एक शंका

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
9 Feb 2009 - 4:37 pm
गाभा: 

नुकतेच सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी केले. वाहतूकदारांनी देशव्यापी संप करून सरकारला हे करायला भाग पाडले. पेट्रोल , गॅस चे भाव कमी झाल्याकारणाने रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे कमी केल्याची बातमीही वर्तमानपत्रात अलिकडेच वाचली. पण हे मुंबईच्या हद्दीबाहेर. मुंबईतल्या जनतेचे काय ?
एरवी पेट्रोल-डिझेल महागले सांगून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तातडीने वाढवणार्^यांनी पेट्रोल-डिझेल सवस्त झाल्याकडे सोयीस्कर डोळेझाक का केली ? कच्चा माल महागला म्हणून एकदा वाढलेले भाव नंतर कच्चा माल स्वस्त झाला की कमी का होत नाहीत ?
२३ जानेवारीच्या लोकसत्तेत याच विषयावर एक कार्टून छापून आलं होतं...

एकीकडे आर्थिक मंदीच्या नावाने बोंबाबोंब करणारे दुसरीकडे आयपीएल मध्ये कोटींमध्ये खेळतात. अनेक तरूण नोकरी गमावायच्या परिस्थित असताना , कोंबड्यांच्या झुंजींसारख्या खेळाडूंच्या झुंजी लावून स्वतःच्या तुंबड्या भरतात. किती विरोधाभास आहे, एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी, नोकरी गमावणारे तरूण, आणि कोटींमध्ये लोळणारे क्रिकेटपटू.

प्रतिक्रिया

दशानन's picture

9 Feb 2009 - 4:42 pm | दशानन

मी जगलो.. मी मेलो फरक कुणाला सामान्य सामान्य म्हणत म्हणत मलाच भिकारी केलं !
तेल वाढलं.. तेल उतरलं .. पैसा कमवला कुणी .. गमवला कुणी !
असल्याचे नव्हते झाले तरी... कुठे तरी पैशाचा पाऊस पडला..
त्यातले दोन ठेंब माझ्या पदरात आले आले.. जरा गोळा झाले म्हणू पर्यंत चार ठेंब वाळून गेले !

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

मराठी_माणूस's picture

10 Feb 2009 - 7:53 am | मराठी_माणूस

किती विरोधाभास आहे, एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी, नोकरी गमावणारे तरूण, आणि कोटींमध्ये लोळणारे क्रिकेटपटू.

ह्या विरोधाभासा मागचे कारण , असंवेदशीलता. क्रिकेट साठी वेडे होणारे शौकीन स्वतः जे अन्न ते खात आहेत ते पिकवणार्‍या शेतकर्‍याचा कधीही विचार करत नाहीत. एखादा क्रिकेटचा सामना चालु असताना आजुबाजुला नेहमी जोरजोरात चर्चा ऐकु येतात तशा कधीही शेतकर्‍यांच्या आत्महत्त्ये संबंधात येत नाहीत.

महेंद्र's picture

10 Feb 2009 - 7:59 am | महेंद्र

क्रीकेट हा एक कळीचा मुद्दा आहे त्यावर काही कॉमेंट्स करणे हे भगवदगितेवर कॉमेंट्स करण्यासारखे आहे भारतामधे.

म्हणुन मी आपले कॉमेंट्स करण्याचे अधिकार राखुन ठेवित आहे. नंतर अभिप्राय देइन.

सिद्धेश's picture

10 Feb 2009 - 11:49 am | सिद्धेश

शरद पवार आपले क्रुषीमंत्री. त्यांची संपत्ती १००कोटींच्या वरती. त्यांनी सगळी संपत्ती शेतकर्यांना दान केली तरी कितीतरी शेतकर्यांची परिस्थिती सुधारेल.
मला कळत नाही की आपण पाश्च्यात्यांच्या वाईट गोष्टींचेच अनुकरण का करतो.
बिल गेट्सने त्याची ३८कोटी डॉलर्स संपत्ती मागच्या वर्षी होतकरु संस्थांना , शाळांना,
आश्रमांना दान केली. त्यामुळे तो सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत २नंबरला गेला.
१नंबरला असलेल्या वॉरेन बफेनेसुद्धा ७२कोटी डॉलर्स दान केले.
माझ्या मते आपण त्यांच्याकडून या गोष्टी घेणे गरजेचे आहे. पब आणि तत्सम गोष्टी नव्हे.

मराठी_माणूस's picture

10 Feb 2009 - 1:00 pm | मराठी_माणूस

लोकं 'साहेबांच्या' दानती पेक्षा त्यांच्या राजकीय हुशारीवरच खुष आहेत.