बेगम बर्वे - एक डोक्यावरून गेलेले नाटक

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
4 Mar 2009 - 11:14 pm

परवाच (१ मार्च) सतिश आळेकरांचे प्रचंड गाजलेले 'बेगम बर्वे' नाटक मूळ संचात (स्वतः आळेकर, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे वगैरे) पहायचा योग आला. नाटकाची खूप किर्ती ऐकली होती, त्यामुळे अगदी उत्सुकतेने ते नाटक पाहिले, पण फारसे झेपले नाही! :(

खूप प्रश्न पडलेत -- इथे मिपावर जाणकार माहिती देतील अशी आशा आहे. हे नाटक प्रामु़ख्याने स्त्री भुमिका करणार्‍या, बालगंधर्वांना आदर्श मानणार्‍या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीच. नलावडे बाई म्हणजेच बर्वे - हे कसे काय? पुढे तिचे/त्याचे लग्न, एकत्र राहणे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आहे का? शिवाय ते दिवस राहणे?? फारच गोंधळ उडाला आहे....दाखवायचे काय आहे नक्की?

तसे बहुतेक प्रायोगिक नाटके मला खूप आवडतात...दुर्बोध विषय किंवा भाषा, दोन्हीचे वावडे नाही... पण ह्या नाटकापुढे खरच हात टेकले, काय म्हणायचे/दाखवायचे/सांगायचे आहे आळेकरांना? कोणी समजावून सांगेल का?

नाट्यसमीक्षा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

4 Mar 2009 - 11:19 pm | अवलिया

पास

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

4 Mar 2009 - 11:24 pm | भडकमकर मास्तर

मी पाहिलेले नाहीये ...
अवांतर निष्कर्ष : बालगंधर्वांना आदर्श मानणार्‍या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे.
आळेकरांचे नाटक इतके कळले पुष्कळ झाले की .....

_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष's picture

4 Mar 2009 - 11:37 pm | मनिष

अवांतर निष्कर्ष : बालगंधर्वांना आदर्श मानणार्‍या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे.
आळेकरांचे नाटक इतके कळले पुष्कळ झाले की .....

=))

बापरे...आता मास्तरांनीच असे म्हणल्यावर कुणाच्या तोंडाकडे पहायचे आम्ही? गुमान झोपावे आता... I)

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Mar 2009 - 11:40 pm | बिपिन कार्यकर्ते

मनिष.... मला पण असेच वाटते आहे... साक्षात मास्तरांनी असं म्हणावं... आपली लायकी मग त्या नाटकाचं पोस्टर बघण्याची पण नाही की रे....

बिपिन कार्यकर्ते

तुम्ही कधी लिहिणार परीक्षणं? क्लासेस नुसतेच काढलेत काय मास्तरांनी? पुढचे मास्तर तयार व्हायला हवेत की नकोत - चला लागा कामाला!! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Mar 2009 - 11:47 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायला.... परिक्षण लिहायचं तर आधी ते नाटक समजायला तर पाहिजे ना? परिक्षण काय लिहिणार डोंबलाचं?

खुद के साथ बाता: परिक्षणं जनरली अशी नाटक / सिनेमा न समजताच लिहितात की काय?

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

4 Mar 2009 - 11:24 pm | मेघना भुस्कुटे

पाहिलेलं नाही. वाचलेलंही नाही. त्यामुळी माझापण पास.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Mar 2009 - 11:31 pm | बिपिन कार्यकर्ते

या नाटकाबद्दल खूप म्हणजे खूपच ऐकले आहे. उत्सुकता आहेच अजून जाणून घ्यायची. कोन हाय का नीट सांगनारं?

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

4 Mar 2009 - 11:35 pm | भडकमकर मास्तर

मनिष, तूच या धाग्यात नाटकाच्या गोष्टीपासून सारे सविस्तर लिहावेस अशी विनंती करतो...
आता तुलाच काय ती समजलेली असणार ती बेगम...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

4 Mar 2009 - 11:53 pm | धनंजय

मी १९९२ का १९९३ मध्ये पाहिले होते.

थोडेसे दुर्बोधपणाकडे झुकणारे असले, तरी मला आवडले होते. "स्वतःची पुरुष/स्त्री म्हणून ओळख" आणि "पुरुष-पुरुष संबंधांतील वेगवेगळ्या छटा" असे वेगवेगळे धागे होते, असे अंधुक स्मरते.

त्यात दोन तशी वैशिष्ट्य नसलेली (म्हणजे सुरुवातीला असे वाटते) अविवाहित पुरुष-पात्रे आहेत, पैकी एकाचे लग्न ठरते, त्यातून त्या दोघांमध्ये काही विचित्र वितुष्ट येते, ते उपकथानकही विचार करण्यासारखे आहे.

दिवस राहाणे हे सांकेतिक आहे की बर्वे/नलावडे बाईंचा बुद्धिभ्रम... दोन्ही प्रकारे कथानकाचा अर्थ लावून घेता येतो.

