: रंग्या, जमिनीवर ठेवलेल्या लिंबू आणि टेनिसबॉलचे फोटू कसे काढलेत? असले अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नकोस! ;) )
(खुद के साथ बातां २: रंगा, काकांकडे लोणच्यासाठी वशिला लावून ठेव हो आत्तापासून, जायला जमेल तेव्हा जमेल! B) )

चतुरंग

शितल's picture

9 Mar 2009 - 5:38 pm | शितल

काका,
लिंबानी वाकलेल्या झाडाचा फोटो सुरेख.. त्यावरूनच लक्षात येते तुम्ही झाडांची किती काळजी घेत असाल, त्यावर मेहनत घेत असाल... सलाम तुम्हाला. :)
लिंबाच्या आकारा बद्दल काय बोलावे.. एक लिंबाच्या रसात ४ ग्लास तरी लिंबु सरबत फिक्स.
लिंबाचे मनोगत आवडले. :)

अवांतर - (तुम्ही कलिंगड, भोपळा ह्यांची लागवड नाही ना केलीत.. :? )

शोनू's picture

9 Mar 2009 - 6:01 pm | शोनू

लिंबाचे फोटो मस्तच एकदम.
कुठल्या झोन मधे रहाता? हे मायर लेमन आहे का? किती वर्षं लागतात फळ यायला ?
घरात एखाद्या मोठ्या कुंडीत ठेवून असलं झाड तगेल का?

मी ६ झोन मधे रहाते. साधारण ऑक्टोबर अखेरी पासून फ्रॉस्ट सुरु होतं इथे :-(

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 6:06 pm | लिखाळ

लिंबू आणि लेख दोन्ही मस्त ! :)
-- लिखाळ.

रेवती's picture

9 Mar 2009 - 8:28 pm | रेवती

छान लिहिलयत पिडाकाका!
तुमचं बागेबद्दलचं प्रेम दिसून येतं.
अश्यावेळी अगदी प्रत्येक फळ, फूल कसं दिसतं, काल किती मोठं होतं, आज कसं आहे हे बघीतलं जातं.
रेवती

सुप्रिया's picture

12 Mar 2009 - 10:30 am | सुप्रिया

सुरेख लेख. लिंबूपुराण आवडले.

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 8:42 am | विसोबा खेचर

खास डांबिसाच्या लेखणीतून उतरलेला एक खल्लास लेख..! :)

जियो रे डांबिसा..तुझ्या लिंबूप्रेमाला सलाम..!

तात्या.

मिसळभोक्ता's picture

13 Mar 2009 - 8:52 am | मिसळभोक्ता

लिंबाचे वर्णन आवडले. लाईम आणि लेमन ह्यातील फरक सुस्पष्ट सांगावा.

इडलिंबू म्हणजे लाईम की लेमन ?

-- मिसळभोक्ता

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2009 - 10:36 am | पिवळा डांबिस

माझ्या अल्प माहितीनुसार लाईम हे तयार झालं तरी हिरवंच रहातं. ते या तिघांत सगळ्यात आंबट असतं. चवही वेगळी असते. हे टकिलामध्ये वापरतात...
लेमन हे पिकल्यावर पिवळं होतं. त्याची साल पातळ असते. सरबतासाठी उत्तम! या लेखात वर्णन केलेले फळ हे लेमन आहे. यालाच भारतात कागदी लिंबू असेही म्हणतात....
ईडलिंबू ही पिकल्यावर पिवळं होतं पण याची साल जाड असते. सरबतासाठी फारसं उपयुक्त नाही कारण जाड सालाचा कडवटपणा रसात उतरतो. पण लोणचे करण्यासाठी उत्तम कारण जाड साल चांगली मुरते....
पिडां

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2009 - 10:29 am | पिवळा डांबिस

अभिप्राय दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांचे आभार!
पिडां