धवलगिरीच्या हिमशिखरांतुन सह्याद्रीच्या उंच कड्यांतुन
गंगा-यमुना-गोदावरीच्या शुभ्र स्फटिकसम शीत जलातुन
घोष एक हा घुमू लागला जय जय भारत ! जय जय भारत !
भेदातीत गर्जना होतसे जय जय भारत ! जय जय भारत !
सूप्त अग्नि तो फुलून उठला क्रांतीच्या कुंडात प्रकटला
पाश तोडण्या परदास्याचा तृतिय नेत्र शंकरे उघडिला
पितृभूमी ही मुक्त कराया सुपुत्र रणसागर हा आला
कोटिकंठरव कानी येई जय जय भारत ! जय जय भारत !
स्वप्राणांच्या असंख्य ज्योती स्वयें अर्पिल्या या देशाप्रति
निर्भय योद्धे रणात पडले देउनि निज प्राणांच्या आहुति
क्रांतिवीर ते अमर जाहले विसरुनि घर अन् विसरुनि नाती
तख़्तावरही गर्जुन गेले जय जय भारत ! जय जय भारत
आज कुठे ते सुतत्व जावे? का स्वार्थी तांडव चालावे?
फुकाच आम्ही आज कशाला स्वतंत्र आम्हा म्हणवुनि घ्यावे?
उठा बंधु हो ! करा प्रतिज्ञा, स्वराज्य माझे सुराज्य व्हावे !
एक मंत्र हा चला जपूया जय जय भारत ! जय जय भारत !
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 12:55 am | विसोबा खेचर
सुरेख कविता..!
जय हिंद..!
तात्या.
26 Jan 2009 - 1:01 am | विकास
कविता मस्तच आहे!
आज कुठे ते सुतत्व जावे? का स्वार्थी तांडव चालावे?
फुकाच आम्ही आज कशाला स्वतंत्र आम्हा म्हणवुनि घ्यावे?
एकदम भावल्या...
मात्र अशी कविता कोणास दाखवली आणि त्यांनी विचारले की कवी कोण तर "आचरट कार्टा" असे सांगताना कसेसेच वाटेल. असली कविता लिहीणारा आचरट कसा असेल किमान त्यावेळेस...शक्य झाल्यास अजून एखादे चांगले टोपणनाव घेऊन अशा कविता लिहाव्यात असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो...
26 Jan 2009 - 10:58 am | दशानन
कविता अत्यंत सुंदर आहे... खुप आवडली !!!
मात्र अशी कविता कोणास दाखवली आणि त्यांनी विचारले की कवी कोण तर "आचरट कार्टा" असे सांगताना कसेसेच वाटेल. असली कविता लिहीणारा आचरट कसा असेल किमान त्यावेळेस...शक्य झाल्यास अजून एखादे चांगले टोपणनाव घेऊन अशा कविता लिहाव्यात असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो...
बरोबर. सहमत आहे.
अहो तुमच्या सारख्या प्रतिभावान व्यक्तीने चांगलंच टोपणनाव घ्यावे ह्याला माझे पण अनुमोदन आहे... अहो हे कार्ट वैगरे आम्हालाच शोभतं हो.. ;) आम्ही उडानट्प्पु ! त्यामुळे तुम्ही एखादे चांगले नाव धारण करावे ही विनंती... बाकी एकाच घरात ( ३-४ कार्टे असणे घराच्या वातावरणासाठी चांगले नाही :D )
आद्य कार्टा !
जैनाचं कार्ट
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 1:09 am | प्राजु
कविवर्य वि वा शिरवाडकरांच्या
माझा हिंदुस्थान .. माझा .. माझा हिंदुस्थान
हिमाचलाचे हिरक मंडित शिरभूषण भरदार
वक्षावर गंगा जमुनांचे रूळती मौक्तिक हार
कटिस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान.. माझा .. माझा हिंदुस्थान..
या कवितेची आठ्वण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/