रिक्त
=========================
.
.
काही शब्द.. नुसते,
आतल्या आत उकळत राहतात..
उतूच जात नाहीत.
रटरटत्या पाण्यासारखे..
नुसती वाफ होत राहते..
साठलेल्या भावांची..
चरचरत..
शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत.
पात्राला फक्त जाणवत राहत..
रिक्त होण्या आधीच..
वाफाळ रटरटणं..!
.
.
=========================
स्वाती फडणीस ..... ११-०१-२००९
प्रतिक्रिया
11 Jan 2009 - 10:33 pm | प्राजु
भावनांचं जळणं म्हणतात ते हेच असावं बहुधा.
छान शब्दबद्ध केलं आहेस.
मनाला पात्राची उपमा सह्ही...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Jan 2009 - 11:03 pm | शंकरराव
शब्दांची पिडा कवीतेत जाणवते
11 Jan 2009 - 11:11 pm | एकलव्य
पोहचल्या भावना...
(पात्र) एकलव्य
11 Jan 2009 - 11:47 pm | शितल
सुंदर कविता..
:)
12 Jan 2009 - 1:38 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो .. मस्त कविता
- ऋषिकेश
12 Jan 2009 - 9:09 pm | धनंजय
असेच म्हणतो.
12 Jan 2009 - 10:46 am | स्वाती फडणीस
:)
12 Jan 2009 - 1:32 pm | स्वाती फडणीस
स्थित्यंतर..
==============================
.
.
अपव्ययाच दुःख..मलाही आहेच..
पण अपव्यय नक्की झाला कशाचा..?
ते रटरटणार जीवन..
अजून कोंडलंय माझ्यात..!
आता उकळी नाही फुटत..
वाफही नाही उठत..
तरी काहीतरी अजून आहेच.
एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत झालेलं रुपांतर..
कदाचित तेच हे.. हे शब्द..
माझ्यात कोंडल्या वाफेचा आवेग..
माझी ऊर्जा..
आणि हो.. आता संभ्रम नकोच..
कारण जळणारी आणि उकळणारी ही मीच होते..
जळत होती ती माझ्यातली.. दुर्बलता..
उकळत होती ती माझी आकांशा..
आणि बघ.. बघ काय घडलं..
हे शब्दलेणं..
एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाताना..
होत ते फक्त ऊर्जेचं स्थित्यंतर..
नळलं ना!
.
.
==============================
स्वाती फडणीस ............................. १२-०१-२००९