तेव्हा मला नाटकाबद्दल दोन वेगवेगळे विचार मनात आले : (१) विषय खूपच स्फोटक असल्यामुळे नाटककाराने तो मुद्दामून दुर्बोध केला आहे "समझनेवाले समझ जाएंगे, अनाड़ी चुप बैठेंगे" (असा थोडासा क्षम्य भ्याडपणा), किंवा
(२) एकाच वेळी अनेक अर्थ लागू शकतील अशी कथानके विणणे हे नाटककाराला अभिप्रेतच होते. म्हणजे "राशोमोन" चित्रपटाचा अर्थ लागला नाही, कोणी कुणाचा खून केला, ते शेवटपर्यंत कळले नाही, तर ठीकच असते. आयुष्यात काहीकाही घटनांचा अर्थ आपल्याला लागतो-लागतो असे वाटता-वाटता लागतच नाही, असा त्या चित्रपटाचा मथितार्थ आहे.

आता मला ते नाटक फारसे आठवत नाही. त्यानंतर कित्येक वर्षे मी त्या नाटकाची संहिता शोधत होतो. मिळाल्यास वाचायला आवडेल.

नीधप's picture

5 Mar 2009 - 9:52 am | नीधप

>>मिळाल्यास वाचायला आवडेल.<<
हे नाटक आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नंबर एकचे चमत्कारिक नाटक आहे. ह्या नाटकाने कुठल्याही प्रकारचे
मनोरंजन वा समाज प्रबोधन होत नाही. असली घाणेरडी स्टोरी कुठल्याही सुसंस्कृत व सभ्य माणसाला आवडेल असे वाटत नाही. अतिशय किळसवाणी भाषा आहे, उदा. "बेगमः 'आज गुरूवार, श्री दत्ताचा वार..' ह्यावर मोहन आगाशेंची बसलेल्या आवाजात आरोळी: 'मग उदबत्त्या कोण आणणार? दत्तापुढे तुझे झ्याट जाळायचे का?' इ. इ.
आम्हांस हे नाटक पाहतांना मळमळू लागले व स्टेजवर जाऊन भडाभडा ओकावेसे वाटू लागले म्हणून आम्ही उठून आलो.
घरी येऊन (ह्या भिकार नाटकाच्या नावाने) स्वच्छ आंघोळ करून दगडूशेटचे दर्शन घेतल्यावर बरे वाटले. उत्साहाने आणलेले बेगम बर्वेचे स्क्रिप्टही रस्त्यावर फेकून दिले
व त्यावरून एक ऑटोरिक्षा गेला तेंव्हा समाधान वाटले. तो ऑटोरिक्षाही पुढे जाऊन कोलमडला म्हणे..
थोडक्यात पुलंच्या राघूनाना सोमणांना प्रा. चक्रदेवांचा उदासबोध वाचल्यावर जे वाटले तेच आमचे झाले.
आमचे पैसे वाया गेले, तुम्ही कोणी घालवू नका !

नीधप's picture

5 Mar 2009 - 9:35 am | नीधप

प्रत्येक नाटक सगळंच सोप्प करून सांगत नाही.
या नाटकातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या दृष्टीने वास्तवात घडत नाही पण नाटकातल्या व्यक्तिरेखा ह्या सतत वास्तव जग आणि कल्पनेचं, अदभुतातलं जग अश्या दोन पातळ्यांवर जगत असतात. प्रत्येकाच्या मारल्या गेलेल्या आशा आकांक्षा अश्या रितीने प्रगट होतात.
बाकी बरंच आहे या नाटकाबद्दल सांगण्यासारखं पण आत्ता वेळ नाही.

आणि जनोबा रेगे.. अहो तुम्ही खर्‍या नावाने जरी बोंबाबोंब केलीत ना तरी आळेकरांना आणि इतर कुणालाही काही फरक पडत नाही वा नाटकाचे महत्व कमी होत नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आनंदयात्री's picture

5 Mar 2009 - 9:45 am | आनंदयात्री

>>आणि जनोबा रेगे.. अहो तुम्ही खर्‍या नावाने जरी बोंबाबोंब केलीत ना तरी आळेकरांना आणि इतर कुणालाही काही फरक पडत नाही वा नाटकाचे महत्व कमी होत नाही.

=)) सहमत आहे.

अवलिया's picture

5 Mar 2009 - 10:44 am | अवलिया

>>आणि जनोबा रेगे.. अहो तुम्ही खर्‍या नावाने जरी बोंबाबोंब केलीत ना तरी आळेकरांना आणि इतर कुणालाही काही फरक पडत नाही वा नाटकाचे महत्व कमी होत नाही.

=))

आज बाई ख-या अर्थाने मिपाकर झाल्या.. खणखणीत.. :)

--अवलिया

नीधप's picture

5 Mar 2009 - 9:42 am | नीधप

खरोखर नाटकाबद्दल समजून घ्यायचे असल्यास गौरी रामनारायण ने नाटकाबद्दल जे लिहिलंय ते इथे वाचा.
http://www.hinduonnet.com/thehindu/2001/06/17/stories/09170352.htm
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मनिष's picture

5 Mar 2009 - 10:37 am | मनिष

मला खरच समजावून घ्यायचे होते हे नाटक... (आणी दुर्बोध असले तरी मला किळसवाणे नाही वाटले, आणि माझ्या बायकोलाही नाही. काही वेळेस उग्र भाषा ही त्या संहितेची गरज असते.) दुव्यबद्दल शतशः धन्यवाद 'नी' (नाव नाही माहित मला). पुस्तकही मिळवून वाचेन ह्या वीकांताला. (भारतात रहायचे काही फायदे! :))