शोध
बांधलेला आहे गुलाम अवघा समाज
त्यांच्या कासरा नसलेल्या दावणीला,
रक्ताचे पाट वाहत आहेत डोळ्यातुन
पण त्याचा पत्ता लागत नाही पापणीला !
छप्पर उडुन गेल्यावर
आधार देणारे स्तंभ कोसळुन पड्तील
जमीन मात्र तीच राहील
फक्त नात्याचे संदर्भ बदलुन जातील !
प्रुथ्वी पुन्हा फिरत राहील
घड्याळाच्या काट्यासारखी अनन्त कालापर्यंत
आणी माणुस हातात अण्वस्त्र घेउन फिरत राहील
हरवून गेलेल्या माणुसकीचा !
<अनिरुद्ध>