( निवडणुकीचा एक दिवस )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
12 Jan 2009 - 1:28 pm

ज्ञानदा कुलकर्णीं यांची एक दिवस ही सुंदर कविता नव्या रुपात

निवडणुकीचा एक दिवस ...
लढु द्या मला मतांसाठी...

तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या प्रभागातले बुथ लुटण्यासाठी
तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या विरोधकांवर कुरघोडीकरण्यासाठी

मी नसेन आता एकटा
काही पाचेक वर्षांसाठी
दुसरे कोणीही असले सोबत
'ते' मंत्रीपद उपभोगान्यासाठी

इच्छा नाही मला त्या नंतर
समाजसेवा करण्याची इतरांसाठी
इच्छा नाही मला share करण्याची
ते टेंडर कोणाही सोबत
जे मी lock केले असतील बिल्डरांसाठी

पण
आता थोडीच वाट पहायची मला
त्या दिवसाची
आता प्रत्येक अपक्ष मिळवायचा आहे मला
फ़क्त अणि फ़क्त सत्तेसाठी

अमोल
------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

विडंबन