गणपतीला स्वेटर

लिखाळ's picture
लिखाळ in जे न देखे रवी...
7 Jan 2009 - 10:58 pm

भावनांचा बाजार?
मांडला मंगळवारी?
सातच दिवस असतात
आठवड्याला ! अरेरे !

भाव आणि भक्ती
श्रद्धेचा उत्सव
भरला मंगळवारी?
सातच दिवस असतात
आठवड्याला ! अरेरे !

गणपतीला स्वेटर
अंधश्रद्धा आणि श्रद्धा
यांची विण
कोणता टाका निवडला?

साखळीटाका बरा
भराभर होतो स्वेटर
शेवटची गाठ मात्र अशी
एक धागा ओढला की स्वेटर पूर्ण उसवतो.
बहुधा तीच ब्रह्मगाठ असावी.

--लिखाळ.

समाजविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 11:43 pm | विसोबा खेचर

वा..!
एक वेगळीच वैचारिक कविता..!

तात्या.

अवलिया's picture

7 Jan 2009 - 11:49 pm | अवलिया

सहमत

स्वेटरवर चर्चा करुन घाम आला. स्वेटरच काढून टाकला अंगातला

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन's picture

8 Jan 2009 - 7:02 am | छोटा डॉन

एक उत्तम वैचारीक कविता आहे असेच म्हणतो ...

>>स्वेटरवर चर्चा करुन घाम आला. स्वेटरच काढून टाकला अंगातला
असु शकेल कदाचित ...
आम्हाला मात्र स्वेटरवर चर्चा करुन हुडहुडी भरली, तशाच अवस्थेत माळ्यावर चढतो , तिथला वळचणीत टाकलेला स्वेटर काढला आणि मस्तपैकी झटाकुन अंगात घालुन गुडुप्प झोपलो.
असो.

------
छोटा डॉन

प्राजु's picture

7 Jan 2009 - 11:54 pm | प्राजु

ही चर्चा वाचून खरंच बाप्पाला घाम फुटला असेल आणि त्याने स्वेटर काढला असेल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

7 Jan 2009 - 11:59 pm | मुक्तसुनीत

माफ करा , पण कवितेची वीण विसविशीत वाटली :-)

अवलिया's picture

8 Jan 2009 - 12:02 am | अवलिया

घाई गडबडीत स्वेटर... आपल कविता विणली त्यामुळे असेल.

जावु द्या ... बाप्पाला सगळे चालते.

गणपती बाप्पा मोरया !!!

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 3:50 am | लिखाळ

आपण जाणकार आहात.
माफी कसली; स्वेटर घातल्यावर जर थंडी वाजली तर तसे म्हणायला हरकत काय? :)

नाना म्हणतात तसे घाई गडबडीत स्वेटर विणला. नव्यानेच विणकाम चालू केले आहे. खरेतर आधी पायमोजे वगैरे पासून सुरुवात करायला पाहिजे होती. एकदम स्वेटर म्हणजे मोठीच उडी ;)
-- लिखाळ.
हल्ली क्रोशाच्या सुया वाकड्याच मिळतात. नीट विणकाम करता येत नाही :)

मूर्तीला वस्त्रे चढवायची प्रथा जुनी आहे. लोकरीची वस्त्रे चढवली काय, आणि रेशमाची चढवली काय... (वेगवेगळे धागे आहेत हे पटत नाहीत.)

साखळीटाका म्हणजे क्रोशेचा स्वेटर आहे, वाटते.

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 3:47 am | लिखाळ

:) क्रोशाचाच आहे.

श्रद्धा असे मानणे आणि अंधश्रद्धा असे मानणे हे दोन धागे. (लोकर टू प्लाय आहे ;) )
देवाला वस्त्र नेसवणे जुनीच पद्धत आहे हे बरोबरंच.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

आनंदयात्री's picture

8 Jan 2009 - 1:02 pm | आनंदयात्री

मस्त कविता लिखाळराव !!

वेताळ's picture

8 Jan 2009 - 1:17 pm | वेताळ

सहमत
वेताळ

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 7:28 pm | लिखाळ

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
--(विणकर) लिखाळ.
माझी अनुदिनी

चतुरंग's picture

8 Jan 2009 - 9:17 pm | चतुरंग

चतुरंग