माझ्याकडेही कार आहे?

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
15 Jan 2008 - 12:34 am

काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो.
त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला. त्यामुळे पांढरी इंडिका दिसली की लोक म्हणतात कॅब आहे.

तसेच जेव्हा मारुती ने स्विफ्ट गाडी बाजारात आणली तेव्हा तिचा आकार बघून मला एवढी खास नाही वाटली. मनात आले, आपल्याकडे गाडी आहे म्हणण्यात जी (थोडीथोडकी का असेना) शान वाटावी ती ह्या गाडीत वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे. लोकांचे म्हणणे होते की ही गाडी मस्त आहे. (हळू हळू मग त्यातील नकारात्मक गोष्टीही समोर आल्यात ही बाब ह्या लेखात नको.)

आता हे लिहिण्यामागचे प्रयोजन हे की नुकतीच टाटांनी त्यांची (एक) लाखांची गाडी आणली. त्यावरून बहुतेक लोकांचे स्वत:कडे कार असण्याचे स्वप्न पुर्ण होईल. मी ही माझ्या मित्राला म्हणालो, "चला, आता पैसे जमा करायला लागूया."

पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. (सध्या सामनावर बातमीचा दुवा मिळत नाही आहे)

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या (माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल.

अर्थव्यवहारजीवनमानराहणीविचारमतप्रतिसाद

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

15 Jan 2008 - 1:23 am | मुक्तसुनीत

तंत्रज्ञानामुळे एखादी गोष्ट पूर्वी ज्याना परवडत नव्हती त्याना परवडायला लागली , म्हणून तुमचा त्या गोष्टीतला आनंद कमी का व कसा होतो हे कोडे काही मला उलगडले नाही. तुम्हाला "माझी गाडी आहे" असे म्हणावेसे वाटते आणि आपल्या स्वतःच्या गाडीचा आनंद घ्यावासा वाटतो यात काहीच गैर नाही. पण केवळ तीच गाडी रिक्षावाल्याना परवडते म्हणून "धक्का बसत" असेल तर तुमच्या मानसिकतेकडे एकदा तुम्ही फिरून पहायला हवे ; नाही का ?

मोबाईल, कार या गोष्टी सर्वसामान्याना सहज उपलब्ध होतात याचा अर्थच "टेक्नॉलॉजी ऍट वर्क" असा आहे. पण ही तर केवळ अगदी छोटीशी सुरवात आहे. खरा विकास तेव्हा होईल जेव्हा पायाभूत सुविधा सर्वाना सहज मिळतील; परवडतील. तशा त्या मिळायला लागल्या तर आपल्या स्वतःच्या "स्टेटस्"बद्द्ल तुम्हाला असुरक्षित वाटेल काय ?

देवदत्त's picture

15 Jan 2008 - 1:59 am | देवदत्त

तुमच्या मानसिकतेकडे एकदा तुम्ही फिरून पहायला हवे ; नाही का ?
सहमत. मला असे वाटले म्हणुनच मी इथे लिहिले. आणखी एखाद्याचे मत कळेल. :)
माझा आनंद कमी झाला असे नाही. मला गाडी घ्यावीशी वाटेल तेव्हा मी नक्कीच घेईन. बहुधा इंडिका किंवा नॅनोच घेईन.

माझे म्हणणे असे नाही की ती रिक्षावाल्यांना परवडायला नको. तो मस्त फायदाच आहे. आधी ही टॅक्सी होत्या त्या प्रिमिअर पद्मिनीच्या होत्या. आताही आहेत. पण म्हणून कोणी त्या खाजगी वापरात घेणे बंद नाही केले. मलाही तसे नाही वाटले.

मी हे लिहिले त्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट नेहमीची झाली तर मग त्यात काही खास वाटत नाही.
टेक्नॉलोजी चा फायदा मी ही भरपूर घेतोच. मला त्यात आनंदच वाटतो. (ह्यावर मी वेगळा लेख लिहिणारच आहे). फक्त आपण जे म्हणतो ना अरे ही गोष्ट तर काय आता सर्वांकडेच आहे त्यातला हा प्रकार आहे. :)
तरी जरी बहुतेकांकडे कार आल्या आहेत तरी अजून ही कार घेणे हे बहुतेकांकरीता स्वप्नच आहे.

