आमची प्रेरणा अदितीताईंची सुरेख कविता अंमळ
तुझ्या बुटांच्या वासाने ही होते मळमळ
इथे अता मज उभे राहणे अशक्य केवळ
पुन्हा पाहिले, कोष्टकात , हुकली तारीख
घरी सांगणे, लक्ष लागणे, कठीण अंमळ...
विग लावला वरून जरी हा खोटाखोटा
कथा समजली तुझे कुणी हे केले जावळ
अवचित आले तात तिचे ते दारावरती
दार उघडता माझी झाली किती धावपळ
क्षणाक्षणाला पडते आहे काव्य इथे बघ
'केश्या" मेल्या तुझी अता मग आहे चंगळ
--केशवसुमार
( २५ फेब्रू. २००९,
माघ अमावास्या, शके १९३०)
प्रतिक्रिया
25 Feb 2009 - 3:33 pm | लिखाळ
मस्त :)
१,२,४ खास
-- लिखाळ.
25 Feb 2009 - 3:35 pm | अनिल हटेला
लगे रहो !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Feb 2009 - 8:19 pm | चतुरंग
पुन्हा पाहिले, कोष्टकात , हुकली तारीख
घरी सांगणे, लक्ष लागणे, कठीण अंमळ...
विग लावला वरून जरी हा खोटाखोटा
कथा समजली तुझे कुणी हे केले जावळ
हे एकदमच खास!! =)) =))
चतुरंग
25 Feb 2009 - 11:09 pm | प्राजु
एकदम ठोकलाच की हो!
सह्हीच जावळ, तारीख... मस्तच.
भरपेट हसले.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Feb 2009 - 11:59 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणी प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार.