तोतयांचे बंड!!!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
3 Feb 2009 - 11:51 pm

मंडळी, गेल्या दोन दिवसांत मिपावर एक महत्वपूर्ण घटना घडली......
तुमच्या लक्षांत आलीये का?

या दोन दिवसांत मिपावर एकंदर सहा (चूभूद्याघ्या) विडंबनं सादर झाली....

धनंजयने "धुकट सकाळ" लिहिली त्यावर बेसनलाडवाचं "फुकट सकाळ" हे विडंबन आलं. सूपर्ब लिहिलंय!!

हा खरा ट्रिगर पॉईंट!:)

मग शीतलची "म्हणजे..." ही कविता आली.....
हिते म्हणजे(...) काय ज्ञानेश्वरीवर विवेचनं यावीत तशी चोहोदिशांतून विडंबनं येऊन कोसळली!!!!
बेसनलाडू आणि केशवसुमार या नेहमीच्या यशस्वी कलाकारांची विडंबनं तर आलीच, पण पिवळा डांबिस आणि छोटा डॉन यांनीही हात धुवून घेतले!!!!

विडंबनांचे पाणी एव्हढे उदंड जाहले की अवलियालाही "कोणासाठी कोण बरे मिपाचा खर्डेकरी" लिहायची सुरसुरी आली. (कोण रे तो दात काढून हसतोय? "कार्टं" असणार ते!!!! जास्त हसशील तर पुन्हा प्रेमभंगाची रेकॉर्ड लावीन हां, सांगून ठेवतोय!!!:))

इतकी विडंबनं आणि इतक्या थोड्या कालावधीत? ते ही आधी न ठरवता?

फालतू कौलांना, अर्थशून्य धाग्यांना, वितंडवादी काथ्याकूटांना वैतागलेल्या असंतोषाचा स्फोट झाला!!!!!

"काळोखाचे तट कोसळले,
चिरा चिरा ढळला...":)

"तोतयांचे बंड"च की हो हे!!!!

म्हणजे विडंबन हे मूळ कवितेची तोतयेगिरी म्हणून तर आहेच.....
पण जरा या सगळ्या विडंबनकारांची नांवं बघा....

बेसनलाडू!
अवलिया!
केशवसुमार!
पिवळा डांबिस!
छोटा डॉन!!!

सगळे साले टोपणनावांने लिहिणारे!!!!
हे पण तोतयेच की!!!!:)

या सगळ्या गर्दीत ते आमचं चतुरंग वारू कुठं दिसलं नाही! गल्ली चुकलं वाटतं बिचारं!!!! "कच्चा माल" शोधत फिरत होतं, आणि याला ह्यो डोळ्यासमोरचा कच्चा माल दिसेना!!!!:)

आता आमची मिसळपावच्या चालकांना विनंती...

१. यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा.
२. सर्व सभासदांनी शीतलला आता (ज्ञानेश्वरमाऊलीच्या चालीवर) "शीतलमाऊली" म्हणून संबोधावे!!!!:)
३. अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!!:)

अर्थात हे सर्व तरच जर मिपाकारांना या घटनेची दखल घ्यावीशी वाटली तर!!!
कारण एव्हढा धुराळा उडाला पण ते कुठे यात अजूनपर्यंततरी दिसलेले नाहीत........
:)

काय मंडळी, तुमचं काय म्हणणं?

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

सर्किट's picture

4 Feb 2009 - 12:10 am | सर्किट (not verified)

२ फेब्रुवारीला ४ पेक्षा कमी विडंबने आलीत, तर हिवाळा आणखी सहा आठवडे चालणार, अन्यथा लवकर उन्हाळा येणार !

(संदर्भः ग्राउंडहॉग डे, योगायोगाने २ फेब्रुवारीलाच)

-- सर्किट

संदीप चित्रे's picture

4 Feb 2009 - 12:10 am | संदीप चित्रे

पिडाकाका,
ही सगळी विडंबनं गेल्या दोन दिवसांत आली ते पटकन लक्षात आलं नव्हतं.
ग्लेन्फिडिश आत्ताच पोस्टून आलो; मिळाली की /तर कळवा ;)

शितल's picture

4 Feb 2009 - 12:10 am | शितल

>>>कोण रे तो दात काढून हसतोय? "कार्टं" असणार ते!!!! जास्त हसशील तर पुन्हा प्रेमभंगाची रेकॉर्ड लावीन हां, सांगून ठेवतोय!!!)
=))
काका,
दंडवत तुम्हाला.. :)
बाकी त्या म्हणजे वरची सर्वच विडंबने मला माझ्या कविते पेक्षा ही आवडली. :)

>>>अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!!

बचके रहेना मॉगता है इन लोगोंसे.. :)
(कविता लिहिली की पहिला ह्यांनाच वाचायला द्यायला हवी की विंडबन करणार आहात का ते विचारायला ) ;) (ह्.घ्या.)
यशो,
पिडा काका..मालवणी बोलण्यास विसरलो ग... ऐकतेस ना बाय माझी...

यशोधरा's picture

4 Feb 2009 - 12:20 am | यशोधरा

ओ काका, तुमी हरल्यात हां!! :))))
ऐकलय गो शीतल! थ्यांक्यू!!

ह्म्म... बरां, बरां, हो लेख एक अपवाद तुमी म्हटल्यानुसार...

विसोबा खेचर's picture

4 Feb 2009 - 12:25 am | विसोबा खेचर

यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा.

मंजूर...! :)

अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!!

ऑ?? बरं बरं! बाटली पाठवली जाईल.. :)

आपला,
(अनुष्का आणि ग्लेनमोरांजीचा पागलप्रेमी) तात्या.

आपला अभिजित's picture

4 Feb 2009 - 12:30 am | आपला अभिजित

यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा.

कबूल!
कबूल!!
कबूल!!!

प्राजु's picture

4 Feb 2009 - 12:42 am | प्राजु

बोला डांबिस्काका वरदा अवऽऽऽऽ लिया,
शितलमाऊली....छोऽऽऽऽटा डॉन...
श्री केसुमहाऽऽराऽऽज की जय! :)

बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम...
पंढरीनाथ महाराज की जय! ........... या चालीत वरील आळवावे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Feb 2009 - 1:10 am | बिपिन कार्यकर्ते

आयला, हे मस्तच.

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

4 Feb 2009 - 2:32 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

टारझन's picture

4 Feb 2009 - 7:54 am | टारझन

असेच असेच ,
डँबो काका .. बाकी ते कौल धागे काथ्याकुट वाली लाईण लैच आवडली आं .. गहरी सच्चाई हय उसमे

- केशरी डांबीस

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Feb 2009 - 12:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डँबो काका .. बाकी ते कौल धागे काथ्याकुट वाली लाईण लैच आवडली आं .. गहरी सच्चाई हय उसमे

सहमत. फडतूस कौलं, काथ्याकूटं टाकण्यापेक्षा या लोकांनी चांगली विडंबनं वाचावीत.
आणि विडंबकांच्या यादीत आता बिकांचे नावही जोडावे. नियमाला अपवादाप्रमाणे बिकादा स्वतःच्या नावानेच लिहितो.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Feb 2009 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते

अपवादानेच नियम सिद्ध होतो, असं कायसंस कोणीसं म्हणून गेलंय.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

4 Feb 2009 - 7:06 am | सहज

रंगाशेठ व आंद्याटुकार यांनी आपापल्या प्रवेशिका पाठवल्या असत्या तर १००% अणूमोदन! अजुनही त्यांनी आजच्या आज पाठवाव्यात ही विणंती.

छोटा डॉन's picture

4 Feb 2009 - 7:15 am | छोटा डॉन

>>इतकी विडंबनं आणि इतक्या थोड्या कालावधीत? ते ही आधी न ठरवता?
हाव ना राव, हे मात्र खरोखरीच आश्चर्य आहे.
अचानक कसा काय किडा आला कुणास ठाऊक ? कदाचित सर्कीटशेठ म्हणतात तसे "ग्राउंडहॉग डे" चा प्रभाव असेल.

पण काही का असेना, ज्याम मज्जा आली, अफाट हसलो, आख्खा दिवस मस्त गेला.
आमचे एक सोडा ( म्हणजे सोडुन द्या, ग्लेनफिडीच मध्ये घालायचा आहे तो नव्हे ) हो पण "गुरुदेवांचे" विडंबन काय होते, जबर्‍याच ..!

बाकी रंगाशेठ आणि यात्रीला ह्या गोंधळात मिस्स केले, अजुनही वेळ गेली नाही म्हणा, येऊ द्यात काहीतरी फर्मास ..!

>>यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा.
मस्तच ....!
आयला खरचं असली काहीतरी टुम काढा राव, मज्जा येईल.

>>अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक >>ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!!
जयऽऽऽऽऽ होऽऽऽऽ ....!

------
(तोतया)छोटा डॉन

विसोबा खेचर's picture

4 Feb 2009 - 7:59 am | विसोबा खेचर

अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!!

हम्म! आम्ही डांबिसभावजींच्या प्रस्तावावर विचार केला परंतु उत्तेजनार्थ बक्षिसाकरता कुणाचे ग्लेनफिडिचचे लाड करणं तूर्तास तरी मिपाला परवडणारे नाही. सबब, ग्लेनफिडिच ऐवजी एकेक गावठी दारूचा फुगा देण्यात येईल! :)

प्या लेको आणि व्हा पिऊन लास! :)

तात्या.

छोटा डॉन's picture

4 Feb 2009 - 8:06 am | छोटा डॉन

सबब, ग्लेनफिडिच ऐवजी एकेक गावठी दारूचा फुगा देण्यात येईल!
प्या लेको आणि व्हा पिऊन लास!

=)) =)) =))
फु ट लो ...!
बरं बरं, काही हरकत नाही, चालेल ..!

एक शंका :
चकणा मिपाकडुन दिला जाईल की आमच्या आम्हाला "भाजलेले शेंगादाणे, लोणच्याची फोड, कांदा-लिंबु" वगैरे जमवावे लागेल ?
बिडीचे बंडल सोबत मिळेलच ना ?

------
छोटा डॉन

शेखर's picture

4 Feb 2009 - 9:39 am | शेखर

>>कणा मिपाकडुन दिला जाईल की आमच्या आम्हाला "भाजलेले शेंगादाणे, लोणच्याची फोड, कांदा-लिंबु" वगैरे जमवावे लागेल ?

चकणा म्हणुन माझ्या कडुन मीठ दिले जाईल.

शेखर

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Feb 2009 - 12:31 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या!!!

अरे हाय काय अन नाय काय.... एक ग्लेनफिडिश माझ्या कडून स्पॉन्सर. बाटली तयार आहे. पण लवकर घेऊन जा ब्वॉ. मी संपवायच्या आत. ;)

बिपिन कार्यकर्ते

मीनल's picture

4 Feb 2009 - 8:14 am | मीनल

विडंबन दिन...
मस्त आयडिया आहे.

मीनल.

अवलिया's picture

4 Feb 2009 - 9:32 am | अवलिया

विडंबनांचे पाणी एव्हढे उदंड जाहले की अवलियालाही "कोणासाठी कोण बरे मिपाचा खर्डेकरी" लिहायची सुरसुरी आली.
कसचं कसचं... खरडलेय काहितरी आपलं

(कोण रे तो दात काढून हसतोय? "कार्टं" असणार ते!!!! जास्त हसशील तर पुन्हा प्रेमभंगाची रेकॉर्ड लावीन हां, सांगून ठेवतोय!!!)
खी खी खी..... हाणाच त्या कार्ट्याला ... सारखा मागे लागतो... पिरेमबंगाची कथा लिहि लिहि.... च्यामारी कुणाला काय आवडेल सांगता येत नाही.

१. यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा.
सहमत

२. सर्व सभासदांनी शीतलला आता (ज्ञानेश्वरमाऊलीच्या चालीवर) "शीतलमाऊली" म्हणून संबोधावे!!!!
जशी आज्ञा गुरुदेव....

शीतल माउली नमो नमः।

३. अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!!
हा हा हा... ह्ये लई ब्येस....
(तात्या पाठवतोय... वाट बघा... अर्धी काढुन पाणी भरुन पाठवेल तो.. त्याला लिबर्टी आहे म्हणे तशी ;) )

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

दशानन's picture

4 Feb 2009 - 11:22 am | दशानन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

२ फेब.
विडंबन डे !

कबुल कबुल कबुल !!!!!!!

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

ब्रिटिश's picture

4 Feb 2009 - 12:42 pm | ब्रिटिश

जल्ला मस्तच लीवलय पीवला दादुस !

बाकी ते ग्लेन्फिडिश क काय ते दारुच नाव आस्तं व्हय ? मना तर ' क्वार्टर ' ह्ये यकच दारूच नाव म्हाइतेय

फक्त क्वार्टर पीनारा. मंग ती कोडचीपन आसूदेत
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

सागर's picture

4 Feb 2009 - 7:51 pm | सागर

१. यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा.

असहमत....

माझ्या जन्मदिवसाचे विडंबन होवू नये असे वाटते.... [कारण मी (स्वयंघोषित)कवी आहे... ;) ]
विडंबने मी नाही लिहित..... तेव्हा माझा तरी विरोध आहे....

कवी दिन साजरा करणार असाल तर १००% पाठींबा... :)

(कवी) सागर
अवांतरः २ फेब्रुवारी हा "शकीरा"चा पण वाढदिवस असल्याने... विडंबन आणि तिचे ठुमके विसंगत दिसतील..... :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Feb 2009 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पण तरीही विडंबन-दिनाच्या संकल्पनेला पाठींबा.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

शुभेच्छांबद्दल धन्यवाद आदिती...

पण तरीही विडंबन-दिनाच्या संकल्पनेला पाठींबा.

माझाही पाठींबा आहे. पण दिवस दुसरा शोधावा एवढीच इच्छा :)
(कवीमनाचा ) सागर

स्वप्निल..'s picture

5 Feb 2009 - 1:14 am | स्वप्निल..

आता विडंबन दिनापेक्षा विडंबन सप्ताह घोषीत करावा लागेल असं दिसतेय...

स्वप्निल