ह्यातून मला वाटत नाही की मी काही वाईट किंवा विचित्र लिहिले आहे.
असो, आपली प्रतिक्रिया ही बरोबरच आहे. फक्त मला हलक्या मानसिकतेचा न समजावे ही आशा. ;)

इनोबा म्हणे's picture

15 Jan 2008 - 3:28 am | इनोबा म्हणे

देवा! अगदी बरोबर बोललास ...आपल्याकडे लोकांना अशा सवयी आहेत हे खरे...
मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!तिळगुळ घ्या,गोड गोड लिहा...

(डायबेटीस झाला तरी चालेल) -इनोबा

मुक्तसुनीत's picture

15 Jan 2008 - 3:47 am | मुक्तसुनीत

तुमच्या स्पष्टीकरणाकरिता धन्यवाद.

माझा आक्षेप केवळ आपल्या सर्वांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेतील काही विसंगतींबद्द्ल होता. तुमचे लिखाण वाईट किंवा विचित्र आहे असे मी म्हण्टले नाही. व्यक्तिश: तुमची मानसिकता "हलकी" आहे असेसुद्धा मी कुठे सूचित केले नाही.

धन्यवाद.

देवदत्त's picture

15 Jan 2008 - 9:55 am | देवदत्त

ही ही
गैरसमज नाही आहे.
मला माहीत आहे की ह्यातून काही विसंगती आढळते. हे विचार माझे म्हणून लगेच नाही आलेत. जे काही आधी ऐकले व अनुभवातून पाहिले त्याचे हे एक रूप. :)

नंदन's picture

15 Jan 2008 - 8:59 am | नंदन

म्हणजे तुम्ही एकदा लाईफबोटवर आलात की इतरांनी येऊन तिथे गर्दी करु नये असे वाटणे (किंवा तसा प्रयत्न करणे). कुठल्याही गोष्टीप्रमाणेच जर हिचा अतिरेक झाला तर ती विकृतीत जमा होते हे जरी खरं असल; तरी आपलं 'पेशल स्टेटस'/वेगळेपणा कमी होणं याची बोच कुठेतरी माणसाला लागते हेही खरं. 'आजकाल जो उठतो तो ____' अशा स्वरुपाची वाक्यं (गाळलेल्या जागांत - डॉक्टर बनतो असं डॉक्टरांनी म्हणणं, अमेरिकेला येतो असं अनिवासी भारतीयांनी म्हणणं, सिंगापूर फिरून येतो असं दहा-वीस वर्षांपूर्वी तो दौरा करून आलेल्याने म्हणणं) याच गोष्टीची निदर्शक आहेत.

अर्थात, यातून अशा वृत्तीचं समर्थन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं हा हेतू नाही, पण 'फ्लेश इज वीक' असल्यानं मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या विचारप्रक्रियेत अशा विसंगती कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असतातच.तुम्ही या लेखांतून जशी ती प्रामाणिकपणे समोर मांडली ते कौतुकास्पद आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

देवदत्त's picture

15 Jan 2008 - 3:23 pm | देवदत्त

यातून अशा वृत्तीचं समर्थन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं हा हेतू नाही.
समर्थन किंवा विरोध करण्याचा माझाही हेतू नाही.

"आजकाल जो उठतो तो ____"
ही ही... अहो मोबाईल ही त्याच वर्गात मोडला गेला आता.

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 9:04 am | विसोबा खेचर

पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत.

मस्त कल्पना आहे...:)

तात्या.

नंदन's picture

15 Jan 2008 - 9:06 am | नंदन

असं झालं तर 'टाटा करुन आलो'चा अर्थ बदलेल की ;)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सहज's picture

15 Jan 2008 - 10:24 am | सहज

:-)

मस्त!!

ऋषिकेश's picture

15 Jan 2008 - 8:20 pm | ऋषिकेश

:-)))))))))
हा हा हा.. लई झकास नंदन!

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 8:46 pm | विसोबा खेचर

असं झालं तर 'टाटा करुन आलो'चा अर्थ बदलेल की ;)

नंदनशेठ, मस्त रे! :)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jan 2008 - 9:17 am | llपुण्याचे पेशवेll

या प्रवृत्तीचे वर्णन पु.ल. सुंदर करतात.. हल्ली काय पट्टेवाले सुधा कॉलेजात जातात.... हे ते वाक्य... पण काही म्हणा लो़कहो या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टि शक्य झाल्या आहेत. तसेच भारताची धावती अर्थव्यवस्था अनेक लोकाना परदेशात जायची संधी देत आहे.. त्यामुळे पूर्वी मध्यमवर्गीय माणसाला अशक्य वाटणार्‍या लॅपटॉप आणि इतर अनेक गोष्टी आता घेणे शक्य झाले आहे.. अमेरीकेत या गोष्टी स्वस्त मीळतात ना...
-(अमेरीकेत आलेले)पुण्याचे पेशवे

शिल्पा ब's picture

23 Jul 2010 - 11:29 pm | शिल्पा ब

<<<(अमेरीकेत आलेले)पुण्याचे पेशवे

आपण अमेरिकेत आल्याची दाखल घेतली आहे.
बाकि अमेरीकेत कुठे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

स्वयम्भू's picture

15 Jan 2008 - 3:39 pm | स्वयम्भू (not verified)

तुम्हाला गाडी आवडली असेल तर घेउन टाका. ती गाडी भाडे-तत्वावर वापरली जाते का ह्याचा वीचार नका करू अन्यथा पन्चाईत होइल. कारण परदेशात टोयोटा कोरोल्ला पासुन ते मर्सीडीज बेन्झ पर्यन्त सगळ्या गाड्या टैक्सी म्हणून वापरल्या जातात. अहो चक्क वीमाने सुद्धा भाड्याने मीळतात, तीथे नॅनो चे काय घेउन बसलात.

गाडी आवडली असेल तर घेउन टाका नी सहकुटुम्ब धमाल करा.

आपला,

स्वयंभू

देवदत्त's picture

15 Jan 2008 - 3:54 pm | देवदत्त

अहो, गाडी घ्यायची आहेच. त्या बातमीने गाडी घेण्याच्या इच्छेवर परिणाम होणार नाही.
मी फक्त एक विचार लिहून दाखवला.
नाही तर मला जगणे ही सोडावे लागेल. काय ते सर्वांसारखे जगणे म्हणून ;)

(मी लेखाला सुरूवात केली होती ती अवांतर विचार म्हणून. तरीही त्यात गंभीरता आली. )

ब्रिटिश टिंग्या's picture

15 Jan 2008 - 8:39 pm | ब्रिटिश टिंग्या

आपण जसं भाजीवाल्याकडून भाजी घेतल्यावर उरलेल्या पैशातून २-४ लिंब घेतो, तसचं आता ग्राहक टाटा सफारी वगैरे गाडी घेतल्यावर उरलेल्या पैश्यातून २-४ नॅनो विकत घेतील.

राजे's picture

15 Jan 2008 - 9:02 pm | राजे (not verified)

हा हा हा!!!! जब्रा जोक... तोच तो आपला विनोद.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

चतुरंग's picture

15 Jan 2008 - 9:35 pm | चतुरंग

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

15 Jan 2008 - 10:52 pm | मुक्तसुनीत

नर्मविनोदी कोपरखळ्या ! :-)

अभिज्ञ's picture

24 Jul 2010 - 9:10 am | अभिज्ञ

हे वाचायचे राहूनच गेले होते.
एक से एक कार्टून्स आहेत.
कार मधून भिक मागताना दाखवणारे कार्टून उच्च.

अभिज्ञ.

संजय अभ्यंकर's picture

15 Jan 2008 - 9:44 pm | संजय अभ्यंकर

आता यच्चयावत सगळ्या कार बनवणार्‍या कंपन्याना स्वस्त कार बनवण्याचे वेध लागतील.
आपल्याकडे रस्त्यांची अवस्था पाहिल्यास, भविष्यातीला रस्तेजामला आतापासुन तयार व्हावे लागेल.

संजय अभ्यंकर

सर्किट's picture

16 Jan 2008 - 2:55 am | सर्किट (not verified)

रिक्षावाल्यांनी नॅनो घेतली, तर तुम्ही रिक्षा घ्या !

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

16 Jan 2008 - 4:15 am | मुक्तसुनीत

अँथनी गोन्साल्विस च्या भाषेत ! "आपुन एक मारा , लेकिन साला सॉलिड मारा ना !" ;-)

मितभाषी's picture

23 Jul 2010 - 5:06 pm | मितभाषी

काय झाल मग? घेतली का नॅनो.

आपुनभी लेनेवाला है, सएकंड व्हर्जन. :H

चित्रा's picture

24 Jul 2010 - 12:18 am | चित्रा

नॅनो चालवून लोकांचे काय अनुभव आहेत ते वाचायला आवडतील. :)

आमोद शिंदे's picture

24 Jul 2010 - 10:14 am | आमोद शिंदे

पुण्यात बर्‍याच पेन्शनर काकांनी नॅनो घेतली आहे. सेवा निवृत्तीनंतर फंडातले पैसे मोजून एक नॅनो आणि त्यावर ड्रायवर असा मस्त बेत पुण्यातील काकांनी केलेला दिसतो.

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2010 - 9:58 am | अप्पा जोगळेकर

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या (माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल.
कार असावी अशी इच्छा असणे आणि ती पूर्ण करणे हे ठीक आहे. पण कार असणे यात गर्व वाटण्यासारखे काय आहे? कार घेणे हे एखादे महान कार्य तर नाहीये ना?

मितभाषी's picture

24 Jul 2010 - 11:07 am | मितभाषी

कार घेणे हे एखादे महान कार्य तर नाहीये ना?

»
>>>>>
गाडीतील अ‍ॅशट्रे भरे पर्यंत गाडी बदलनार्‍या धनाढ्य लोकासाठी नसेलही पण एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी तर स्वःतची चारचाकी घेणे निश्चितच आनन्दाची बाब असणार.

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2010 - 12:11 pm | अप्पा जोगळेकर

गाडीतील अ‍ॅशट्रे भरे पर्यंत गाडी बदलनार्‍या धनाढ्य लोकासाठी नसेलही पण एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी तर स्वःतची चारचाकी घेणे निश्चितच आनन्दाची बाब असणार.

+१. सहमत आहे.
मी असं म्हटलं की त्यात गर्व वाटावा असं काही नाहीये. एखाद्याला चांगली सॅलरी मिळत असेल तर तीसुद्धा आनंदाचीच बाब आहे. अभिमानाची नव्हे. चांगली सॅलरी म्हणजे उच्च कोटीचे कर्तृत्व नव्हे.

मितभाषी's picture

24 Jul 2010 - 12:16 pm | मितभाषी

तुमच्या दृष्टीने नसेलही. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचे जिवनातील चैनीचे, गरजेचे, सुखाचे, स्टेट्स सिम्बॉलचे आडाखे वेगळे असु शकतात.

पाषाणभेद's picture

24 Jul 2010 - 11:06 am | पाषाणभेद

नैनो (तेच ते हो हिंदी भाषिक... निट उच्चारही करता येत नाही त्यांना... सुरेश ला सुरेस म्हणतात....शंकरला संकर म्हणतात....काय संकर करतात शंकरच जाणे...) तर नैनो .... आपली नॅनो म्हणायचं हो मला... आपलीच म्हणायची... कारण तिचा जन्म आपल्या पुण्यातच झाला ना? आता सासरी म्हणजे गुजरात मध्ये गेली म्हणून काय झाले? तर नॅनो ही कार आपल्याला काही परवडणार नाही. आपण तर बुवा मस्त रिक्षा घेणार. अहो नैनोमध्ये (ऐ गपे... मराठी शिकवू का?) सॉरी अहो नॅनोमध्ये किती माणसं बसतात? सांगा सांगा.. ४ च ना? म्हणजे १+३ ना? १ म्हणजे डायवर अन बाकी ३. बळजबरी केली तर १+४ चं पासिंग मिळेल तिला.

आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. या रिक्शावाल्याचा स्वभाव अन शंकरभगवान यांचा स्वभाव एकदम खटकू. नगास नग. कधी काय होईल सांगता येत नाही. कधी हात दाखवून वळेल तर कधी तिसरा डोळा मारेल.. आपलं उघडेल.. भस्म हो साक्षात भस्म. जळून राखुंडी. कधी गांजा/ भांग पिलेले डोळे तर कधी सोमरस प्राशन. असो.

तर रिक्षात पुढे ३ जण.. ग्रामिण भागात ५ जण. आता पुढे मोजा. मागे ४ जण बसतीलच. व्हा पुढेमागे. बसा खेटून. किती झाले? ७ की ९? अहो शहरी भागात ७. ग्रामिण भागात ९. पुढे मोजा. बच्चेकंपनी असेल तर मागे बाल्कनीत २ जण. सामानसुमान पायाशी. एखादी बॅग पुढे किक च्या हँडल जवळ. (काय कॉम्बीनेशन आहे. किक पायाची अन हँडल हाताचे.)

नै.नॅनो अन रिक्षाचा अ‍ॅव्हरेज सारखाच. स्पिडही सारखाच. रिक्षात वेळीअवेळी पेट्रोलचा डोस देवून रॉकेलही चालू शकते. रिक्षा हवेशीर आहे. दार खिडकी नाही. खा अन पचाक. खा अन पचाक. खा अन पचाक. अरे बस कर बाबा.

पार्किंग ला जागा कमी लागते. टर्नींग रेडीयस कमी. गल्लीबोळात जाता येते. रिक्षात लाखभर पैसे मळक्या पिशवीत ठेवले तर कुत्रेही हुंगत नाही. अन मुख्य म्हणजे ती पण आपल्या पुणे-३५ मध्येच तयार होते. बॉडी दणकट आहे. सरळ अंगावर घालता येते. गॅरेजचा खर्च कमी येतो. अ‍ॅक्शीलेटर वायर २५ रुपयात भेटते. आहे का तुमच्या नै..नॅनोचा पार्ट स्वस्त? टेप मस्त धकधक लावता येतो. झंकार नाय तर टकारा सर्कीट टाकल तर शकिराही नाचेल. वका वका. काही शक? मातीच्या मडक्यात नुसते स्पिकर ठेवा महाराज. घुंगरूही ऐकू येतील.

रिक्षा चालवत असल्याने बाकीचे वाहनधारक सहसा नादी लागत नाही. लागलाच तर आवाज चढवता येतो. परमिट घेतले तर डबल बिजनेसही करता येतो. रिक्षाच्या हुडवर जाहिरात करता येते.
आता तुम्ही सांगा त्या नै...नॅनोमध्ये आहेत काय एवढ्या सुविधा?

अहो पोरीदेखील म्हणतात, "मला रिक्षावाला नवरा पायजे...मला रिक्षावाला नवरा पायजे..."

म्हणून म्हणतो आम्ही तर एक्स्पोर्ट होणारी रिक्षाच घेणार.

- पाभे (रिक्षावाला)
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

मी ऋचा's picture

24 Jul 2010 - 12:51 pm | मी ऋचा

एकदम जोरदार!! =))

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

|आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो.

ब्रम्हा, विष्णु महेश या त्रिमुर्तीची आत्तापर्यंत पुजा करीत आलो आहे. पण मध्ये महेशाचा-शंकराचा(संकराचा) अवतार असलेली..विठ्ठला पांडुरंगा, घोड्यावरच्या देवा..आणखी काय काय पहायला लावणार आहेस रे..

अशोक पतिल's picture

25 Jul 2010 - 10:34 am | अशोक पतिल

पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत
खर सागु नॅनो ही एक कन्वरटेड रिक्षाच आहे, कार नाहीच .

साधारण अडीच वर्षांनी हा धागा वर आल्यावर त्यावर त्याच जोमाने प्रतिक्रिया पाहून बरे वाटले ;)
धन्यवाद.,,,

बाकी मी नॅनो तर नाही घेतली. पण नुकतीच 'शेव्रोले स्पार्क' गाडी घेतली. :)